Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

लग्न करा आणि सव्वा चार लाख रुपये मिळावा.

भारत आणि आपला आवडता शेजारी चीन आपण दोन्ही देश जास्त लोकसंख्येच्या नावाने खडे फोडत आहे. चीनने त्यात आधीच लक्ष घालून आता त्यांचा जन्मदर आटोक्यात आणला आहे पण भारताने यावर कोणतीही पावले अजून तरी उचलली नाहीत. पण जपानला मात्र याच्या बरोबर उलटी समस्या भेडसावत आहे. आपल्याला माहीतच आहे की जपान हा जगातील सर्वात वृद्ध लोकणाचा देश आहे. सध्या तिथे वृद्ध लोकांची संख्या भरपूर झाली आहे पण कळीचा मुद्दा हा आहे की जपान मध्ये हा आकडा भविष्यात जोमात वाढणार असल्याचं दिसत आहे.

एकीकडे तरुणांचे कमी झालेले प्रमाण आणि नवीन बालकांचा जन्मदर अत्यल्प असल्याने आता जपानी लोकांसह तिथलं सरकार अति काळजीत आहे. यावर मात करण्याची उद्देशाने तिथं नवीन नवीन योजना आखल्या जात आहेत. पण सध्याची आर्थिक परिस्थिती आणि भविष्याची असलेली चिंता यामुळे तेथील आहे ते तरुण लोक लग्न करण्यापासून दूर राहत आहेत. लग्न होत नसल्याने नवीन बालके होत नाहीत त्यामुळे हा जन्मदर अजूनच खाली जाण्याची भीती फाडत असल्याने आता जपान सरकारने तरुणांनाही लग्न कशी करता येतील यावर लक्ष केंद्रित केले आहे. तरुणांनी लग्न करावीत आणि नवीन मुलांना जन्म द्यावा यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न चालू आहेत.

सरकारने आता एक फाडु योजना जाहीर केली आहे त्यामुळे फक्त जपान नव्हे तर तर जगभरातील सगळ्याच तरुणांनाचे लक्ष वेधले आहे. जपान मधील जे तरुण लग्न करण्याचा निर्णय घेऊन संसार हाकणार आहेत अश्यांना आता जपान सरकार सहा लाख येन देणार आहे. येन ही जपानची करन्सी आहे. म्हणजे रुपयात तब्बल सव्वा चार लाख रुपये. आता या योजनेची हवा तर झाली आहे पण याचा कितपत फायदा होतो हे येणारा वेळ ठरवेल.

सध्या जपानची लोकसंख्या 12 कोटी म्हणजे आपल्या महाराष्ट्रा एवढी आहे. यात वृद्धांची संख्या जास्त आहेच पण 100 पार केलेल्यांची संख्या जास्त लक्षणीय आहे. गेल्या वर्षभरात जपान मध्ये फक्त 8 लाख 65 हजार बालकांचा जन्म झाला आहे. जपान सरकारच्या योजना फसल्या तर अशीच परिस्थिती राहून 2040 पर्यत वृद्धांची संख्या 35 टक्क्यांपर्यंत वाढलेली असेल.


Leave A Reply

Your email address will not be published.