Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडचे ते कलाकार ज्यांनी आपला धर्म बदलला

बॉलिवूड मधील कलाकारांचा धर्म हा नेहमीच चर्चेही विषय राहिला आहे. अनेक बड्या कलाकारांनी काही ना काही कारणास्तव आपला धर्म बदलला आहे. बघुयात कोण आहेत हे कलाकार

आपल्या देशात धर्माला फार महत्त्व दिले जाते. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो. भारतात अनेक धर्मांचे लोक राहतात, प्रत्येक धर्मातील लोकांच्या वेगवेगळ्या देवावर श्रद्धा असते. आपल्यासाठी धर्मांतर हा शब्द काही वेगळा नाही. मागील काही दशकापासून चालत आलेल्या धर्मांतराला धार्मिक भाषेत म्हटले जाते की, एका सांप्रदायाचे पालन करणे सोडून दुसऱ्या सांप्रदायाशी आपली श्रद्धा ठेवणे म्हणजेच धर्मांतर होय.

bollywood celebrities, bollywood actress, bollywood stars, changed religion, conversion, bollywood actors changes religion, hindu, sikh, islaam, Christianity, dharm, bollywood marriages, बॉलिवूड कलाकार, धर्म बदलला, हिंदू, शीख, इस्लाम, A R Rahman religion, Hema Malini religion, Dharmendra religion, Mahesh Bhatt religion

धर्मांतर करण्याचे अनेक कारणे असू शकतात वैवाहिक कारण, मृत्यूचे कारण, आपल्या सोयीसाठी धर्मांतर किंवा सक्तीने केलेले धर्मांतर. स्वतंत्र निवडीद्वारे लोक विविध कारणांमुळे भिन्न धर्मात धर्मांतर करतात. बॉलिवूडमध्येही असे बरेचसे कलाकार आहेत ज्यांनी काही कारणांमुळे आपला धर्म बदलला होता.

बॉलिवूडच्या ह्या कलाकारांनी केले आहे धर्मांतर (These Bollywood Celebrities changed their Religion)

नर्गिस दत्त (Nargis Dutt)

नर्गिस दत्त यांनी प्रेमासाठी धर्मांतर केले होते. नर्गिस एका युवकाच्या प्रेमात पडलेल्या ज्याचे नाव सुनील दत्त असे होते, हो सुपरस्टार सुनील दत्त. पण त्यांच्या लग्नांमध्ये दोघांचा धर्म आडवा येत होता कारण सुनील दत्त होते हिंदू तर नर्गिस दत्त होत्या मुस्लिम. पण त्यांनी धर्मापेक्षा आपल्या प्रेमाला महत्त्व दिले.

सुनील दत्त आणि नर्गिस दत्त या दोघांनी मदर इंडिया या चित्रपटात एकत्र काम केले होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम झाले आणि दोघांनी लग्न करायचे ठरवले. नर्गिस दत्त यांनी निर्भिडपणे हिंदू धर्म स्वीकारला आणि निर्मला दत्त हे हिंदू नावही ठेवले. यावर त्यांचे चाहते आणि लोक सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी आपले लग्न लपवून न ठेवता सार्वजनिक रित्या उघड देखील केले होते.

ए. आर. रेहमान (A R Rahman)
bollywood celebrities, bollywood actress, bollywood stars, changed religion, conversion, bollywood actors changes religion, hindu, sikh, islaam, Christianity, dharm, bollywood marriages, बॉलिवूड कलाकार, धर्म बदलला, हिंदू, शीख, इस्लाम, A R Rahman religion, Hema Malini religion, Dharmendra religion, Mahesh Bhatt religion
A R Rahman changed his religion from Hindu to Islam

प्रसिद्ध भारतीय संगीतकार, गायक आणि संगीत निर्माते म्हणून ओळखले जाणारे ए आर रेहमान यांच्याबद्दल माहित नाही असे कदाचितच काही लोक भारतात असतील. बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल की ए. आर. रेहमान यांचा जन्म हिंदू परिवारात झाला होता. त्यांचे खरे नाव ‘ए. एस. दिलीप कुमार’ असे होते. वीस वर्षाचा असताना रहमानने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपले नाव ‘ए एस दिलीप कुमार’ वरून ‘ए आर रेहमान’ असे ठेवले.

अमृता सिंग (Amrita Singh)

सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1958 रोजी ‘रुखसाना सुल्ताना’ आणि आर्मी ऑफिसर असलेले ‘शिविंदर सिंग विर्क’ यांच्या पोटी झाला होता. अमृता सिंग यांनी 1991 रोजी सैफ अली खान यांच्याशी इस्लामी पध्दतीने लग्न केले.

मूळ शीख धर्माच्या असलेल्या अमृता सिंग यांनी लग्नाच्या आधी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. सैफ आणि अमृता यांचे लग्न सैफ अली खान यांच्या परिवाराला मान्य नव्हते कारण अमृता सिंग ह्या सैफ अली खान पेक्षा तब्बल अकरा वर्षाने मोठ्या होत्या.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र (Hema Malini and Dharmendra)
bollywood celebrities, bollywood actress, bollywood stars, changed religion, conversion, bollywood actors changes religion, hindu, sikh, islaam, Christianity, dharm, bollywood marriages, बॉलिवूड कलाकार, धर्म बदलला, हिंदू, शीख, इस्लाम, A R Rahman religion, Hema Malini religion, Dharmendra religion, Mahesh Bhatt religion
Dharmendra converted to Islam to marry Hema Malini

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि बॉलिवुड अभिनेते धर्मेंद्र यांचे प्रेम प्रकरण जवळपास सर्वानाच माहिती असेल. धर्मेंद्र यांचे पाहिले लग्न 1954 रोजी प्रकाश कौर यांच्याशी झालेले होते. ‘तुम हसीन मै जवान’ या चित्रपटाच्या सेट वर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. बॉबी देओल, सनी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल हे चार मुले असूनही धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले होते.

आपल्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. परंतु हिंदू धर्मात दोन विवाह करता येत नसल्याने दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता कारण त्यांची पहिली पत्नी घटस्फोट घेण्यास तयार नव्हती.

महेश भट्ट (Mahesh Bhatt)

महेश भट्ट यांनी आपली प्रियसी ‘सोनी रझदान’ सोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. यामागचे कारण असे होते कि त्यांना आपल्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घ्यायचा नव्हता.

हेझल किच (Hazel Keech)
bollywood celebrities, bollywood actress, bollywood stars, changed religion, conversion, bollywood actors changes religion, hindu, sikh, islaam, Christianity, dharm, bollywood marriages, बॉलिवूड कलाकार, धर्म बदलला, हिंदू, शीख, इस्लाम, A R Rahman religion, Hema Malini religion, Dharmendra religion, Mahesh Bhatt religion
Bollywood Celebrities who changed their Religion

सलमानच्या बॉडीगार्ड ह्या चित्रपटात करीना कपूरच्या मैत्रिणीचा रोल करणारी हेझल चांगलीच प्रसिद्ध झाली. तिच्या प्रसिद्धी मागे बॉलिवूड पेक्षा तिचं आणि युवराज सिंग यांचं प्रेमप्रकरण कारणीभूत होतं. युवराज सिंग बरोबर लग्न करण्यासाठी तिने शीख धर्म स्वीकारला आणि आपले नाव गुरबसंत कौर ठेवले.

Leave A Reply

Your email address will not be published.