Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळ्यात एसीशिवाय घराला थंड ठेवतील हे भन्नाट उपाय

कडाक्याच्या थंडीमध्ये गारठल्यानंतर कधी एकदा उन्हाळा चालू होतो अस आपल्याला वाटू लागतं. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उन्हाळा चालू व्हायला सुरवात होते आणि मग हळू हळू त्याचा ताव वाढायला सुरवात झाली की मग आपल्याला भयानक गरम व्हायला लागतं. अशावेळी उन्हाच्या चटक्यापासून वाचण्यासाठी लोक कुलर आणि AC चा वापर करू लागतात पण AC प्रत्येकाला परवडेलच असं नाही त्याचसोबत सतत एअर कंडिशन मध्ये राहिल्याने शारीरिक त्रास सुद्धा जाणवायला लागतात.

नैसर्गिक उपायांनी घर थंड ठेवल्याने आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही आणि इकोफ्रेंडली असल्याने पर्यावरणालाही हानी पोचणार नाही.

चला तर मग जाणून घेऊया घरात कुलर किंवा AC न लावता घराला थंड ठेवतील असे साधे सोपे आणि भन्नाट उपाय.

घरातील झाडं

तापमान कमी करण्यासाठी हिरवळ या एक प्रभावी उपाय आहे. ज्यापद्धतीने आपण घराच्या बाहेर झाडं लावतो अगदी तसाच घरात सुद्धा छोटी झाडं लावून किंवा हिरवळ तयार करून आपण आतील भाग थंड ठेवू शकतो. अमेरिकेत केलेल्या संशोधनानुसार घरात लावलेली झाडे तापमान तब्बल 10 ते 15 अंशाने कमी करतात. म्हणूनच घराच्या प्रवेशद्वारजवळ झाडे ठेवल्याचे आपण अनेकदा पाहतो.

keep your room cool in summer, ghar thand karnyache uapay, ghar theva cool, How to keep home cool, Ac, Greenery, Garden, Plants, Summer Tips, Air Conditioner, Home Cool, Summer Season, Cooling Tips, Curtains For Summer

मातीच्या भांड्यांचा वापर

आपण घरात पाणी थंड ठेवण्यासाठी मातीचा माठ घेतो, मस्त त्याला कापड लावून थंड पाण्याचा आस्वाद घेतो. पाणी नक्कीच फ्रीजच्या बरोबरीचे नसते पण नैसर्गिकरित्या थंड ठेवलेल्या पाण्याचा आस्वाद कमाल असतो. अगदी त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ ठेवायला घरात विविध मातीची भांडी वापरल्यास वातावरण थंड ठेवण्यास मदत होईल.

इलेक्ट्रॉनिक वस्तू

घरातील तापमान वाढीला सगळ्यात जास्त जबाबदार घटक म्हणजे विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू. या वस्तू जितक्या जास्त वापराल तितके जास्त तापमान वाढेल. त्यामुळे घरात शांत थंडावा राहण्यासाठी तुम्हाला या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर नियंत्रण ठेवावे लागेल. रात्री झोपण्यापूर्वी विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बंद केल्यास तुम्हाला कमालीचा थंडावा घरात जाणवेल.

वाळ्याचे पडदे

अनेकांना वाळ्याचे पडदे हा प्रकार समजणार नाही. प्रामुख्याने विदर्भात घरात थंडावा ठेवण्यासाठी वापर केला जातो. वाळ्यापासून पडदे तयार केले जातात आणि मग त्यावर पाणी शिंपडले जाते यामुळे येणारी हवा अधिक थंडावा निर्माण कराते. यावर एक सोपा उपाय म्हणजे टॉवेल किंवा सुती कापड पाण्यात भिजवून खिडकीवर टाकावा यामुळेही घरातील वातावरण थंड होण्यास मदत होईल.

बर्फ

तुमच्या घरी फ्रीज असेल तर बर्फाचा स्मार्ट वापर करू शकता. घरातील टेबल फॅनच्या खाली एका भांड्यात बर्फ भरून ठेवा. हळूहळू बर्फातून थंड हवेचे तुषार बाहेर पडतील आणि टेबल फॅनच्या हवेसोबत ते घरात थंडावा निर्माण करतील.

keep your room cool in summer, ghar thand karnyache uapay, ghar theva cool, How to keep home cool, Ac, Greenery, Garden, Plants, Summer Tips, Air Conditioner, Home Cool, Summer Season, Cooling Tips, Curtains For Summer

कपडे आणि रंग

घरातील बहुतेक वापरातील कापडे पॉलिस्टर किंवा सटीनचे असतात त्यामुळे ते अधिक गरम होऊन तापमान वाढवतात. घरात थंड वातावरणासाठी त्यांच्या जागी सुती कापड वापरावे. बेडशीट ही कॉटनची असेल याच्याही काळजी घ्या यामुळे तुम्हाला फार घाम येणार नाही. आता ही कापडे सुद्धा फिक्या रंगाची आणि शक्य असल्यास पांढरी ठेवा. भडक रंग अति तापमान शोषून घेतो याच्या उलट फिका रंग थंडावा ठेवतो.

पर्यायी व्हेंटिलेशन

घरात खेळती हवा असणे हा एक वातावरण थंड ठेवण्याचा चांगला उपाय आहे. घरात असलेल्या पर्यायी व्हेंटिलेशनमुळे गरम हवा बाहेर जाऊन थंड हवा आत येते. या साठी सकाळी लवकर आणि सायंकाळी सर्व खिडक्या दरवाजे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करावा.

पाण्याचा वापर

घरच्या गच्चीवर दुपारी आणि सायंकाळी पाणी शिंपडल्यास उष्णता कमी करण्यास मदत होते. तसेच रात्री फारशी पाण्याने पुसून घेतल्यास आपल्याला गरमी कमी प्रमाणात जाणवेल.

नारळीच्या सोपंचा वापर

समुद्रठिकानच्या तसेच खेड्यात याचा प्रामुख्याने वापर होतो. घराच्या ज्या भागावर सूर्याचा जास्त प्रभाव जाणवतो तिथे नारळाच्या झाडाच्या सोपंचा गुच्छा करून उभे केले जातात, यामुळे ऊन सरळपणे घराच्या भिंतीवर किंवा गच्चीवर पडत नाही आणि घरात मस्त थंडावा राहायला मदत होते.


Leave A Reply

Your email address will not be published.