Acidity होण्याची कारणे आणि अ‍ॅसिडिटीवर घरगुती उपाय

0
1681
acidity, home remedies for acidity in marathi, acid reflux, what causes acidity, what foods cause acidity, ऍसिडिटीची लक्षणे, आम्लपित्त घरगुती उपाय, अ‍ॅसिडिटी घरगुती उपाय, अ‍ॅसिडिटी कशामुळे होते, अ‍ॅसिडिटी म्हणजे काय, पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी उपाय, पित्त होण्याची कारणे

आजच्या काळात २०-३० वयोगटातील तरुणांना अ‍ॅसिडिटीचा त्रास मोठ्या प्रमाणावर सतावतोय ? काय आहे यामागचे कारण ? Acidity च्या त्रासावर घरगुती उपाय कोणते ?

आपण आपल्या दैनंदिन कामामध्ये इतके व्यस्त होऊन जातो कि, आपल्या जेवायच्या आणि झोपायच्या वेळा बदलून जातात. योग्य वेळी योग्य आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे मानवी शरीरासाठी आवश्यक आहे. कारण, यामुळे आपल्या पोटाची पचनक्रिया सुरळीत चालू राहते आणि आपले पोट खराब होत नाही.

परंतु, अनेकवेळा लोकं कामाच्या गडबडीमुळे खूप उशिरा किंवा चुकीच्या वेळी जेवण करतात. त्यामुळे, खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही आणि अ‍ॅसिडिटी (Acidity) सारख्या समस्या उदभवतात. तुमचा हा ऍसिडिटीचा त्रास कमी होऊ शकतो पण त्याकरिता तुम्ही काही सवयी बदलल्या पाहिजेत.

त्याआधी बघुयात अ‍ॅसिडिटी म्हणजे नेमकं काय ? What is Acidity

आपण खालेल्या अन्नाचे पचन होण्याकरिता आपल्या पोटातील जठरात एक प्रकारचा रस तयार होतो. ह्याला पाचक रस असेही म्हणतात. हा पाचक रस आम्लयुक्त म्हणजेच Acidic असतो. जठरात तयार झालेल्या या पाचक रसामुळे आपण जेवलेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते. परंतु तुम्ही वेळेत जेवला नाही तर हा रस अधिक प्रमाणात तयार होतो आणि परिणामी तुम्हाला Acidity म्हणजेच आम्लपित्ताचा त्रास होतो.

acidity, home remedies for acidity in marathi, acid reflux, what causes acidity, what foods cause acidity, ऍसिडिटीची लक्षणे, आम्लपित्त घरगुती उपाय, अ‍ॅसिडिटी घरगुती उपाय, अ‍ॅसिडिटी कशामुळे होते, अ‍ॅसिडिटी म्हणजे काय, पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी उपाय, पित्त होण्याची कारणे

Acidity चा त्रास कशामुळे होतो ? What causes Acidity

अ‍ॅसिडिटीचा त्रास होण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे काही चुकीच्या सवयी. रात्री अपरात्री खाणे, खूप जास्त जेवणे, रात्री उशिरा पर्यंत जागरण, व्यायाम न करणे, फास्टफूड अधिक प्रमाणात खाणे ह्या सवयींमुळे Acidity चा त्रास होण्याची दाट शक्यता असते. परंतु ह्या व्यतिरिक्त आणखी काही कारणं आहेत ज्यामुळे तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा म्हणजेच पित्ताचा त्रास होत असणार. ती कारणं कोणती बघुयात,

  • तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे
  • दारू आणि सिगारेटचे सेवन
  • शिळे पदार्थ खाणे
  • बदलती जीवनशैली
  • कामाचा ताण
  • अतिकाळजीत राहणे
  • भराभरा जेवणे

अ‍ॅसिडिटीवर घरगुती उपाय कोणते ? Home remedies for Acidity

पौष्टिक पदार्थांचे सेवन (Eat healthy food)

तरुण वयामध्ये तुम्ही तेलकट, तुपकट असो वा आणखी काही… तुमच्या चंचल वृत्तीमुळे आणि तुमच्या वयामुळे तुमची पचनक्रिया नीट होते पण जसं वय वाढत जाईल, तश्या तुम्ही या सर्व सवयी कमी केल्या पाहिजेत. कारण, आपलं जसं वय वाढत जाते तसंच आपल्या शरीरातील काही घटक कमी व्हायला लागतात. या घटकांची पुन्हा पूर्तता होण्यासाठी तुम्ही पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक असते. म्हणून Acidity चा त्रास कमी करायचा असेल तर तेलकट आणि मसालेदार पदार्थ खायचं टाळा आणि पौष्टिक पदार्थ खायला सुरवात करा.

व्यायाम करणे (Exercise)

ऍसिडिटी कमी करण्यासाठी फक्त योग्यवेळी जेवण करणे पुरेसे नसते तर जेवणासोबतच व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. आपल्या पेशींमध्ये अधिक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी नियमित व्यायाम करायलाच हवा. व्यायाम केल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि आपल्याला जास्त भूक लागते. व्यायाम करण्याचे दुसरे कारण म्हणजे आपल्या शरीराची कार्यक्षमता वयाप्रमाणे कमी होत असते म्हणून, शरीरात ताकद टिकवून ठेवण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे.

acidity, home remedies for acidity in marathi, acid reflux, what causes acidity, what foods cause acidity, ऍसिडिटीची लक्षणे, आम्लपित्त घरगुती उपाय, अ‍ॅसिडिटी घरगुती उपाय, अ‍ॅसिडिटी कशामुळे होते, अ‍ॅसिडिटी म्हणजे काय, पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी उपाय, पित्त होण्याची कारणे

भरपूर पाणी पिणे (Drink a lot of Water)

दिवसभरात आपल्या पोटामध्ये अनेक आम्ल (Acids) तयार होत असतात आणि या तयार झालेल्या आम्लाच्या प्रमाणामुळे आपल्याला अ‍ॅसिडिटी होत असते. या त्रासातून सुटका करण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे. पाण्यामुळे पोटात थंडावा तयार होतो आणि त्यामुळे जळजळ होणे कमी होते. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्या आणि मुख्यतः सकाळी रिकाम्या पोटी….. परंतु, एक दक्षता घ्यावी कि पाणी जास्त थंड पिऊ नये कारण, जास्त थंड पाणी आपल्या शरीरासाठी योग्य नसतं.

निंबू पाणी प्या (Lime Water)

गॅस आणि अ‍ॅसिडिटीच्या समस्यांवर निंबू फार उपयोगी आहे. पचनाच्या समस्यांवर निंबू पाणी म्हणजे रामबाण उपाय. म्हणून अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्यास १ ग्लास थंड निंबू पाणी (जास्त थंड नव्हे) प्या, थोड्याच वेळात तुम्हाला आराम मिळेल. निंबू पाण्यात अद्रक टाकून पिल्यास फारंच उत्तम.

गुळ खा (Eat Jaggery)

जुन्या काळात लोक जेवण झाल्यावर गूळ खायचे, कारण गूळ खाल्यामुळे पचनक्रिया चांगली होते. गुळात काही घटक असतात ज्यामुळे तुमची आतडे अधिक मजबूत बनतात परिणामी तुमची पचनशक्ती सुधारते. त्यामुळे हळू हळू तुमचा अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होईल, म्हणून रोज जेवण झाल्यावर थोडा गूळ खायची सवय लावा.

acidity, home remedies for acidity in marathi, acid reflux, what causes acidity, what foods cause acidity, ऍसिडिटीची लक्षणे, आम्लपित्त घरगुती उपाय, अ‍ॅसिडिटी घरगुती उपाय, अ‍ॅसिडिटी कशामुळे होते, अ‍ॅसिडिटी म्हणजे काय, पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी उपाय, पित्त होण्याची कारणे

तणाव घेऊ नये (Live stress free life)

आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींवरून आपण ताण घेत असतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का, मानसिक तणाव हा सर्व आजारांचे मुख्य कारण आहे. गॅस-ऍसिडीटीचे कारण देखील तणाव घेणेच आहे. तणाव घेतल्याने आपल्या मेंदूमध्ये अनेक केमिकल्स तयार होत असतात जी आपल्या मानवी शरीरासाठी घातक ठरतात. या केमिकल्समुळे आपल्या पचनक्रियेवर चुकीचा परिणाम होतो आणि म्हणून ऍसिडिटी वाढते. त्यामुळे Acidity होऊ नये यासाठी तणाव घेणे कमी करावे.

*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here