Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

बॅटिंगला जायची वेळ आली तरी व्ही.व्ही.एस लक्ष्मणची मात्र अंघोळच सुरु होती

ड्रेसिंग रुममध्ये एकच धावपळ उडाली. लक्ष्मण अंघोळीला गेला म्हणून कोणी गांगुलीला पॅड बांधत होता तर कोणी टीशर्ट-ट्राउझर आणून देत होता

क्रिकेट आणि नशिबामध्ये एक गोष्ट अगदी समान आहे. दोन्ही गोष्टी ‘कधी – कुठे – कशा’ वळण घेतील काही सांगता येत नाही. क्रिकेट हा तसा कौशल्याचा खेळ, इथे नशिबावर आधारित फारसं काही नसतं.

मात्र एखाद्याचं बॅटिंगला जाणं ठरलेलं असताना निव्वळ अंघोळीच्या कारणानं दुसऱ्याला जावं लागणं. याला नशिबाची थट्टा नाही, तर दुसरं काय म्हणावं. नेमका काय होता तो प्रसंग, चला तर जाणून घेऊया….

भारतीय संघाचा साऊथ आफ्रिका दौरा

२००७ साली केपटाऊन येथे भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका असा कसोटी सामना रंगला होता. पहिली इनिंग पार पडली. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचे सलामी वीर वसिम जाफर आणि वीरेंद्र सेहवाग बाद झाल्यानंतर क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे बॅटिंगला जाणे अपेक्षित होते. कारण बॅटिंग ऑर्डरच तशी सेट करण्यात आली होती.

पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी वसीम आणि वीरेंद्र होते. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी राहूल आणि सचिन. तर ५ व्या स्थानी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांपैकी एक व्ही.व्ही.एस लक्ष्मण होता.

सचिन १२ मिनिटांसाठी मैदाना बाहेर

व्ही.व्ही.एस लक्ष्मण म्हणजे भारताच्या क्रिकेट इतिहातील एक असा खेळाडू ज्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत १९ हजार ७३० धावा काढत ५५ शतकं रचली आणि भारताला अनेक सामने जिंकून देत विजयी पताका रोवली.

vvs laxman stats, vvs laxman full name, Vangipurapu Venkata Sai Laxman, vvs laxman kisse, south africa tour 2007, cricket kisse, team india, saurav ganguly, क्रिकेट किस्से, व्ही व्ही एस लक्ष्मण, साऊथ आफ्रिका दौरा, सौरभ गांगुली
VVS Laxman in Marathi

मात्र त्या दिवशी केपटाऊनमध्ये सुरु असलेल्या सामन्यात, भारताचे सलामीवीर वसिम आणि सेहवाग तंबूत परतताच, पॅड-हेलमेट घालून बॅटिंगला निघालेल्या सचिन तेंडुलकरला फोर्थ अंपायरने रोखले.

त्याचं झालं असं की आदल्या दिवशी संध्याकाळी, सचिन १२ मिनिटांसाठी मैदानाच्या बाहेर आला आणि तोपर्यंत आफ्रिकेचा पूर्ण संघ बाद झाला.

१२ मिनिटं मैदानाच्या बाहेर राहिल्याने सचिनला १२ मिनिटांसाठी बॅटिंग करता येणार नाही, हे दुसऱ्या दिवशी सकाळीच अंपायरनी कळवणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही.

सचिनला ऐनवेळेला बॅटिंग करण्यापासून रोखण्यात आलं. साहजिकच होतं की आता ५ व्या स्थानी असलेल्या व्ही.व्ही.एस लक्ष्मणला बॅटिंगला जावं लागणार.

बॅटिंगची वेळ आली असता व्ही.व्ही.एस लक्ष्मण अंघोळीला

असं म्हणतात, आपलं काम हिच खरी आपली पूजा असते. खेळाडूसाठी खेळणंच काम असल्याने तीच त्याची पूजा बनते. आणि पूजेला बसण्याआधी अंघोळ करणं महत्वाचं असतं.

म्हणूनच की काय, वसीम बाद होताच, काही वेळाने आपल्याला मैदानात उतरावे लागेल, या विचाराने VVS Laxman (Vangipurapu Venkata Sai Laxman) अंघोळीला गेला.

मात्र वसिमची विकेट पडल्यानंतर काही वेळातच दुसरी विकेटही लगेचच पडली. चौथ्या स्थानी असलेल्या सचिनलाही अंपायरने बॅटींगला जाण्यापासून रोखले. पाचव्या स्थानी असलेला व्ही.व्ही.एस अंघोळ करत होता.

त्यामुळे आता बॅटिंगला जायचं तर जायचं कोणी हा प्रश्न निर्माण झाला आणि व्ही.व्ही.एसच्या जागी सौरभ गांगुलीने मैदानावर जायचा निर्णय घेतला. ड्रेसिंग रुममध्ये एकच धावपळ उडाली. कोणी गांगुलीला पॅड बांधत होता, कोणी टीशर्ट-ट्राउझर आणून देत होता, तर कोणी बॅट देत होता. फारच घाईघाईत गांगुली मैदानावर उतरला.

अचानक मैदानावर गेलेल्या गांगुलीचे ४६ रन्स

अंघोळ करुन बाहेर आल्यावर सारा घडला प्रकार व्ही.व्ही.एसला कळला. अचानक बॅटिंगला गेलेल्या सौरभ गांगुलीने ८९ बॉल्समध्ये ४६ रन्स केले. तर मागून उशीरा बॅटिंगला गेलेला व्ही.व्ही.एस लक्ष्मण (VVS Laxman) काही खास कामगिरी न करताच रन आऊट होत तंबुत परतला.

भारत तो कसोटी सामना हरला. मात्र या विचित्र वजा हास्यास्पद प्रसंगामुळे आजही तो सामना सर्व खेळाडूंच्या लक्षात आहे. व्ही.व्ही.एस लक्ष्मणला व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण असंही म्हणतात, कारण लक्ष्मणची कामगिरी सुद्धा फार स्पेशल आहे.

आपल्या क्रिकेट करिअर मध्ये लक्ष्मणने १३४ टेस्ट मॅच आणि ८६ वन डे मॅच खेळल्या असून त्यात प्रत्येकी ८७८१ आणि २३३८ धावा कुटल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये लक्ष्मणच्या नावे १७ शतक आणि ५६ अर्धशतकं आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.