Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

घरी पाण्याची बचत करण्यासाठी ह्या टिप्स फॉलो करा

पाण्याचे महत्व (Importance of Water in Marathi)

‘पाणी हे जीवन आहे’, हि गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलोय. मानवी जीवनात पाण्याला खूप महत्व आहे. केवळ माणसालाच नव्हे तर पृथ्वीवरील झाडं, प्राणी व प्रत्येक सजीवाला पाण्याची आवश्यकता आहे. पृथ्वीवर पाणी नसेल तर जीवन देखील राहणार नाही.

मागील काही वर्षांपासून जगातील अनेक देशांमध्ये आणि विशेष करून भारताला पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाण्याची कमतरता हे भविष्यात संपूर्ण जगासमोर मोठं संकट असणार आहे. यावर उपाय म्हणून जागतिक स्तरावर लोकांना पाण्याचे महत्व पटवून दिले जात आहे. भारत सरकार देखील जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी अनेक अभियान चालवत आहे.

परंतु ह्याची अंबलबजावणी किती प्रमाणात होत आहे आणि लोक ह्या गोष्टी किती गंभीरतेने घेत आहेत, हा मात्र वादाचा विषय आहे. प्रत्येक माणसाने आपल्या घरात वयक्तिक स्थरावर पाण्याची बचत करायला पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना पाण्याचे महत्व पटवून द्यायला हवे. शाळेत जल संवर्धनाविषयी विविध उपक्रम राबवल्या गेल्यास पुढील काळात नक्कीच फरक दिसून येईल.

पृथ्वीवर भूभाग जवळपास ७१% पाण्याने व्यापला आहे, हे आपण शाळेपासून ऐकत आलोय. परंतु ह्यातले केवळ ३% पाणी हे पिण्यायोग्य आहे, इतर पाणी समुद्राने व्यापलेले आहे. पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन आपण आपल्याच घरापासून पाणी वाचलायला पाहिजे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी पाणी बचत कशी करावी ह्याच्या सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत, बघुयात….

किचनमध्ये पाण्याची बचत करण्यासाठी टिप्स (Tips To Save Water In The Kitchen)

how to save water at home in india, how to save water in daily life essay, how to save water essay, water saving tips in Marathi, how to save water in the kitchen, simple ways to save water, water conservation tips in marathi, save water information in marathi, some activities to save water, Essay on save water in Marathi, पाणी वाचवा या विषयावर मराठीतून निबंध, Importance of Water in Marathi, पाण्याचे महत्व, Tips To Save Water In The Bathroom, Tips To Save Water while Washing Clothes, पाण्याची बचत करण्यासाठी टिप्स, pani vachava essay in marathi
How to save water at home in India

स्वयंपाक करताना गरजेपेक्षा मोठे भांडे वापरू नका. मोठे भांडे वापरल्यास ते धुण्यासाठी पाणी जास्त लागते आणि लहान भांडे वापरल्यास ते कमी पाण्यात धुतले जाते.

स्वयंपाक करताना वापरलेले पाणी फेकून देण्यापेक्षा त्याचा उपयोग तुम्ही झाडांना पाणी देण्यासाठी करू शकता.

जेवणात किंवा स्वयंपाकात वापरलेले भांडे धुताना पाण्याचा नळ तसाच चालू ठेऊ नका. भांडे धुताना गरजेनुसार पाण्याचा वापर करा.

अनेक लोक आजकाल भांडे धुण्याकरिता डिशवॉशरचा उपयोग करतात, परंतु डिशवॉशरमुळे प्रमाणापेक्षा खूप जास्त पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे गरज नसल्यास डिशवॉशर वापरण्याचे टाळा अथवा कमी पाणी वापरत असलेला डिशवॉशर विकत घ्या.

किचनमधील पाण्याचे नळ किंवा पाईप्स लीक असतील तर ते वेळीच दुरुस्त करून घ्या अन्यथा थेंब थेंब पडून पाण्याचा बराच अपव्यय होतो.

बाथरूममध्ये पाण्याची बचत करण्यासाठी टिप्स (Tips To Save Water In The Bathroom)

अनेक लोक आंघोळ करताना शॉवरचा वापर करतात परंतु शॉवरच्या वापराने ५ ते १० लिटर जास्त पाणी वापरले जाते. अश्या वेळी शॉवरचा वापर टाळल्यास पाण्याची बचत होऊ शकते.

बाथरूममध्ये आंघोळीसाठी वापरलेले पाणी साठवून ठेवल्यास त्याचा उपयोग झाडांना पाणी घालण्यासाठी केला जाऊ शकतो.

अंगाला साबण अथवा केसांना शाम्पू लावताना नळ किंवा शॉवर तसाच चालू न ठेवता तो बंद करावा. गरज असेल तेव्हाच शॉवर सुरु करावा.

ब्रश किंवा दाढी करताना अनेकांना नळ चालू ठेवण्याची सवय असते. ह्या सवयीमुळे शेकडो लिटर पाणी प्रत्येक घरात वाया जाते. म्हणून हि कामे करताना नळ बंद ठेवा.

बाथरूममधील पाण्याचा नळ अथवा पाईप लीक होत असल्यास तो ताबडतोब दुरुस्त करून घ्या. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाऊ शकते.

कपडे धुताना पाण्याची बचत करण्यासाठी टिप्स (Tips To Save Water while Washing Clothes)

how to save water at home in india, how to save water in daily life essay, how to save water essay, water saving tips in Marathi, how to save water in the kitchen, simple ways to save water, water conservation tips in marathi, save water information in marathi, some activities to save water, Essay on save water in Marathi, पाणी वाचवा या विषयावर मराठीतून निबंध, Importance of Water in Marathi, पाण्याचे महत्व, Tips To Save Water In The Bathroom, Tips To Save Water while Washing Clothes, पाण्याची बचत करण्यासाठी टिप्स, pani vachava essay in marathi
Water conservation tips in marathi

कपडे धुण्यासाठी वेळ आणि कष्ट वाचवण्याकरिता वॉशिंग मशीनचा सर्रास वापर केला जातो, परंतु तुम्ही वापरत असलेली मशीन पाण्याचा जास्त प्रमाणात वापर करते का हे तपासून बघा. बाजारात कमी पाण्याचा वापर करणाऱ्या आधुनिक वॉशिंग मशीन आल्या आहेत.

जास्त मळलेले कपडे हाताने धुत असाल तर कोमट पाणी आणि चांगल्या दर्जाची डिटर्जंट पावडर वापरा जेणेकरून कपड्यांवरचा मळ साफ करण्यासाठी तुम्हाला जास्त पाण्याचा वापर टाळता येईल.

हाताने कपडे धुताना पाण्याचा नळ तसाच चालू ठेऊन कपडे धूत बसू नका. गरज असेल तेव्हाच पाण्याचा नळ चालू करा.

थोडे थोडे कपडे धुण्यापेक्षा एकदाच कपडे गोळा करून ते मशीनमध्ये टाकून धुवून घ्या. पुन्हा पुन्हा मशीन वापरल्यास पाण्याचा आणि विजेचा अपव्यय होतो.

कपडे भिजवण्यासाठी वापरलेले पाणी फेकून न देता त्याच पाण्याचा वापर बाथरूम धुण्यासाठी केला जावू शकतो अथवा ते पाणी झाडांना पाणी घालण्यासाठी वापरता येतं.

घराच्या बाहेर पाण्याची बचत करण्यासाठी टिप्स (Tips To Save Water Outdoor)

गाडी धुवायची असल्यास नळाला पाईप लावून गाडी धुवू नका. त्याऐवजी बादलीत पाणी घेऊन किंवा ओल्या कपड्याने गाडी साफ करा. ह्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होवू शकते.

बगीच्यात झाडांना पाणी घालताना पाईपने पाणी न देता बादलीत पाणी भरून झाडांना टाकावे. मुळात झाडांना एवढ्या पाण्याची गरज नसते आणि पाईपने पाणी दिल्यास झाडांना जास्त प्रमाणात पाणी दिले जाते.

घराच्या आजूबाजूचा परिसर अथवा आंगण स्वच्छ करायचे असल्यास ते पाण्याने न धुता झाडूने साफ करा. गरज नसलेल्या ठिकाणी पाण्याचा अपव्यय टाळा.

स्वामिंग पुलचा वापर टाळता आल्यास तो टाळावा. तसेच स्विमिंग पुलमधील पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत असल्यास पूल झाकून ठेवायला हवा जेणेकरून पाण्याची पातळी कायम राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.