Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

ग्रुप व्हिडीओ कॉलसाठी १० ॲप्स जे तुम्ही लॉकडाउनच्या काळात वापरू शकता

आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपल्याला नेहमीच नव नवीन गोष्टींबाबत अपडेट राहणं गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं तर आज-काल नवीन एप्लिकेशन्सची कुठलीही कमी आपल्याला जाणवत नाही आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ कॉलचे एप्लीकेशन भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत, आपण या ॲप्लिकेशनच्या मदतीने एकमेकांशी चॅटिंग सुद्धा अगदी आरामात करू शकतो. परंतु जेव्हा व्हिडिओ कॉल आपल्याला ग्रुपमध्ये करायचा असतो तेव्हा मात्र या ॲप्लिकेशनला मर्यादा येतात.

जसं कि सध्या आपण सगळेच कोरोना व्हायरसमुळे घरी बसून आहोत आणि अनेक लोक आपला वेळ सोशल मीडियावर घालवत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम वापरताना तुमचे मित्र व्हिडीओ कॉलचा स्क्रिनशॉट टाकत असतीलच. त्याच्या व्हिडीओ कॉलमध्ये १० ते १५ लोक असतीलच. व्हाट्सअँप वर व्हिडीओकॉल केल्यावर केवळ ४ लोकांसोबतच आपण एकावेळी बोलू शकतो. पण मग अनेक लोकांसोबत व्हिडीओकॉल करायचा असेल तर कोणते ऍप वापरायला हवे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

whereby, Google duo, Free conference, WhatsApp, Skype, Facetime, Free conference call, Go To meeting free, Talky, Jitsi meet, video call apps, group video call app, व्हिडिओ कॉन्फरन्स, गुगल डीओ, ग्रुप व्हिडीओ कॉल
Group video call (Source – Youtube)

whereby

या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या ग्रुप सोबत व्हिडिओ कॉन्फरन्स देखील अगदी आरामात करू शकता. अगदी लहान मीटिंग देखील तुम्ही या ॲपच्या माध्यमातून घडवून आणू शकता.

यासाठी तुम्हाला सर्वात पहिले या ॲप्लिकेशनच्या ऑनलाइन साईटला जाऊन तिथे तुमचे अकाऊंट तयार करायला हवे. एकदा तुमचे अकाऊंट तयार झाल्यानंतर तुम्ही स्वतःची चॅट रूम तयार करू शकता आणि त्याची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना मेसेज ई-मेल आणि इतर सोशल मीडिया एप्सच्या मदतीने पाठवू शकता. तुमचे मित्र साइन-इन न करता देखील या लिंकच्या माध्यमातून तुमच्या या मिटींगला हजर राहू शकतात‌. इतर अनेक ॲप्लिकेशन्सच्या तुलनेत हे एप्लीकेशन हाताळण्यासाठी अत्यंत सोपं आहे त्यामुळे जर तुम्हाला एखादी ऑनलाईन मीटिंग करायचे असेल तर हे ॲप्लिकेशन एक चांगला ऑप्शन आहे हे लक्षात ठेवा.

Google duo

गुगलने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी आणि मीटिंगसाठी याआधी देखील एप्लिकेशन्स तयार केलेले आहेत पण आम्ही तुम्हाला फक्त हेच वापरण्यास सांगत आहोत कारण हे नवीन आहे आणि यातील फीचर्स देखील नवीन आहेत. हे एप्लीकेशन इतर एप्लीकेशन पेक्षा हाताळण्यास सोपे आहे, यामध्ये तुम्हाला फक्त स्वतःचा फोन नंबर द्यायचा आहे आणि तुम्ही ते एप्लिकेशन वापरू शकता जर तुम्हाला आठ मित्रांसोबत मीटिंग करायची असेल तर गुगल डीओ एक चांगला पर्याय आहे.

ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमचे मित्र मंडळ अशी अगदी सहजपणे संवाद साधू शकतात त्यामुळे जर व्हिडिओ मीटिंगसाठी काही शोधत असाल तर एप्लीकेशन नक्कीच कामाचे आहे. विशेष म्हणजे यामध्ये तुम्ही एकावेळी ११ लोकांसोबत व्हिडीओ कॉल करू शकता.

Free conference

हे देखील एक वेगळ्या पद्धतीचं ॲप्लिकेशन आपल्याला उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला अनेक वेगळ्या पद्धतीचे फीचर्स पाहायला आणि अनुभवायला मिळू शकतात. हे ॲप्लिकेशन बिझनेस करणाऱ्या व्यक्तींसाठी जास्त मदत करू शकते. या ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार मीटिंग ठरवू शकता आणि मीटिंगची वेळ झाली कि ॲप्लिकेशन तुम्हाला आठवण देखील करून देईल. या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या मिटिंग बद्दल माहिती देखील सेव्ह करू शकता. तुम्हाला जर बिझनेससाठी एखादं व्हिडिओ मीटिंग ॲप्लीकेशन हवा असेल तर याचा नक्कीच विचार करा.

WhatsApp

व्हाट्सअप बद्दल वेगळं काय सांगणार, याच्या माध्यमातून संपूर्ण जग तुमच्याशी जोडले जाऊ शकते तेही अगदी सोप्या पद्धतीने. या एप्लीकेशनचे संपूर्ण जगामध्ये चांगले नेटवर्क आहे त्यामुळे व्हिडीओ कॉलिंगसाठी सर्वोत्तम म्हणून व्हाट्सअप कडे बघितले जाते. यात मर्यादा फक्त एवढीच आहे की तुम्ही एकाच वेळी सर्वांना व्हिडिओ कॉलवर घेऊ शकत नाही, तुम्हाला एका एका व्यक्तीला या ॲप्लिकेशन मध्ये जोडत जावे लागते आणि केवळ ४ लोकांसोबतच तुम्ही व्हिडीओ कॉल करू शकता. जर ही एक मर्यादा सोडली तर तुम्हाला याच्या सारखे सोपे ॲप्लिकेशन शोधूनही सापडणार नाही.

whereby, Google duo, Free conference, WhatsApp, Skype, Facetime, Free conference call, Go To meeting free, Talky, Jitsi meet, video call apps, group video call app, व्हिडिओ कॉन्फरन्स, गुगल डीओ
WhatsApp video call (Source – Next Web)

Skype

आजची आपली ही यादी या ॲप्लिकेशनच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कारण, संपूर्ण जगामध्ये जसं व्हाट्सअप वापरलं जातं तसंच काही या एप्लीकेशनला देखील पर्याय नाही. हे ॲप्लिकेशन तुम्ही अगदी कुठल्याही उपकरणाने वापरू शकता म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, टॅब अगदी कुठल्याही उपकरणाने.

या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त 50 जणांशी एकाच वेळी व्हिडीओ कॉलिंग द्वारे बोलू शकता आणि तुम्हाला चांगली व्हिडीओ क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्ही हेच ॲप्लिकेशन वापरायला हवे. जर तुम्ही एक उद्योजक असाल तर खरंच तुमच्यासाठी Skype ही एक गरज आहे हे लक्षात ठेवा.

Facetime

फेस टाइम हे ॲप्लिकेशन काही दिवस आधी फक्त वन-टू-वन व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरलं जायचं परंतु काही दिवसांपूर्वी ॲप्लिकेशन अपडेट केले गेले आहे, आता तुम्ही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बत्तीस जणांशी आरामात संपर्क करू शकता अशी व्यवस्था केलेली आहे. ॲप्पलच्या सर्व उपकरणांमध्ये हे ॲप्लिकेशन आधीच इन्स्टॉल केलेलं असतं आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फेस टाइम हे एक उत्तम ॲप्लिकेशन आहे.

Free conference call

मंडळी तुम्हाला जरी या ॲप्लिकेशनचे नाव आधी सांगितलेल्या ॲप्लिकेशन सारखं वाटत असलं तरी हे ॲप्लिकेशन वेगळं आहे. यामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे फिचर्स अनुभवायला मिळू शकतात जसं कि तुम्ही एकावेळी तब्बल १,००० लोकांबरोबर व्हिडीओ कॉल करू शकता. विशेष म्हणजे हे ॲप्लिकेशन प्रोफेशनली वापरळत्या जात असून सुद्धा अगदी फ्रि आहे. त्यामुळे इतर ॲप्लिकेशनच्या तुलनेत हे ॲप्लिकेशन अगदीच तुम्हाला आवडू शकते त्यामुळे एकदा वापरून बघायला काय हरकत आहे.

Go To meeting free

हे देखील एक नावाजलेलं ॲप्लिकेशन आहे. काही दिवसांपूर्वी या ॲप्लीकेशनने सर्वांना फ्री सबस्क्रिप्शन देऊ केलं होतं. ह्या फ्री सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून तुम्ही ३ लोकांसोबत ४० मिनिट पर्यंत व्हिडीओ कॉल करू शकता. स्क्रीन शेअरिंग, मोबाईल सपोर्ट, चॅट सारखे इतरही फीचर्स तुम्हाला या ऍप मध्ये बघायला मिळतील.

Talky

मित्रांनो हे ॲप्लिकेशन मात्र थोडं हटके आहे कारण या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला साईन ईन देखील करायची गरज नाही. या ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही चॅट रूम मध्ये तुमच्या मित्रांना इन्व्हाईट करून अगदी सहजपणे व्हिडीओ कॉल करू शकता. या एप्लीकेशन मध्ये तुम्ही चॅट रूम मध्ये जर तुमच्या मित्रांची वाट बघत असाल तर इथे तुम्ही गेम देखील खेळू शकता. या ॲप्लिकेशन मध्ये जास्तीत जास्त सहा जण व्हिडीओ कॉलिंग करू शकता.

Jitsi meet

हे ॲप्लिकेशन सुद्धा वरच्या Talky ॲप प्रमाणेच आहे. इथे देखील तुम्हाला साइन अप वगैरे करायची गरज नाही. अगदी सहजपणे तुम्ही चॅट रूम मध्ये येऊन मित्रांसोबत व्हिडीओकॉल करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.