Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

WhatsApp चॅट खरंच सुरक्षित आहे का ?

WhatsApp चॅट सुरक्षित आहे मग NCB कडे बॉलिवूड कलाकारांचे चॅट आलेच कसे ??

WhatsApp वर करत असलेले चॅट खरंच सुरक्षित आहे का हा प्रश्न आत्ताच पडलाय कारण या मेसेज अँप वर केलेले संभाषण त्या वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही पाहता येत नाही आणि पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा कंपनी कायमच करत आली आहे मग सध्या गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री आणि इतर कलाकार यांच्यात झालेले चॅट समोर कसं काय आले असेल बुवा ? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का?

End to End Encryption म्हणजे काय ?

आपल्याला माहीत आहे की WhatsApp मार्क भाऊंनी विकत घेतल्यामुळे आता ते फेसबुकच्या मालकीचे आहे. तर फेसबुकच्या सांगण्यानुसार WhatsApp वर झालेले कोणतेही संभाषण त्या वापरकर्त्यांच्या शिवाय इतर कोणालाही पाहता येत नाही. नियम म्हणजे नियम. खुद्द WhatsApp ला सुद्धा पाहता येत नाही आणि यालाच End to End Encryption असं बोललं जातं.

मग NCB कडे WhatsApp चॅट आलेच कसे ?

आपण WhatsApp वापरात असताना त्याचे बॅकअप घेत असतो जेणेकरून मोबाईल खराब झाला किंवा ते चॅट नाहिशे झाले तर बॅकअप वरून पुन्हा घेता येतील. यासाठी मोबाईल मेमरी किंवा विविध क्लाऊडचा वापर केला जातो. आता इथे मुद्दा असा की WhatsApp चे संभाषण जसे End to End Encryption असते तसं हा बॅकअप नसतो.

कोणत्याही टेक्नॉलॉजीला मागचे दरवाजे सुद्धा असतात पण त्यासाठी तुम्ही थोडी चूक करणे गरजेचे असते आणि अनेक हॅकर याच संधीची वाट पाहत असतात. आपले चॅट बॅकअप करणे हीच ती चूक आणि याचा फायदा NCB ने घेत अनेक बॉलीवूड कलाकारांचे चॅट मिळवले.

मग आपल्या सुरक्षेचे काय ?

WhatsApp कंपनीने यावरही तोडगा काढला आहे. बॅकअप मधील चॅट मिळवून सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून कंपनीने two-step verification नावाचे तुला उपलब्ध करून दिले आहे. तुमच्या सेटिंग मध्ये जाऊन two-step verification सेवा चालू करावी लागेल यानंतर तुमची कोणतीही माहिती पाहण्यासाठी सहा अंकी पासवर्डची गरज लागते आणि तो फक्त तुमच्याकडेच असतो. त्यामुळे लवकरात लवकर WhatsApp सेटिंग मध्ये जा आणि तुमचे अकाउंट अधिक सुरक्षित करा. तुम्हाला two-step verification कसं चालू करायचं माहित नसेल तर इथे पहा.


Leave A Reply

Your email address will not be published.