Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

IB असताना RAW ची स्थापना का झाली, असा प्रश्न तुम्हाला पडलाय ? हे आहे त्याच उत्तर

गोष्ट RAW च्या जन्माची

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की जगभरात सध्या अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि इस्राईल च्या गुप्तहेर संघटनांचे गुणगान गाईले जाते. पण भारताच्या हेरगिरी बाबत तब्बल ५ हजार वर्षाचा इतिहास आहे. आपण वाचले नसल्यास इथे क्लिक करून वाचू शकता.

भारताच्या राष्ट्रपुरुषांच्या जाणिवेवर अन हेरसंस्थाच्या पायावरच पुढील संघटना भारतात उभ्या झाल्या पण जन्म मात्र झाला तो ब्रिटिशांच्या हेरयंत्रणेतून. व्यापारी म्हणून भारतात आलेल्या ब्रिटिशांना अनेक अपयशांना सामोरे जावे लागले आणि त्याचे कारण होते भारतातील माहितीचा अभाव यात इंग्रज हळूहळू बदल करत गेले. यासाठी अवघ्या २३ वर्षांच्या तरुण इंग्रज लेफ्टनंटने मराठीचा २५ हजार शब्दांचा भलामोठा शब्दकोश तयार केला होता.

यांनतर १८५७ च्या मिळालेल्या मोठ्या झटक्यातून सावरत ब्रिटिशांनी तातडीने फ्रेजर आयोगाच्या शिफारशी नुसार सेंट्रल क्रिमिनल इंटेलिजन्स विभाग तयार केला. यांनतर या विभागात बदल करता पहिल्यांदा इंटेलिजन्स डिपार्टमेंट आणि त्यांनतर डिरोक्टोरेट ऑफ इंटेलिजन्स ब्युरो असे नामांतर करण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्यांनंतर या DIB चे तीन तुकडे झाले आणि त्यावेळी एक म्हणजे भारताची केंद्रीय गुप्तचर संघटना इंटीलिजन्स ब्युरो – आयबी.

raw story in marathi, IB असताना RAW ची स्थापना का, गोष्ट RAW च्या जन्माची, RAW in marathi, इंटीलिजन्स ब्युरो, यशवंतराव चव्हाण, बी.एन. मलिक, ब्रिगेडिअर एम.एन बांना, why raw, Yashvantrao Chavan, B N Malik,
Source – India Today

भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. सगळं धामधुमीचा काळच तो. यात पाकसोबत पहिले युद्ध झाले, महात्मा गांधींची हत्या झाली आणि हा आयबी वरचा काळा डाग होय यांनतर तत्कालीन प्रमुख सजीवी यांची बदली झाली आणि बी.एन. मलिक आयबीचे नवे संचालक झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे खास ते. बी. एन. मलिक तब्बल १७ वर्षे या पदावर होते.

बी.एन. मलिक म्हणजे लिजंड, गॉड म्हणायचे आयबीतील अधिकारी त्यांना. यांच्याच काळात आयबी एक शक्तिशाली गुप्तहेर यंत्रणा म्हणून उदयास आली. नेहरूंचा मलिक यांच्यावर फार विश्वास होता. इतका विश्वास होता कि १९६२ च्या युद्धात चिनी सीमेवर लष्कराची ठाणी कुठं असावीत हे आय बी ठरवत होत. पण याच युद्धात आयबीचे अपयश दडलं होत. चीन आक्रमण करायच्या पूर्ण तयारीत होता याचा सुगावा आयबी ला लागलाच नाही. आणि इथूनच सगळ्या गोंधळास सुरवात झाली.

यामुळे आयबी ला मोठा झटका बसला. हा आयबी वरचा सगळ्यात मोठा डाग आणि यांनतर सगळी चिखलफेक. या चिखल फेकीत मोठा झटका बसला तो मिलिटरी इंटेलिजन्सला, यामुळे संचालक ब्रिगेडिअर एम.एन बांना वैतागले आणि त्यांनी लष्कर प्रमुख जयभो नाथ चौधरी यांची भेट घेऊन बाह्य घरभेदी यंत्रणेची कल्पना सांगितली. ती त्यांना पसंद पडली पण ती उभारायची कशी ?

त्यांच पूर्ण स्ट्रक्चर कसं असणार हे ठरविण्यासाठी चौधरी आणि बात्रा यांनी ब्रिटनवारी केली. तेथील संस्थांचे काम आणि रचना पहिली या नंतर या नव्या संघटनेचे रूप सांगणारा नवा अहवाल तयार करण्यात आला. तोपर्यंत १९६५ च युद्ध झालं होत. आणि त्यावेळी सुद्धा आयबी माहिती गोळा करण्यात कमी पडली असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे बत्राच्या या नवीन संघटनेच्या मागणीला जोर आला.

raw story in marathi, IB असताना RAW ची स्थापना का, गोष्ट RAW च्या जन्माची, RAW in marathi, इंटीलिजन्स ब्युरो, यशवंतराव चव्हाण, बी.एन. मलिक, ब्रिगेडिअर एम.एन बांना, why raw, Yashvantrao Chavan, B N Malik
Source – Puneri Speaks

नुकताच ताष्कंद करार झाला हुता. आणि याच बहादूर शास्त्रींच्या मृत्यूमुळे आखा देश दुःखात होता. त्यावेळी पंतप्रधान पदी इंदिरा गांधी यांची नियुक्ती झाली होती. तर संरक्षण मंत्री होते मराठमोळे यशवंतराव चव्हाण. या दोघांना हा अहवाल सादर करण्यात आला आणि त्यांना हा प्रस्ताव पसंद पडला.


पण हि नवी संघटना संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत यावी हे काही इंदिराजींना मान्य नव्हते. शेवटी ठरलं ह्या नव्या संघटनेवर पंतप्रधान कार्यालयाचे नियंत्रण असेल पण याच नाव काय असणार तर RAW.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.