Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा किती वेतन मिळते ?

काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना (Chief Minister Salary) देशाच्या पंतप्रधानापेक्षा जास्त पगार मिळतो. कोणती आहेत ती राज्य ?

आपल्यापैकी प्रत्येकजण घराचा कारभार चालवण्यासाठी काही ना काही काम करतो, त्या मोबदल्यात आपल्याला पगार मिळतो. पण कधी हा विचार केलाय का, जे आपल्या राज्याचा कारभार चालवतात त्यांना त्यांच्या कामासाठी किती (Chief Minister Salary) मोबदला मिळतो ?

जसा देशाचा कार्यकारी प्रमुख पंतप्रधान असतो तसा राज्याचा कार्यकारी प्रमुख मुख्यमंत्री असतो. देश पातळीवर जे अधिकार पंतप्रधानांना असतात तेच अधिकार राज्यपातळीवर मुख्यमंत्र्याला असतात.

थोडक्यात काय तर मुख्यमंत्री हा राज्याचा कारभारी असतो.

६ ऑगस्ट २०१९ पर्यंत देशात २९ राज्य होती. मात्र जम्मू काश्मीर राज्याला केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा दिल्यापासून राज्यांची संख्या २८ वर आली आहे. राज्य कुठलेही असले तरी मुख्यमंत्र्यांचे अधिकार हे समानच असतात. मात्र हीच समानता त्यांच्या वेतनाच्या बाबतीत दिसत नाही.

salary of prime minister of india, cm salary in india 2020, president salary in india, salary of chief minister of maharshtra, CM Uddhav Thackeray salary, Maharashtra CM Monthly Salary, मुख्यमंत्र्यांचा पगार, मुख्यमंत्र्यांना दरमहा किती वेतन मिळते, Chief ministers monthly salary in marathi

विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे मासिक वेतन | Monthly Salary of Chief Ministers in India | Chief Minister Salary

तेलंगणा – ४ लाख १० हजार

दिल्ली – ३ लाख ९० हजार

उत्तर प्रदेश – ३ लाख ६५ हजार

महाराष्ट्र – ३ लाख ४० हजार

आंध्र प्रदेश – ३ लाख ३५ हजार

गुजरात – ३ लाख २१ हजार

हिमाचल प्रदेश – ३ लाख १० हजार

हरियाणा – २ लाख ८८ हजार

झारखंड – २ लाख ७२ हजार

मध्य प्रदेश – २ लाख ५५ हजार

छत्तीसगढ – २ लाख ३० हजार

पंजाब – २ लाख ३० हजार

गोवा – २ लाख ३० हजार

बिहार – २ लाख १५ हजार

पश्चिम बंगाल – २ लाख १० हजार

तामिळनाडू – २ लाख ५ हजार

कर्नाटक – २ लाख

सिक्कीम – १ लाख ९० हजार

केरळ – १ लाख ८५ हजार

राजस्थान – १ लाख ७५ हजार

उत्तराखंड – १ लाख ७५ हजार

ओरिसा – १ लाख ६० हजार

मेघालय – १ लाख ५० हजार

अरुणाचल प्रदेश – १ लाख ३३ हजार

आसाम – १ लाख २५ हजार

मणिपूर – १ लाख २० हजार

नागालँड – १ लाख १० हजार

त्रिपुरा – १ लाख ५ हजार ५००

वरील यादी पाहिल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आर्थिक दृष्ट्या सबल असणारी राज्य आपल्या मुख्यमंत्र्यांना चांगले वेतन देतात. याउलट आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारी राज्य आपल्या मुख्यमंत्र्यांना कमी वेतन देतात उदा. ईशान्येकडील राज्य.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दरमहा ५ लाख रुपये वेतन मिळते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २ लाख ८० हजार रुपये.

येथे एक आश्चर्यची बाब अशी की तेलंगणा, दिल्ली आणि उत्तरप्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन राज्यपाल आणि पंतप्रधानांपेक्षाही अधिक आहे. तेव्हा आता या गोष्टी कायम लक्षात असुद्या. कारण कोणती माहिती कधी कामी येईल, हे सांगता येत नाही !


Leave A Reply

Your email address will not be published.