Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

पोट साफ होण्यासाठी जालीम घरगुती उपाय

बद्धकोष्ठता हि अनेकांना भेडसावणारी खूप सामान्य अशी समस्या आहे. हि समस्या जरी सामान्य वाटत असली तरी ज्याला ह्याचा त्रास होतो त्याचं दुखणं त्यालाच माहित. कारण तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आजकाल तरुण वयातील मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच हि समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.

बद्धकोष्ठतेचा त्रास होण्यामागे सर्वात जास्त कारणीभूत असणारी गोष्ट म्हणजे आपली बदलती जीवनशैली. ह्यावर उपाय म्हणून बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहे परंतु हि समस्या काही घरगुती उपायांनी सहजरित्या सोडवली जाऊ शकते. चला तर बघुयात पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय.

पोट साफ न होण्यामागील कारणं (What causes Constipation ?)

अन्न आतड्यातून पुढे सरकत असताना त्यातून पाणी शोषून घेणे आणि बिनकामाचे अन्न पुढे ढकलून गुदाशयातून (Rectum) मल रूपात ते बाहेर टाकणे हे आतड्यांचे काम असते. जर काही कारणांमुळे तयार झालेले मल/संडास (Feces) आतड्यांमध्ये जास्त काळ राहिले तर ते कडक होते आणि गुदाशयातून बाहेर पडायला कठीण जाते. ह्यालाच आपण बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणे म्हणतो.

शरीरासाठी लाभदायी नसलेले किंवा हानिकारक असलेले अन्न खाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. तसेच तंतुमय (Fiber) युक्त पदार्थ आणि कमी प्रमाणात पाणी पिल्याने देखील बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास अनेकांना होतो. एकाच ठिकाणी खूप वेळ बसून काम करणाऱ्यांना हा त्रास मोठ्या प्रमाणावर सतावतो. बरेच जण वजन कमी करायचं म्हणून कमी खातात परिणामी तुमच्या शरीराला आवश्यक आहार मिळत नाही आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास सतावू लागतो.

Constipation in marathi, Home remedies on constipation, बद्धकोष्ठता घरगुती उपाय, sandas saf honyasathi upay, kadak sandas upay, baddhakoshtata upay, pot saf honyasathi gharguti upay, What causes Constipation, मलावरोध उपाय, constipation meaning in marathi, पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय
What causes Constipation, constipation meaning in marathi

बदलती जीवनशैली, रोज होणारी धावपळ आणि तुम्ही घेत असलेला ताण ह्यामुळे देखील पोट साफ न होण्याच्या तक्रारी वाढू शकतात, कारण धावपळीच्या जीवनात तुमचे आहाराकडे दुर्लक्ष होते, तुम्ही कोणतेही अन्न खाता आणि याचा परिणाम तुम्हाला शौचालयाला जाण्याची इच्छा न होणे असा होते. शौचला जाण्याची इच्छा न होणे ह्याला इंग्रजीत Delaying the impulse to have a Bowel Movement असं आपण म्हणतो.

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies for Constipation in Marathi)

भरपूर पाणी प्या (Drink more Water)

तुम्ही जर कमी खूपच कमी प्रमाणात पीत असाल तर ह्यामुळे तुमचे शरीर Dehydrate होते. असे जर नेहमी होत असेल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास सुरु होऊ शकतो. म्हणून भरपूर पाणी पिण्याची सवय लावा.

पाण्याच्या मदतीनेच तुमच्या शरीरातील बिनकामाचे घटक शरीराबाहेर टाकले जातात. तसेच तुमच्या पचन संस्थेतून अन्न पुढे ढकलण्याचे काम पाणीच करते. भरपूर पाणी पिल्याने मल कडक होत नाही आणि गुदाशयातून तो सहजपणे बाहेर टाकला जातो. योग्य पद्धतीने पाणी पिल्यास तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता. वाचा पाणी पिण्याची योग्य पद्धत

तंतूमय पदार्थ खा (Fiber Diet)

पोट साफ होत नसणाऱ्या लोकांनी त्यांच्या आहारात तंतुमय पदार्थांचे (Fiber Diet) प्रमाण वाढवायला पाहिजे. फायबरमुळे Bowel Movement चं प्रमाण वाढते आणि शौचाला जाण्याची इच्छा देखील वाढते. केळ, सफरचंद, संत्री, बिट, पालक, रताळे, अंजीर यामध्ये तंतू (Fiber) चं प्रमाण जास्त असते. तुमचा आहार संतुलित असावा आणि त्यात फायबरचं प्रमाण भरपूर असावं.

दररोज व्यायाम करा (Daily Exercise)

एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून काम करणाऱ्या लोकांना पोट साफ न होण्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर होतो. यावर घरगुती उपाय म्हणजे दररोज व्यायाम करणे. व्यायाम शक्य नसल्यास चालणे किंवा जॉगिंग करणे गरजेचे आहे. व्यायाम केल्याने बद्‍धकोष्ठतेचा त्रास पूर्णपणे बरा होणार नाही परंतु ह्या त्रासाचे प्रमाण मात्र नक्की कमी होईल.

कॉफीचे सेवन (Drink Coffee)

कॉफीमध्ये कॅफेन नावाचा घटक असतो, ह्या कॅफेन एक नैसर्गिक पाचक आहे. रो १ कप कोफी घेण्यास काही हरकत नाही परंतु कॅफेनचे जास्त प्रमाणात सेवन केले तर Dehyadration होते आणि ह्याला उलट परिणाम म्हणजे Dehyadration मुळे बद्‍धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो.

लिंबू पाणी (Lime Water)

पोट साफ न होण्याच्या त्रासाने ग्रासलेल्या अनेक लोकांना तुम्ही लिंबू पाणी पिताना बघितले असेल. सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी पिल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. तसेच लिंबूपाणी पिल्याने शरीरातील विषाणू घटक देखील बाहेर फेकली जातात. ह्याशिवाय सकाळी १ ग्लास पाण्यात २ चमचे मध टाकून पिल्याने सुद्धा शौच सुलभ होण्यास मदत होते.

Constipation in marathi, Home remedies on constipation, बद्धकोष्ठता घरगुती उपाय, sandas saf honyasathi upay, kadak sandas upay, baddhakoshtata upay, pot saf honyasathi gharguti upay, What causes Constipation, मलावरोध उपाय, constipation meaning in marathi, पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय
बद्धकोष्ठता घरगुती उपाय, pot saf honyasathi gharguti upay
ऑलिव्ह ऑइल (Olive Oil)

वर सांगितलेले उपाय आजमावून सुद्धा तुम्हाला फरक पडत नसेल तर रोज १ चमचा Olive Oil घ्यायला सुरु करा. ऑलिव्ह ऑइलचे जेवताना सेवन केलास उत्तम. ह्या ऑईलच्या नियमित सेवनाने तुम्हाला पोट साफ होण्यासाठी मदत होईल.


Disclaimer – विविध तज्ज्ञांशी बोलून आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यात आली आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला असू शकत नाही. आपल्याला अति त्रास जाणवत असल्यास किंवा प्रयोग करण्याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.