Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

Fact Check : करण जोहर सूर्यवंशी सिनेमाचा भाग नाही ? वाचा काय आहे सत्य

रोहित शेट्टी बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक समजला जातो. रोहित शेट्टीने पोलिसांवर तयार केलेल्या सिनेमांचं विशेष कौतुक केल्या जाते. ह्याच Cop Universe मधील पुढचा सिनेमा म्हणजे सूर्यवंशी. सूर्यवंशी सिनेमा मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता परंतु लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आला. Sooryavanshi मध्ये अक्षय कुमार, कतरीना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार असून अजय देवगण आणि रणवीर सिंग यांचा गेस्ट रोल असणार आहे.

काही कारणांमुळे ह्या सिनेमाची चर्चा सगळीकडे होत आहे आणि ते कारण म्हणजे निर्माता करण जोहरला या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. गेल्या २ दिवसांपासून हि बातमी सगळीकडे फिरत आहे. ह्यामागील कारण म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूत ह्याची आत्महत्या. बॉलिवूडमध्ये सुशांतला मोठमोठ्या निर्मात्यांनी जाणून बुजून डावलल्याची चर्चा होत आहे. ह्यामुळे जनतेने करण जोहर सारख्या निर्मात्यांना चांगलंच धारेवर धरलंय. करण जोहर फक्त स्टार किड्सला कामं देतो आणि नवीन अभिनेत्यांना विचारत सुद्धा नाही असे आरोप त्याच्यावर चहुबाजुंनी होत आहेत.

ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मवर करणला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केल्या जात आहे आणि ह्यामुळेच रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार ह्यांनी करण जोहरला सिनेमातून बाहेर केल्याच्या बातम्या फिरत आहेत.

काय आहे सत्य ?

बॉलिवूड ट्रेड अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी यासंदर्भात नुकतेच एक ट्विट केलं आहे. ह्यात ते म्हणले आहेत कि, ‘करण जोहर सूर्यवंशी ह्या सिनेमाचा भाग नाही अश्या बातम्या सगळीकडे फिरत आहेत. ह्या केवळ अफवा असून ह्यात कुठलेही तथ्य नाही. Reliance Entertainment यांनी देखील ह्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.’

तरण आदर्श यांनी केलेलं ट्विट तुम्ही वर बघू शकता. त्यामुळे Sooryavanshi सिनेमाबाबत फिरणाऱ्या ह्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. सूर्यवंशी सिनेमा येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.