Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

इतिहासात झाकल्या गेलेले प्राचिन भारतातील 5 महान वैज्ञानिक

प्राचिन भारतीय इतिहासामध्ये अशी कित्येक उदाहरणं आहेत जी जाणून घेतल्यावर आपल्याला भारतीय असल्याचा गर्व वाटतो.

प्राचिन काळातील काही भारतीय वैज्ञानिक ग्रंथांचा उल्लेख इतिहासात सापडतो. विज्ञानाच्या क्षेत्रात नंतरच्या काळात लागलेल्या अनेक शोधांचा ह्या ग्रंथात उल्लेख सापडतो. परंतु काळाच्या ओघात हि प्राचीन भारतातील शास्त्रज्ञ कुठेतरी पडद्यामागे झाकली गेली. म्हणून आज आपण प्राचीन भारतातील ५ महान वैज्ञानिकांबद्दल जाणून घेणार आहोत.

प्राचिन भारतातील ५ महान वैज्ञानिक (Ancient Indian Scientist)

आर्यभट्ट (Aryabhata)
aryabhata information in marathi, maharshi kanad information in marathi, rishi boudhayan in marathi, bhaskaracharya in marathi, maharshi sushruta in marathi, great indian scientists information in marathi, great indian scientists of ancient india information in marathi, plastic surgery origin in india, sidhant shiromani, maharshi kanad atomic theory
Aryabhata

आर्यभट्ट यांची गणना भारतातील महान खगोल वैज्ञानिकांमध्ये केली जाते. त्यांनी त्या काळात ब्रह्मांडांच्या रहस्यांना जगासमोर आणले होते जेव्हा जगातील काही लोकांना अंक देखील मोजता येत नव्हते. पृथ्वी आणि सुर्याच्या संबंधा बद्दल सर्वप्रथम सांगणारा माणूस निकोलस कोपरनिकस होता असे आपणास सांगण्यात येते परंतू Aryabhata यांनी ही गोष्ट कोपरनिकसच्या आधी हजारो वर्षापुर्वीच सिध्द केली आहे.

आर्यभट्ट यांनीच हे प्रथम सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसेच चंद्र व इतर ग्रह सूर्यापासूनच प्रकाश मिळवतात, अर्थात ते स्वयंप्रकाशित नाहीत. बीजगणिताचा प्रथम वापर करणाऱ्या महान गणितज्ञाच्या यादीत आर्यभट्टांचा समावेश होतो. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल कि आर्यभट्टांनी आपली प्रसिद्ध रचना “आर्यभट्टीय” जे गणितासंबंधीच्या दुर्मिळ ग्रंथांपैकी एक मानले जाते ती एका कवितेच्या रूपात लिहिलेली आहे. तसेच Aryabhata ह्यांनी जगाला अंकगणित, त्रिकोणमिती व बीजगणित इत्यादी संबंधी ३३ नियमांची देणगी दिलेली आहे, हीच नियमावली पुढील काळात सिद्धांत व प्रमेयात बद्ध करण्यात आली आहे.

महर्षी कणाद (Maharshi Kanad)

महर्षी कणाद यांना परमाणू सिद्धांताचे जनक मानले जाते. जॉन डॉल्डच्या हि आधी हजारो वर्षांपूर्वी महर्षी कणाद यांनी सांगितलेलं की जगाची उत्पत्ती अती सूक्ष्म कणांपासून झाली. परमाणू सिद्धांताचे जनक जॉन डॉल्टन यांना मानलं जाते परंतू त्यांच्याही आधी तब्बल ९०० वर्षांपूर्वी Maharshi Kanad यांनी लिहीलेल्या सुत्रांच्या आधारावर परमाणू सिंद्धांताचा शोध लागला आहे.

असे सांगण्यात येते कि एक दिवस महर्षी कणाद एक फळ हाताने कुरतडत बसले होते. बऱ्याच वेळ असं करत राहिल्याने एक वेळ अशी आली जेव्हा त्या फळाचे अजून तुकडे करणं शक्य नव्हतं. ह्या घटनेचे चिंतन केल्यांनतर त्यांनी हा निष्कर्ष काढला कि कुठल्याही वस्तू अथवा पदार्थाचे खूप सूक्ष्म असे बारीक तुकडे केले जाऊ शकतात परंतु हे सूक्ष्म रूप आपण उघड्या डोळांनी बघू शकत नाही. हुआ

बौधायन (Baudhāyana)
aryabhata information in marathi, maharshi kanad information in marathi, rishi boudhayan in marathi, bhaskaracharya in marathi, maharshi sushruta in marathi, great indian scientists information in marathi, great indian scientists of ancient india information in marathi, plastic surgery origin in india, sidhant shiromani, maharshi kanad atomic theory
Baudhayana

शून्यशास्त्राचे शोधकर्ते व पहिले गणितज्ञ बौधायन ह्यांनी लावलेल्या शोधांना फार महत्व आहे. खूप कमी लोकांना माहित आहे की ज्याला आपण पायथागोरस सिद्धांत म्हणून ओळखतो तो शोध पायथागोरसने नव्हे तर भारतीय Baudhāyana यांनी लावला आहे. पायथागोरसच्या अगोदर या प्रमेयाचा शोध बौधायनने अडीचशे वर्षापुर्वी इसवी सन पूर्व ८०० मध्ये लावला होता.

भास्कराचार्य (Bhasar II)

सिद्धांत शिरोमणि या महान ग्रंथाचे जनक असलेले महान गणितज्ञ व ज्योतिषी भास्करचार्य (भास्कर द्वितीय) ह्यांना तुम्ही जाणताच. ह्या सिद्धांत शिरोमणि ग्रंथातच लिलावती, बिजगणित, ग्रहगणित व गोलअध्यायनम असे चार भाग आहेत. आपल्याला असे संगितले आहे की न्यूटनने गरुत्वाकर्षणाचा सिद्धांताचा शोध लावला पण ह्या सिद्धांतविषयी तर भास्करचार्‍यांनी त्यांच्या ग्रंथात हजारो वर्षांपूर्वीच लिहून ठेवले होते.

हा ग्रंथ लिहिला तेव्हा भास्करचार्य केवळ ३६ वर्षांचे होते. सिद्धांत शिरोमणि या ग्रंथाचे ४ भाग आहेत, ते असे लीलावती, बीजगणित, ग्रहगणिताध्याय व गोलाध्याय.

महर्षी सुश्रुत (Maharshi Sushrut)
aryabhata information in marathi, maharshi kanad information in marathi, rishi boudhayan in marathi, bhaskaracharya in marathi, maharshi sushruta in marathi, great indian scientists information in marathi, great indian scientists of ancient india information in marathi, plastic surgery origin in india, sidhant shiromani, maharshi kanad atomic theory
Maharshi Sushrut – Founding father of Surgery

शल्य चिकित्सा जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते असे महर्षी सुश्रुत यांनी जगाला असे ज्ञान दिले ज्यामुळे वैद्यकीय विश्व व सबंध मानवजातीचा चेहराच बदलून गेला आहे. इसवीसन पूर्व ६०० या कालखंडात जन्मलेल्या सुश्रुत यांना प्लास्टिक सर्जरीचे जनक असेही संबोधले जाते.

त्यासंबंधीची एक कथा सुद्धा प्रचलित आहे, एका रात्री Sushrut आपल्या निवास्थानी झोपलेले असताना एक वाटसरू जखमी अवस्थेत त्यांच्यापाशी आला. त्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती व रक्तस्त्राव होत होता. सुश्रुत यांनी आपल्या शल्यचिकित्सेचे ज्ञान व कौशल्य याचा वापर करून त्या जखमी वाटसरूच्या गालाचे मांस कापून ते नाकाला लावले व त्याला योग्य आकार दिला. ह्यालाच आज आपण Plastic Surgery म्हणतो.

Leave A Reply

Your email address will not be published.