Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

Skin Care : चेहरा स्वच्छ करताना अनेकजण या चुका करतात; नंतर उपायांवर वेळ घालवतात

आपण आपल्या शरीराची नेहमी काळजी घ्यायला हवी, तशी आपण ती घेत असतोच. पण सगळ्यात विशेष काळजी चेहऱ्याची घ्यायला हवी. चेहरा नीट, छान दिसावा असं सर्वांना वाटतं. चेहरा धुण्याच्या वेळीही काळजी घ्यावी लागते. जर का तेंव्हा काळजी घेतली गेली नाही, तर याचा वेगळा त्रास होऊ शकतो. तर काही चूका टाळून चेहऱ्याची स्वछता कशी करावी (Tips for face cleaning) याबद्दलची माहिती जाणून घेऊयात,

मेकअप असताना चेहरा धुणे –

मेकअप न उतरवता चेहरा धुवू नये. थेट फेसवॉश लावूनच मेकअप उतरवणे चुकीचं आहे. मेकअप रिमुव्हर न वापरता फेसवॉशने मेकअप धुतला तर दोन्ही केमिकलयुक्त असतात. त्याचा वेगळाच परिणाम होऊ शकतो. म्हणून केलेला मेकअप कसा उतरवावा याबद्दलची नीट माहिती घ्या. आणि त्यानंतरच चेहरा स्वच्छ धुवावा.

साबण वापरणे –

बहुतांश लोक हे चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर करतात. हे त्रासदायक ठरू शकेल! का म्हणाल? संपूर्ण शरीरासाठी तर साबण चालतो मग चेहऱ्यावर वापरला तर असं काय होणार? चेहऱ्याची त्वचा ही शरीराच्या अन्य भागापेक्षा पातळ असते. साबणातील सोडियम हायड्रोक्साईड मुळे चेहऱ्याची त्वचा शुष्क होऊ लागते. म्हणून चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशचा वापर करावा.

चेहरा घासणे –

चेहरा धुवून झाल्यानंतर तो चेहरा घासण्याचं काम केलं जातं. हे ही अयोग्य आहे. चेहरा घासल्याने त्वचा लाल होते, त्यावर फोड येऊ शकतात. मुरुमे, पुरळ येण्याचं हे महत्त्वाचं कारण होऊ शकतं. म्हणून चेहरा धुतल्यावर तो कपड्याने टीपावा.

टॉवेल –

आपण अंघोळ झाल्यावर शरीर कोरडे करण्यासाठी जो टॉवेल वापरतो. तोच टॉवेल चेहरा पुसण्यासाठीही वापरला जातो. असं करू नये. आपल्या शरीरावर असलेले आधीच टाकाऊ पदार्थ यामुळे पुन्हा चेहऱ्याच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. पिंपल्समुळे चेहऱ्यावरील सुंदरता हरवू शकते.

पाण्याचं तापमान –

चेहरा धुतेवेळी पाणी खूपच गरम आहे की खूप थंड आहे हे पाहणे आवश्यक आहे. हवेतील तापमानाप्रमाणे पाण्याचे तापमान कमी अधिक करावे. पाण्याचे तापमान योग्य असेल तर त्वचेवरील बारीक छिद्रे उघडली जातात. या छिद्रांमधून घामावाटे शरीरातील विषारी व निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकले जातात. यामुळं चेहऱ्याची त्वचा सुंदर, स्वच्छ व तेजस्वी राहते.

वरील सांगितली गेलेली Tips for face cleaning आपल्याला नक्की उपयुक्त ठरेल.
त्याप्रमाणे वागा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या.


Leave A Reply

Your email address will not be published.