Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

भर मिटिंग मध्ये आनंद महिंद्रा बिल गेट्सना म्हणाले… “मी तुमचा द्वेष करतो”

हा किस्सा तेव्हाचा आहे ज्यावेळी एका बिझनेस मिटिंगसाठी बिल गेट्स महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना भेटायला आले होते. पण आनंद महिंद्रा यांच्या एका वाक्याने रूममध्ये विचित्र शांतता पसरली

नोकरी करायची की व्यवसाय हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. काहीही केलं तरी फायदे-तोटे असणारच. नोकरी केली तर महिन्याला ठराविक पगार हा पक्का असतो, कामही ठराविक वेळेपर्यंत करायचं असतं.

परंतु या नोकरदारांना स्वतः कुठलाही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसतं, त्याला हुकूमबर काम करावं लागतं. व्यवसाय म्हटलं की चित्र वेगळं असतं….. कुणाची बॉसिंग नाही, आपणच आपले मालक… आपले निर्णय आपण घ्यायला मोकळे. अर्थात यात टेंशन्स भरपूर.. दिवसाचे २४ तासही पुरत नाहीत.

आपला व्यवसाय असल्याने प्रत्येक बारीक बारीक गोष्टींत आपल्याला लक्ष घालणं भागच असतं. त्यातही व्यवसाय चालला तर ठीक आणि न चालला तर मोठी मुश्किल.. अशा या व्यवसायात उडी घेणं मोठं जिकिरीचं काम ! आपल्याबरोबर भागीदार असला तर अनेक गोष्टी जुळवूनही घ्याव्या लागतात !!

भारतातील अनेक व्यवसाय हे केवळ भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहेत. अशा या यशस्वी बिझनेसमेन्सच्या मागे काही प्रेरणादायक कथा आहेत, काही रंजक कथा आहेत तर काही यांचं सेन्स ऑफ ह्युमर दाखवतात.

“महिंद्रा अँड महिंद्रा” (Mahindra & Mahindra) या प्रथितयश नावामागेही असाच एक रोचक किस्सा आहे. जगदीशचंद्र महिंद्रा व कैलाशचंद्र महिंद्रा या दोन बंधूंमुळे “महिंद्रा अँड महिंद्रा” जन्माला आली हे सगळे जाणतात. हे दोघे बंधू “के सी महिंद्रा” व “जे सी महिंद्रा” म्हणून ओळखले जायचे.

परंतु या दोघांबरोबर भागीदारी करणारी तिसरीही व्यक्ती होती…ती म्हणजे गुलाम मोहम्मद ! मोहम्मद नावाच्या सुरुवातीच्या अक्षरामुळे व महिंद्रामुळे कंपनीचं नामकरण “एम अँड एम” असं झालं होतं…..ही कंपनी स्टील निर्मितीसाठी प्रसिद्ध होती.

anand mahindra, bill gates, mahindra and mahindra, microsoft, harvard university, anand mahindra stories, anand mahindra kisse, bill gates kisse, anand mahindra and bill gates classmates, आनंद महिंद्रा, बिल गेट्स, हार्वर्ड, आनंद महिंद्रा किस्से

१९४५ मध्ये हिची स्थापना झाली व लगेचच ही नावारूपालाही आली. १९४७ मध्ये भारत पाक फाळणीच्या वेळी गुलाम मोहम्मद या भागीदाराने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला.. त्यावेळी तो कंपनीमध्ये मोठा शेअर होल्डर होता.

सगळं द्रुतगतीने व उत्तम सुरू असताना भागीदार वेगळा होणार म्हटल्यावर महिंद्रा बंधूंना धक्काच बसला ! दोनच वर्षात प्रगती करणारी ही कंपनी दोनच वर्षांनी बंद देखील पडते की काय असं महिंद्राना वाटू लागलं.

परंतु व्यवसायात चढ-उतार हे ठरलेले असतात, त्यासाठी मनाची तयारी आधीपासूनच असावी लागते. तसंच जगातील इतर व्यवसायांच्या उलाढालीवरही लक्ष असणं गरजेचं असतं. कंपनीचा एक मोठा शेअर होल्डर कंपनी सोडणार म्हटल्यावर महिंद्रा बंधूंनी स्टीलच्या क्षेत्रातून ऑटो सेक्टरमध्ये पदार्पण केलं. आणि आज ही कंपनी चक्क मल्टिनॅशनल वेहिकल मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन झाली आहे !!

महिंद्रा बंधूंच्या यशोगाथेचा हा सूर्य असाच आजही तळपत आहे. जगदीशचंद्र महिंद्रा यांचा मुलगा हरीश महिंद्रा व त्यांचा मुलगा आनंद महिंद्रा इथपर्यंत या कंपनीचा प्रवास झाला आहे.

आभाळाएवढं यश मिळवणारी ही मंडळी फार गंभीर वगैरे असावीत असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. परंतु तीही अखेर माणसंच ! त्यांनाही भाव-भावना असणारच, दुःख-आनंद असणारच… हलक्या फुलक्या हास्य विनोदाची त्यांनाही गरज असतेच ! किंबहुना व्यवसायाच्या प्रचंड डोलाऱ्याला सांभाळताना असे काही क्षण ताण कमी करायला मदतच करतात !!

असाच एक रंजक किस्सा नुकताच प्रसिद्ध झाला तो आनंद महिंद्राच्या बाबतीत. सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असलेल्या आनंद यांचे जवळपास ८० लाख फॉलोअर्स आहेत.

त्यातीलच एका यूजरने आनंद महिंद्रा व बिल गेट्स यांच्या मिटिंगचा १९९७ मधला एक फोटो पोस्ट केला. हा फोटो त्याने बिल गेट्स (Bill Gates) यांच्या “इंसाईड बिल्स ब्रेन-डीकोडिंग बिल गेट्स” या डॉक्युमेंटरी मध्ये बघितला होता.

त्या यूजरने या फोटोविषयी अधिक माहिती विचारली. आनंद महिंद्रा यांनी सर्वप्रथम या यूजरचे आभार मानले, कारण १९९७ मध्ये कॅमेरा फोन नसल्याने त्यांच्या स्वतःकडे हा फोटो नव्हता. तसेच त्यांनी गेट्स यांची डॉक्युमेंटरीही बघितली नव्हती. हा फोटो प्रसारित झाला तो केवळ फॉर्च्युन मॅगझीनच्या एका फोटोग्राफरच्या उपस्थितीमुळे !!

Anand Mahindra यांनी लगेच ट्विट करून सांगितले, “हा फोटो शेअर करण्यासाठी तुमचे आभार ! त्यावेळी कॅमेरा फोन नव्हते त्यामुळे माझ्याकडे हा फोटो नव्हता तसेच मी गेट्स यांची डॉक्युमेंटरीही बघितली नाही, म्हणून मला या फोटोविषयी माहिती नव्हती…”

अर्थात हा फोटो आता एवढ्या वर्षांनंतर बघितल्यामुळे महिंद्रा यांना आपल्या त्यावेळची मिटिंग आठवली असावी व तो किस्साही आठवला असावा. ते पुढे सांगतात –

“१९९७ मधील माझी व बिल गेट्स यांच्यातील ती मिटिंग होती. मायक्रोसॉफ्टचा सर्वेसर्वा असलेला हा माणूस हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये माझा क्लासमेट होता मायक्रोसॉफ्ट सुरू करण्यासाठी त्यांनी कॉलेज मधूनच सोडून दिलं. माझी व त्यांची विशेष ओळख नव्हती. परंतु मिटिंग रूममध्ये येताच बिल मला म्हणाले ‘आपण हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एकत्र शिकलो आहोत.’

मी म्हणालो, “हो, पण मला तुमच्याबद्दल द्वेष वाटतो… रूममध्ये विचित्र शांतता पसरली. कुठल्या माणसाबरोबर मिटिंग करायला आलो असे भाव उपस्थितांच्या चेहऱ्यावर होते. परंतु बिल शांत होते. त्यांनी विचारल्यावर मी म्हणालो, “माझ्या मुलीने एकदा मला विचारलं होतं की तुमच्या बरोबर शिकणारे आता कुणी प्रसिद्ध व्यक्ती आहेत का ?

मी जेव्हा तिला तुमचं नाव सांगितलं तेव्हा ती मला चक्क “लूजर” म्हणाली. तर मिस्टर बिल गेट्स, माझ्या मुलांच्या नजरेत मी लूजर ठरतो ते केवळ तुमच्यामुळे ! यानंतर मीटिंगमध्ये हास्य पसरले…. “

anand mahindra, bill gates, mahindra and mahindra, microsoft, harvard university, anand mahindra stories, anand mahindra kisse, bill gates kisse, anand mahindra and bill gates classmates, आनंद महिंद्रा, बिल गेट्स, हार्वर्ड, आनंद महिंद्रा किस्से

अर्थात महिंद्रा यांची ही मिटिंग काही क्लासमेट बिल गेट्स सोबत नव्हती तर मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ४.० वापरणाऱ्या सुरुवातीच्या कंपन्यांपैकी एक कंपनी होती “महिंद्रा अँड महिंद्रा” …त्यासाठी ती बिझनेस डील होती.

आपल्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह राहणं वेगळं, वेगवेगळ्या स्टोरीज शेअर करणं वेगळं व एका फॉलोअरच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एखादा किस्सा शेअर करणं तेही त्याचे आभार मानून…हे वेगळं…

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्या सारखी मोठी माणसं त्यांच्या कर्माने तर मोठी आहेतच, परंतु त्यांच्या अशा शालीन वर्तनानेही मोठी आहेत….

Leave A Reply

Your email address will not be published.