Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

कुठेही जायला परवानगी नाही तरी विमान कंपन्यांनी आणलीय एक फाडू योजना.

कुठेही जायला परवानगी नाही तरी विमान कंपन्यांनी आणलेली ही योजना माहीत आहे का ?

काही वर्षांपूर्वी 2020 मध्ये जगात उडणाऱ्या कार असतील अशी भाकिते मांडली होती आणि त्या एलोन मास्क भाऊंनी टेस्ला कार काढल्यापासून तर जास्तच आशा निर्माण झाली होती. पण झाले भलतेच, 2020 उजाडलं आणि कोरोना नावाने आख्खा जगाला थांबवल आहे. उडणाऱ्या कार सोडा हो, उडणारी विमाने सुद्धा पार्किंग मध्ये ठेवायला लागली आहेत.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या या विमान कंपन्यांना मात्र यामूळे मोठा आर्थिक झटका बसला आहे. कोणतेही सरकार आता बाहेरील विमानांना त्यांच्या देशात परवानगी देत नाही आहे त्यामुळे विमान कंपन्या चांगल्याच हैराण झाल्या आहेत याचबरोबर त्या डबघाईला आल्या आहेत हे सुद्धा खरेच. पण बाजारात राहायचं म्हणजे काहीतरी नवीन नवीन गोष्टी आणायच्या असतील तर डोकं लावावं लगेच. आणि आता विमान कंपन्यांनी डोकं लावून एक नवीन योजना जाहीर केली आहे.

फ्लाईट टू नोव्हेअर (flight to nowhere)

हो. फ्लाईट टू नोव्हेअर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणताही देश विमानांना परवानगी देत नाहीय. कोणतीही पर्यटन स्थळे सुरू झालेली नाहीत मग विमानात बसून जायचं कुठे?? पण योजनाच त्यासाठी काढली आहे. घरी बसून बसून अनेक लोक पकले आहेत आणि प्रत्येकजण आता नवीन काहीतरी करायचा पाहत आहे आणि नेमकं हाच धागा पकडून विमान कंपन्यांनी ही योजना जाहीर केली आहे.

विमानाचं तिकीट काढायचं, विमानात जाऊन बसायचं. त्यांनतर विमान आकाशात झेप घेणार आणि थोड्या वेळाने परत त्याच विमानतळावर उतरणार..! ज्यांना घरी लैच बोरं झालयं आणि विमानात बसायची हौस आहे अश्या बहाद्दर लोकांसाठी flight to nowhere ही खास योजना आहे.

लोक खर्च करतील ?

सध्या भारतात ही योजना एअर इंडिया चालू करत आहे. आत हे वाचून तुम्हाला वाटतं असेल कोणी मुर्खच यावर खर्च करेल. पण काही दिवसांपूर्वी flight to nowhere योजना ऑस्ट्रेलिया मध्ये चालू झाली आहे आणि अगदी तासाभरात विमानाची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. विमानात बसून विविध पर्यटनस्थळे आणि निसर्गाचा नजरा दाखवणाऱ्या या योजना परदेशात तरी भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता आपल्या भारतात पाहू कसा प्रतिसाद मिळतोय.


Leave A Reply

Your email address will not be published.