Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

महेश कोठारेंनी केवळ १ रुपया देऊन लक्ष्याला पहिल्या सिनेमासाठी साईन केलेलं

सिनेमा! पिक्चर! फिल्म! एक अद्भुत दुनिया… त्यातील हिरो हिरोइन्स तर बऱ्याच जणांना अगदी प्राणप्रिय. त्यांच्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असणाऱ्या या फॅन्सची कमतरता कुठेच नाही. परंतु पिक्चर हिट करण्याचं श्रेय जसं या हिरो-हिरोईन्सचं असतं, तसं ते दिग्दर्शक, निर्माते, म्युझिक डायरेक्टर, कॉमेडियन्स, को ऍक्टर्स अशा अनेकांचं असतं. परंतु प्रकाशझोतात येतात ते केवळ हिरो-हिरोईन्सच. इतरांना आपल्या वाट्याला आलेलं काम करायचं असतं, त्यांच्या कामामुळे त्यांना एक ओळख मिळालेली असते त्यांच्यासाठी हीच काय ती जमेची बाजू!! मात्र काही ऍक्टर्स हे आपल्या वाट्याला आलेल्या या अल्पशा भूमिकेचंही अक्षरशः सोनं करतात. असे म्हणतात काही जण त्यात इतका प्राण ओततात की या विशिष्ट ऍक्टर शिवाय त्या भूमिकेला न्याय मिळणं केवळ अशक्य असं वाटावं ! लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) – असंच एक नाव ! काम अतिशय साधं असो, काही क्षणांचं असो, या माणसाने आपला ठसा प्रत्येकवेळी उमटवलाच ! हिंदी पिक्चर्स मध्ये लक्ष्याने बऱ्याचदा हिरोच्या जानी मित्राची भूमिका केली.

lakshmikant berde, Laxmikant Berde in marathi, Laxmikant Berde story, laxmikant berde movies, mahesh kothare, ashok saraf, laxmikant berde biography, laxmikant berde mahiti, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे बायोग्राफी, लक्ष्मीकांत बेर्डे माहिती, अशोक सराफ

या मित्राच्या रोलमध्ये तो जसा प्रेक्षकांना भावला तसा तो एक अफलातून कॉमेडीयन म्हणूनही सगळ्यांचा आवडता झाला. मित्राला सदैव मदत करत राहणारा एक सच्चा यार-दोस्त म्हणून जसा तो स्मरणात राहतो तसा एक बहारदार कॉमेडीयन म्हणून त्याची ती संवाद फेकण्याची विशिष्ट शैलीही कायम लक्षात राहते.

हिरो असो की घरगडी, लक्ष्मीकांतचा प्रेमळ, हसरा, भाबडा चेहरा मनात घर करून जातो..

केवळ पिक्चर्स मधेच नव्हे तर खऱ्या जिंदगीतही लक्ष्मीकांत एक सच्चा, दिलदार माणूस होता. अगदी दिग्दर्शक मित्राच्या- महेश कोठारेच्या एका शब्दावर पिक्चर करायला तयार होणारा हा गडी चक्क एक रुपया मानधन घेऊन कामाला लागला होता.

एकदा महेश कोठारे यांचे आई वडील ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकात काम करत होते आणि नाटकातील एका कलाकाराचं निधन झाल्याने हि संधी लक्ष्याला मिळाली. नाटकाची तालीम बघायला गेलेल्या महेश कोठारेंना लक्ष्याचं (Laxmikant Barde) काम फारंच आवडलं.

महेश कोठारेंनी लागलीच आपल्या पुढील ‘धुम धडाका’ या सिनेमासाठी लक्ष्याला विचारलं आणि केवळ १ रुपया देऊन साईन सुद्धा केलं. विशेष म्हणजे लक्ष्यानी सुद्धा मोठ्या आनंदाने हि ऑफर स्वीकारली. आणि अश्या प्रकारे लक्ष्या आणि महेश कोठारेंच्या मैत्रीची सुरवात झाली.

पैशापेक्षा मित्रावर, कामावर निस्सीम प्रेम करणारा, ज्याला मित्राचा शब्द प्रमाण होता-काम प्रिय होतं….. असा अद्भुत कलाकार आता कुठे भेटेल का ?

त्यावेळी मराठी पिक्चर्स मध्ये महेश कोठारे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्याच नावाचा बोलबाला होता. किंबहुना, मराठी पिक्चर म्हणजे हा “त्रिकोण” अथवा यापैकी कुणीतरी हे बहुधा फिक्स असायचं.

“लक्ष्मीकांत बेर्डे” (Laxmikant Berde) नावाचा हा कलाकार मराठी फिल्मी दुनियेत अवतरला व या त्रिकोणाचा “चौकोन” झाला. एक ऍक्टर, एक हिरो, हिरोचा मित्र, घरगडी.. कुठलाही, अगदी कुठलाही रोल असला तरी लक्ष्मीकांतने आपल्या साध्या, सरळ, निर्व्याज विनोदाने प्रत्येक रोल जिवंत केला.

त्याच्या खास शैलीतील साधे संवाद देखील प्रेक्षकांना खळखळून हसवून जात. या विनोदवीराने अल्पावधीतच नाव कमावलं. लोकांना हा इतका जवळचा झाला की लक्ष्मीकांतचा “लक्ष्या” कधी झाला हे कुणाला कधी कळलंच नाही.

महाराष्ट्राच्या या लक्ष्याने हिंदी फिल्म्स मधेही आपली छाप सोडली. अनेक बड्या बॅनरखाली काम करताना हा कधी झाकोळला गेला नाही. त्याची ती विशिष्ट ढब, तो अनोखा अंदाज होता तसाच राहिला..

समोरच्याला रडवणं सोपं आहे पण हसवणं महाकठीण आहे असं म्हणतात, जे शंभर टक्के खरं आहे. आयुष्यातील टेंशन्स सांभाळत जीव जेव्हा मेटाकुटीला येतो, तेव्हा एक सुंदर, प्रफुल्लित हसू चैतन्य फुलवू शकतं. आणि हे हसू जर आपल्या स्वतःच्या चेहऱ्यावर फुललं तर बातच न्यारी!

हास्याची ही दौलत प्रेक्षकांसाठी घेऊन यायचा “लक्ष्या” ! केवळ या लक्ष्याच्या नावावर मराठी पिक्चर्स चालले ते केवळ याचमुळे.

lakshmikant berde, Laxmikant Berde in marathi, Laxmikant Berde story, laxmikant berde movies, mahesh kothare, ashok saraf, laxmikant berde biography, laxmikant berde mahiti, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे बायोग्राफी, लक्ष्मीकांत बेर्डे माहिती, अशोक सराफ

लक्ष्मीकांत बेर्डेने हास्याची ही देणगी भरभरून वाटली. मराठी सिनेसृष्टीवर त्याने जवळपास १५ वर्षे राज्य केलं. महाराष्ट्रातील जनतेला, प्रेक्षकांना जेव्हा तो अगदी जिवाभावाचा झाला होता, अगदी हवाहवासा वाटू लागला होता….. तेव्हा नियतीचीच नजर लागली असावी.

जिवाभावाच्या तीन मित्रांना सोडून, बायको मुलांपासून दूर, माया करणाऱ्या प्रेक्षकांना १६ डिसेंबर २००४ रोजी अलविदा करून लक्ष्मीकांत अकालीच देवाघरी गेला.

त्याच्या अशा अनपेक्षित एक्झिटने सर्वांनाच धक्का बसला. तीन मित्रांबरोबर बनलेल्या या चौकोनाची एक बाजू अशी निखळली! लक्ष्मीकांतच्या निधनानंतर महाराष्ट्राला इतका गुणी विनोदाचा बादशहा कधी लाभलाच नाही.

अत्यंत गंभीर सीन सुरू असताना, प्रेक्षकही टेन्शनमध्ये बसले असताना लक्ष्याच्या केवळ एन्ट्रीनेच हायसं वाटावं…. ही त्याच्या कामाची पावती होती.

कामावर प्रचंड निष्ठा व प्रेम करणाऱ्या या माणसाने आपल्या मुलाचं नाव देखील “अभिनय” ठेवलं…. आपल्या सहजसुंदर अभिनयाचा वारसा मागे सोडून लक्ष्मीकांत देवाघरी गेला..

सृष्टीचं चक्र चालवताना, अनेक क्लिष्ट गोष्टी हाताळताना थोड्याफार विनोदाची गरज त्या परमेश्वरालाही असावी! हास्याची पेरणी “लक्ष्या” शिवाय होऊ शकत नाही हे माहीत असल्याने परमेश्वराने लक्ष्मीकांत बेर्डेला आपल्याकडे बोलावून घेतलं असणार…

सर्वांच्या आवडत्या लक्ष्याच्या पावन स्मृतीस शतशः नमन!!

Leave A Reply

Your email address will not be published.