Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

विमान १ लिटर इंधनामध्ये किती अंतर पार करू शकतं ?

विमानात प्रवास करायची इच्छा कोणाची नसते ? पण शेकडो लोकांना घेऊन उडणाऱ्या हे विमान किती मायलेज देत असेल याचा विचार केलाय का कधी ?

आपण सामान्यतः प्रवास करताना कार किंवा बसने प्रवास करतो. त्यासाठी खर्च होते डिझेल किंवा पेट्रोल. पण विमानात जे इंधन असते ते वेगवेगळ्या प्रकारचे असते ते म्हणजे,

  • केरोसीन बेस्ड फ्युएल
  • जेट फ्युएल
  • मिलिटरी फ्युएल
  • ए व्ही गॅस
  • मोगॅस
  • बायोफ्युएल
  • व्हाइट गॅसोलीन (पांढरे पेट्रोल)
विमानांची इंधने तयार करत असताना…..

विमानातील इंधन तयार करत असताना इतकी काळजी घेतली जाते कि हे इंधन थंड वातावरणात गोठू नये म्हणजेच बर्फासारखे घट्ट होऊ नये यासाठी त्यात विविध रसायने घातली जातात, ज्यामुळे ते इंधन कोणत्याही तापमानास गोठत नाही. विमानातील इंधन इतके दर्जेदार असते की त्याची जर चाचणी करायची झाली तर त्याचा 145 इतका ओक्टन नंबर येतो, त्यामुळे याची गणना कमर्शियल फ्युएल मध्ये होते. पांढरे पेट्रोल हे घड्याळाच्या साफसफाईसाठी वापरतात, कारण ते चटकन हवेत मिसळून जाते तसेच साचून राहत नाही .

इतके दर्जेदार इंधन असल्याने विमानाच्या पुरवठा पध्दतीत सुध्दा कोणता अडथळा शक्यतो निर्माण होत नाही. हे इंधन सामान्य इंधनापेक्षा जलद पेट घेते त्यामुळे विमान चालू होण्यास काही अडचणी येत नाहीत. विमानातील इंधनाची शुद्धता पातळी जास्त असल्याने ते इंधन अगदी थोड्याशा ऑक्सिजनवर सुध्दा पेट घेऊ शकते, त्यामुळे विमान कितीही उंचावर गेले तरी चालू राहण्यास अडचणी येत नाहीत.

विमानाला चार्जिंग करावी लागते ?

आपण नेहमी बघत असतो की विमान थांबल्यावर एक गाडी येते आणि विमानाला एक जाड अशी केबल जोडते. आपण विचार करतो कि कदाचित विमानात इंधन भरल्या जात असेल, पण तसे नसून त्याद्वारे विमानामध्ये विद्युत पुरवठा केला जातो ज्यामुळे विमानची चार्जिंग होते. कारण विमान जेव्हा थांबते तेंव्हा इंजिन बंद असल्याने विमानात प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विमानास चार्ज केले जाते.

aeroplane mileage, airplane fuel mileage, aeroplane mileage in marathi, aeroplane fuel, fuel used in planes, aeroplane average, विमानाची इंधनपद्धती, विमान किती मायलेज देतं, aeroplane fuel system

विमानाला लागणारे सगळे इंधन हे त्याच्या पंखामध्ये असते कारण जरी आग लागली तरी प्रथम विमानाचे पंख पेट घेतात त्यामुळे प्रवाश्यांना लगेच काही नुकसान होण्याची शक्यता नसते. विमानातील इंधन भरत असताना ते इंधन अस्सल आहे कि नाही शिवाय ते योग्य रीतीने पेट घेते की नाही याची पडताळणी करूनच ते भरले जाते, त्यामुळे वैमानिक निर्धास्त राहतो.

विमानाच्या पंखात इंधन भरत असताना विमानाची इंधनपद्धतीची रचना अशी असते कि इंधनाच्या टाक्या एकमेकांना जोडलेल्या असतात, त्यामुळे एका बाजूचे इंधन जरी संपले तरी दुसऱ्या बाजूने इंधन संपलेल्या जागी जाऊन बसते आणि पातळी समान होते, त्यामुळे विमानाचा बॅलन्स कायम राहतो.

विमानाची इंधन टाकी कशी असते ?

विमानातील इंधन टाक्या ह्या इतक्या मोठ्या असतात कि एका टाकीत दोन माणसे आरामात बसू किंवा पाय पसरून झोपू शकतील. इंधन टाकीतील इंधन हे गरम होऊन पेट घेऊ नये यासाठी एक वेगळे नियोजन असते ते म्हणजे इंधन टाकी भोवती वॉटर जॅकेट असतात व त्यासाठी रेडीएटर सुद्धा बसवले असतात. ते व्यवस्थित काम करावे यासाठी थर्मोस्टॅटिक एलिमेंट सुद्धा बसवले असतात त्यामुळे इंधन कार्यकारी तापमानात राहून ते पेट घेऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते.

अश्या सुव्यवस्थित टाक्यांमध्ये विमानाचा प्रवास विचारात घेऊन योग्य प्रमाणात विमानातील इंधन भरले जाते. ह्या शिवाय विमानाला संकटकाळी लागणारे ज्यादाचे इंधन देखील विमानात भरले जाते, त्यासाठी एक वेगळी टाकी असते. विमानाच्या इंजीनला इंधन पुरवठा करण्यासाठी प्रत्येक इंजिनला एक असा फ्युएल पंप असतो जो टाकीतून इंधन ओढून घेऊन इंजिन पर्यन्त पोहोचवतो.

आता विमानाच्या मायलेज बद्दल जाणून घेऊया

आपल्याला बोईंग 747 या विमानातील इंधन कशाप्रकारे खर्च होते माहित आहे का ? तर हे विमान 882 किमी प्रति तास धावू शकते पण ह्याला एक किलोमीटर जायचे झाले तर हे विमान 1.5 लिटर इतके इंधन खाते. जर विमान एक सेकंदात 4 किमी अंतर कापत असेल तर प्रती सेकंद ते विमान 4 लिटर पेक्षा जास्त इंधन फस्त करते.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.