Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खास उपाय

कोरोना सारख्या भयानक आजाराचा सामना करण्यासाठी तुमची Immunity Power म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोप्पे आणि घरगुती उपाय

कमी असलेली रोगप्रतिकार शक्ती ही आजकालच्या पिढीसाठी अगदी सामान्य तक्रार होऊन बसली आहे. पूर्वीच्या काळी माणसं अगदी वयाची शंभरी गाठायचे ते त्यांच्या उत्तम अशा रोगप्रतिकार शक्तीमुळेच. पण आजकाल पेपरमध्ये जेव्हा अगदी तिशीतला मुलगा हद्याच्या विकाराने त्रस्त होऊन प्राण सोडतो अशा बातम्या वाचायला मिळतात तेव्हा काळजात अगदी धस्स होतं. आजकाल अगदी कमी वयातंच मुलांना दमा, किडणीसंबंधी आजार, पेशी कमी होणे अशा एक ना अनेक समस्या उदभवतात. बरं, या झाल्या मोठ्या समस्या पण सर्दी, खोकला, ताप अशा छोट्या छोट्या तक्रारी तर घरोघर अगदी बाराही महिने बघायला मिळतात.

आपली रोगप्रतिकार शक्ती (Immunity Power) वाढवणं हे ज्याच्या त्याच्या हातात असतं असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल हे ज्याच्या त्याच्या आवाक्यात असतं. आजकाल बाजारात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरीता बरेच हेल्थ ड्रिंक्स, शक्तिवर्धक औषधं उपलब्ध आहेत पण हे सगळं विकत घेऊन कितपत शक्ती मिळते हे सगळं ज्यांनी हे उपाय करून पाहिलेत त्यांनाच माहीत. पूर्वीच्या काळचे लोक जास्तं जगायचे, त्यांना कधी साधं औषधदेखील माहीत नव्हतं ना त्यांना कधी एखादी गोष्ट वाचण्यासाठी चष्मा वापरावा लागला हे त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीमुळे जी त्यांना अगदी त्यांच्या रोजच्या रुटीनमधून आणि सकस आहारातून मिळायची.

रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची कारणे…

आजकाल फास्टफूड खाण्यामुळे, जास्त प्रमाणात ड्रिंक्स करण्यामुळे, सतत एकाच जागेवर बसून काम करण्यामुळे, व्यायामाच्या अभावामुळे आपली सगळ्यांचीच रोगप्रतिकार शक्ती ढासळत चालली आहे आणि म्हणूनच आपण साधं सर्दी खोकला झाला तरी लगेच डॉक्टरकडे जाऊन औषधं खात बसतो. पण जेव्हा आपण लवकर आराम मिळवण्याच्या नादात हेवी अँटीबायोटिक्स असलेली औषधं घेतो तेव्हा तीच औषधं नकळतपणे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत असतात.

रोगप्रतिकारक शक्ति in English, रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याची कारणे, रोग प्रतिरोधक शक्ति, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार, how to increase immunity power in marathi, foods that weaken immune system, immunity boosting foods, how to increase immunity home remedies
Junk or Fast food affects your immune system

आजही जर तुम्ही पाश्चिमात्य देशांमध्ये बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल कि तिकडे सर्दी, खोकला, ताप अशा छोट्या आजारांसाठी कोणतेही डॉक्टर औषध देत नाहीत. म्हणूनच पाश्चिमात्य देशातील लोक हे शरीराने काटक असतात. आपणही जर अशा क्षुल्लक आजारांकडे लक्ष न देता घरगुती उपाय करून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवली तर आपली हेल्थ आणि वेल्थ दोन्ही टिकून राहील हे मात्र अगदी खरं.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे स्वस्त आणि मस्त उपाय….

An apple a day keeps doctor away असं म्हणतात, त्यात आपण थोडासा बदल करून असं म्हणूयात कि Fruit a day keeps doctor away. सफरचंद, अननस, किवी, पेरू, कलिंगड, केळी हि फळे आपल्या उत्तम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे तुम्ही जर रोज सकाळी नाश्त्यात एक फळ खाल्लं तर तुम्हाला इतर कोणतेही सप्लिमेंट्री फ्रुट ड्रिंक्स घेण्याची गरज पडणार नाही.

फास्टफूड, तेलकट आणि गोड पदार्थ सारखे खाण्याने देखील आपली रोगप्रतिकार शक्ती (Immunity Power) कमकुवत होत असते. बऱ्याच फास्टफूड पदार्थांमध्ये मैदा आणि अजिनोमोटो अगदी सर्रास वापरला जातो जो आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे रोजच्या आहारात पोळी, भाजी, भाकरी, भात असे सकस पदार्थ खाल्ल्याने आपल्याला आपली रोगप्रतिकार शक्ती अगदी सहजरित्या वाढवता येते.

‘जिसकी रात कि निंद बिगडी उसका पुरा दिन बिगडा’ असं म्हणतात ते काही उगाच नाही. प्रत्येक व्यक्तीला रोज रात्री किमान आठ तास झोप आवश्यक असते आणि जर आपली झोप नाही झाली तर उगाच चिडचिड होणे, डोकेदुखी, चक्कर येणे अशा समस्या डोके वर काढतात. रोज रात्रीची पुरेशी झोप ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे रोज रात्री शांत झोप घेण्याने देखील आपली रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. टेन्शनमुक्त होऊन शांत झोप मिळण्यासाठी खास उपाय

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अजून एक सोपा आणि अगदी फुकटचा उपाय म्हणजे दररोज कमीत कमी दहा हजार पाऊलं चालणे. दीक्षित किंवा दिवेकर यांच्यापैकी कोणा एकाच डाएट अगदी चोख बजावताना आपल्याकडून नकळतपणे कधीतरी पोटापेक्षा जास्त खाल्लच जातं आणि ते पोटापेक्षा जास्त खाल्लेलं आपल्या शरीराला त्रासदायक ठरतं त्यामुळे रोज चालून वजन कमी करणे म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे असंच मी म्हणेल.

आपल्या भारतीय संस्कृतीत रोज काही न काही सणवार असतातच त्यामुळे आपल्याकडील प्रत्येक घरात अगदी बारा महिने गोड पदार्थ बनवले जातात आणि ते त्याच्यावर अगदी सर्रास ताव मारला जातो. पण अति गोड पदार्थ असो किंवा व्यक्ती शेवटी ती घातकच. त्यामुळे गोड पदार्थात तुम्ही साखरेऐवजी मध वापरून मधुमेहा सारख्या आजारात पळवून लावू शकता त्याच प्रमाणे मध खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवू शकता.

पाणी म्हणजे जीवन हा साधा मूलमंत्र लक्षात घेऊन दररोज कमीत कमी आठ ग्लास पाणी पिल्याने आपल्या शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर टाकले जातात आणि अर्थातच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.

पालेभाज्या, कंदमुळे, मासे अशा वैविध्यपूर्ण आणि जीवनसत्व असलेले अन्न आपण आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केले तर रोगप्रतिकार शक्ती नक्कीच वाढेल यात तिळमात्र शंका नाही.

सतत सकारात्मक विचार करण्याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते जी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे Think positive and be positive हा सोपा उपाय अंमलात आणा आणि सुदृढ राहा.

Leave A Reply

Your email address will not be published.