भारतीय हेरगिरीचा पाच हजार वर्षाचा गौरवशाली इतिहास.

0
2907
Intelligence Bureau, Intelligence Bureau story in marathi, 5000 Yrs history of indian Intelligence, ऋग्वेद, भीष्म, कौटिलियम अर्थशास्त्रम, अजातशत्रू, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याच्या हेर, आयबीची स्थापना, Shivajis Intelligence Bureau, IB History

अनेकांना हेरगिरी म्हटलं कि, पहिल्यांदा आठवत ते अमेरिकेची CIA किंवा इस्राईल ची मोसाद. पण मित्रांनो, भारत देशाला तब्बल पाच हजार वर्षाच्या हेरगिरीचा गौरवशाली इतिहास आहे. मी असं म्हणत नाही कि, पहिला शोध आम्हीच लावला आणि बाकी देशांनी आमच्याकडून चोरले, परंतु भारताचा असा स्वतंत्र असा इतिहास नक्कीच आहे. जो कि आपल्या सगळ्यांना माहित पाहिजे, चला तर मंग जाणून घेऊया या भारतीय हेरगिरीच्या संदर्भात.

भारतीय हेरगिरीची सुरवात होते ती पाच हजार वर्षांपूर्वी म्हणजे ऋग्वेद काळात, ते आपल्या तमाम गुप्तहेरांचे पूर्वज होय. आता इथे प्रामुख्याने उल्लेख आहे तो म्हणजे आद्य गुप्तचर प्रमुख वरूण यांचा, त्या काळातल्या लोकांच्या दृष्टीने वरूण हा इंद्र, अग्नी प्रमाणेच यांचा रक्षणकर्ता होय. ऋग्वेदात वरूणदेवाची एक ऋचा येते,

” मित्रन् दुवे पुतदक्ष्न वरुण्च दिक्षदसम्
धिय धृता ची साधन्ता
ऋग्वेद मंडळ (सुक्वर)

याचा अर्थ असा कि मित्र आणि वरुणदेव यांनी आम्हाला बलशाली बनवावे, वरुणदेवाने आमच्या शत्रूंचा नाश करावा. अथर्व वेदातही वरूणदेवाचा उल्लेख आहे, त्यात म्हटले आहे, त्यांना हजार डोळे आहेत. यातून दिसून येते कि, त्याकाळी गुप्तहेर यंत्रणा कशी होती. यांनतर गुप्तहेर संस्थेचा थेट आणि स्पष्ट उल्लेख आहे तो महाभारतामध्ये. यात महारथी भीष्मांनी राजांची कर्तव्ये सांगीतली आहेत.

Intelligence Bureau, Intelligence Bureau story in marathi, 5000 Yrs history of indian Intelligence,  ऋग्वेद, भीष्म, कौटिलियम अर्थशास्त्रम, अजातशत्रू, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याच्या हेर, आयबीची स्थापना, Shivajis Intelligence Bureau, IB History
Source – Amar Ujala

भीष्मांनी सांगितलेल्या कर्तव्यांपैकी प्राथमिक कर्तव्ये म्हणजे हेरांची नियुक्ती, हे हेर नगरात, प्रातांमध्ये ठेवावेत असेही भीष्म सांगतात. त्यांच्या नजरेतुन काहीही सुटू नये अगदी राजपुत्र, राज्याचे नातेवाईक आणि मित्रसुद्धा, यावेळी भीष्मांनी हेरांनी काय करावे याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले आहे. थोडक्यात गुप्तहेराने गुप्तचर आणि वार्ताहर म्हणून काम करावे असं ते सांगतात.

यांनतर अजून स्पष्ट आणि मुद्देसूद अशी माहिती मिळते ते चंद्रगुप्त मौर्यांना मार्गदर्शन करणाऱ्या चाणक्य कडून. चाणक्य म्हणजे कौटिल्य व विष्णुगुप्त होय. त्यांनी लिहलेल्या “कौटिलियम अर्थशास्त्रम” ह्या ग्रंथामध्ये गुप्तचर यंत्रणा हा भाग आहेच. कौटिल्याने गुप्तहेरांचे तब्ब्ल ९ प्रकार सांगितले आहेत. त्यांच्यानुसार हे गुप्तहेर विद्यार्थ्यांपासून संन्याशापर्यंत असतात. कौटिल्य सांगतात देशातील आणि परराज्यातील गुप्त आणि बाह्य गोष्टीची माहिती मिळविणे, परराज्यात फितुरी माजविणे हे हेरांचे मुख्य काम असते. याच्या पुढे कोणाला फितूर करावे आणि त्याचे चार प्रकार सुद्धा सांगितले आहेत. यामध्ये क्रुद्ध, भयभीत, चॊथी आणि मानी यांचा समावेश आहे.

Intelligence Bureau, Intelligence Bureau story in marathi, 5000 Yrs history of indian Intelligence,  ऋग्वेद, भीष्म, कौटिलियम अर्थशास्त्रम, अजातशत्रू, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याच्या हेर, आयबीची स्थापना, Shivajis Intelligence Bureau, IB History
Source – AajTak

यांनतर पुढे गुप्तहेर संस्था सम्राट अशोकाच्या काळातही पाहायला मिळते. कलिंगाच्या रक्तपातानंतर अशोकाने जरी अहिंसाप्रधान बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी त्याने आपले सैन्य विसर्जित केले नव्हते.

यानंतर हेरगिरीचे एक उत्तम उदाहरण सापडते ते मग्ध मध्ये,अजातशत्रूने आपल्याच पित्याचा वध केला आणि त्या धक्याने बिंबीसारच्या पत्नीचे आणि प्रसेनजीतच्या बहिणीचे निधन झाले. बहिणीच्या निधनामुळे संतापलेल्या प्रसेनजितने युद्ध पुकारले पण पहिल्या युद्धात त्याचा पराभव झाला. यांनतर मात्र प्रसेनजितने गुप्तहेरांचे जाळे पसरून बलाढ्य अजातशत्रूचा पराभव केला.

पुढे मध्ययुगात गुप्तहेरांची नोंद आपल्याला सापडते ती कृष्णदेवराय यांच्या अमुक्तमाल्लद या ग्रंथामध्ये. अमुक्तमाल्लद हे तेलगू भाषेतील महाकाव्य यात त्यांनी वैष्णव संत विष्णुचित्त यांची गोष्ट मांडली आहे. कृष्णदेवराय म्हणतात शेतकरी जसा आपल्या शेतीला कुंपण घालतो त्याप्रमाणे राजानेही राज्यातील समूळ शत्रू उखडून टाकले पाहिजेत, त्यावर सतत आपली नजर ठेवली पाहिजे. आणि यासाठी हवे ते गुप्तहेरांचे जाळे. राजांबाबत ते म्हणतात राजाने दुपारी विदुषकासोबत वेळ घालवावा, पुराण काव्ये ऐकावीत. सूर्यास्तानंतर मात्र त्याने हेरांशी सल्ला मसलत करावी. त्यांच्या या उपदेशामुळेच विजयनगर साम्राज्य निर्माण झाले.

Intelligence Bureau, Intelligence Bureau story in marathi, 5000 Yrs history of indian Intelligence,  ऋग्वेद, भीष्म, कौटिलियम अर्थशास्त्रम, अजातशत्रू, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याच्या हेर, आयबीची स्थापना, Shivajis Intelligence Bureau, IB History
Source – Konkankatta

हेरगिरीला असेच महत्त्व देणारे आणि त्यांच्या राज्यकारभाराने मुघलांना सळो कि पळो करून सोडणारे थोर राज्यकर्ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपतींच्या हेर खात्यांबद्दल दुर्दैवाने फार माहिती उपलब्ध नाही. पण विविध बखरी, इंग्रज, फ्रेंच नोंदींपासून स्पष्ट होते कि, बहिर्जी नाईक स्वराज्याच्या हेर खात्याचे प्रमुख होते. शिवरायांच्या लष्करात हेरांना जासूद या नावाने ओळखले जायचे. सभासद त्यांचे प्रमुख म्हणजे बहिर्जी नाईक यांचा “शाहाणा” असा उल्लेख करत. सुरत प्रकरण आणि महाराजांची आग्रा येथून सुटका या दोन्ही प्रकरणात स्वराज्याच्या हेरांनी मोठी कामगिरी केल्याच्या नोंदी आहेत. इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड मध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी हेर वाढवल्याचा उल्लेख आहे. त्याच रेकॉर्डमधील एका पत्रात एक विलक्षण उल्लेख आहे. त्यात इंग्रज अधिकारी म्हणतो,’शिवाजीचे हेर सर्वत्र आहेत, त्यांच्या शत्रूला रसद कोण पुरवत हे त्यांना चांगलाच माहित असत.

इंग्रज प्रवाशी अबे कॅरे जेव्हा स्वराज्यातील सरदाराला भेटतो तेंव्हा त्याने काही नोंदी करून ठेवल्या आहेत. तो म्हणतो शिवाजी महाराज बहादूर आहेतच ते बळाच्या जोरावर काहीही करू शकतात, पण ते हुशारही आहेत. त्यामुळेच त्यांनी प्रत्येक दरबारात आपली माणसे पेरली आहेत. यामुळेच खबर तातडीने समजतात आणि महाराज त्यावर हल्ला करण्यास सज्ज देखील असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हेर यंत्रणेबद्दल जी काही माहिती मिळते त्यारून एक गोष्ट आपल्याला स्पष्ट होते कि, महाराजांनी कौटिल्याची युद्धनीती चांगलीच आत्मसात केलेली होती. गुप्तचर खाते राज्याचा तिसरा डोळा आहे हे शिवाजी महाराजांनी चांगलेच जाणले होते.

Intelligence Bureau, Intelligence Bureau story in marathi, 5000 Yrs history of indian Intelligence,  ऋग्वेद, भीष्म, कौटिलियम अर्थशास्त्रम, अजातशत्रू, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याच्या हेर, आयबीची स्थापना, Shivajis Intelligence Bureau, IB History
Source – Times of India

पुढे स्वतंत्र भारतात अनेक हेर संस्था उभ्या राहिल्या आहेत पण त्यांचा जन्म झाला तो ब्रिटिशांच्या हेर संस्थेमधून, १८५७ च्या बंडामधून त्यांनी धडा घेतला आणि फ्रेजर आयोगानुसार ‘सेंट्रल क्रिमिनल इंटेलिजन्स’ विभाग तयार केला आणि १९१८ मध्ये त्याचेच रूपांतर इंटेलिजन्स डिपार्टमेंट मध्ये करण्यात आलं. १९२० मध्ये स्वातंत्र चळवळीने जोर धरल्या नंतर त्याची फेररचना करून डिरेक्टरेट ऑफ इंटेलिजन्स ब्युरो असे नामांतर करण्यात आले.

फाळणीनंतर या DIB चेही तुकडे झाले. एक भारतीय, एक ब्रिटिश, एक पाकिस्तानी असे तीन झाले. त्यातील ब्रिटिश अधिकारी त्यांच्या घरी म्हणजेच ब्रिटनला गेले आणि भारतीय अधिकाऱ्यांची मिळून सार्वभौम अशी इंटेलिजन्स ब्युरो- आयबी ची स्थापना करण्यात आली. IB असताना RAW ची स्थापना का झाली, असा प्रश्न तुम्हाला पडलाय? हे आहे त्याच उत्तर.


*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here