Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

समुद्रातील शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘त्या’ वीराची गाथा लवकरच मोठ्या पडद्यावर

हिंदी आणि मराठीत शिवाजी महाराजांच्या शूर सरदारांवर सिनेमे तयार होत असताना त्यात अजून एका वीराची भर पडणार आहे.

महाराष्ट्राला मोठ्या शूरवीरांचा इतिहास लाभला आहे. ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सर्वात अग्रगण्य आहे. ४०० वर्षांपूवी होऊन गेलेल्या ह्या राजाची आजही महाराष्ट्र पूजा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना Father of Indian Navy असंही म्हटलं जातं. यामागचे कारण म्हणजे समुद्रावरील सत्ता किती महत्वाची आहे हे महाराजांनी खूप आधीच ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यांनी मराठ्यांचं आरमार उभं केलं. मराठ्यांच्या ह्या नौदलाची धुरा त्यांनी कान्होजी आंग्रे ह्यांच्या हातात दिली.

kanhoji angre, kanhoji angre movie in marathi, kanhoji angre film, समुद्रातील शिवाजी, कान्होजी आंग्रे चित्रपट, कान्होजी आंग्रे फिल्म, मराठी सिनेमा.

कान्होजी आंग्रे ह्यांनी समुद्र किनाऱ्यांवर आपला दरारा निर्माण केला समुद्रमार्गे स्वराज्यावर होणारे प्रत्येक आक्रमण हाणून पाडले. एकीकडे कान्होजी आंग्रे ह्यांच्यासारख्या अनेक मावळ्यांवर हिंदी आणि मराठीत चित्रपट तयार केले जात आहेत. त्यामुळे कान्होजी आंग्रे यांचाही इतिहास आणि शौर्यगाथा आता लवकरच मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.

स्वराज्याच्या नौदलाचे पहिले सरखेल कान्होजी आंग्रे यांना समुद्रावरचा शिवाजी म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जीवन प्रवास एका मराठी सिनेमातून मांडला जाणार आहे. डॉ. सुधीर निकम यांनी ह्या चित्रपटाची कथा लिहिली असून हा सिनेमा २०२२ साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कान्होजी आंग्रे’ ह्या सिनेमाची निर्मिती राहुल जाध (क्रिटीव्ह मदारीस प्रस्तुत) व पर्यवेक्षक निर्माते राहुल भोसले करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या केवळ सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे, चित्रपटात कोण काम करणार हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे.

कान्होजी आंग्रे यांनी तब्बल ४ दशकं समुद्रावर राज्य केलं. विशेष म्हणजे डच, पोर्तुगीझ, मुघल असे बलाढ्य शत्रू कान्होजींना पराभूत करण्यासाठी एकत्र आले होते, परंतु कान्होजी एकटेच ह्यांना पुरून उरले. कान्होजींवर सिनेमा तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकही मोठे उत्सुक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.