Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य १७३ वर्षे कसे टिकले ?

महाराष्ट्रासह जगभरातील कोट्यवधी लोकांचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकासाठी एक प्रेरणास्तोत्र आहेत. अनेक इतिहासकारांच्या माहितीनुसार हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न शहाजीराजेंचे होते पण काही अपरिहार्य कारणामुळे ते पूर्ण करू शकले नाहीत. पण ते अपुरे स्वप्न शहाजीराजेंना आपल्या मुलात म्हणजेच शिवरायांत पहिले आणि याचीच मुहूर्तमेढ म्हणजे शहाजीराजेंना छत्रपती शिवरायांना “राजमुद्रा आणि प्रधानमंडळ” देऊन त्यांच्या जीवनात ध्येय निश्चित केले.

लेखात आपण शिवरायांच्या विविध नेतृत्व गुणांचा अभ्यास करणार आहोत ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य १७३ वर्षे टिकले. याच नेतृत्व गुणांचा तुम्ही जीवनात त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकता याबाबत सुद्धा आपण माहिती घेऊ, पण त्याआधी आपण शिवमुद्रा अर्थ आणि महत्व जाणून घेऊया.

छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य, शहाजीराजे, शिवमुद्रा अर्थ, शिवमुद्रा, Chhatrapati Shivaji Maharaj. Shivaji maharaj information in marathi, Hindavi Swarajya, Shuvmudra, Shuvmudra Meaning, Swarajya, Maratha Empire, Infobuzz Marathi
Image Source – Twitter

|| प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||

याचा अर्थ असा आहे – प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृधांगीत होणारी, जगाला वंदनीय असणारी शहाजीपुत्र शिवाजीची हि मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे. शिवरायांच्या मुद्रेचा आपण खोलात जाऊन विचार केल्यास शहाजीराजेंचे बुद्धिवैभव आणि स्वराज्याविषयी कल्पना आपल्या लक्षात येईल. या राजमुद्रेतून शहाजीराजेंना दिलेला संदेश स्पष्टपणे दिसत आहे. शहाजीराजे आणि राजमाता जिजाबाईंनी दिलेल्या शिकवणीतून शिवरायांचे नेतृत्व घडले आणि म्हणूनच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि आजही ३५० वर्षानंतर शिवराय प्रत्येकाच्या रक्तात आहेत.

खालील ०४ महत्वाचे नेतृत्व कौशल्य शहाजीराजे आणि राजमाता जिजाबाईंनी शिवरायांना दिले, त्यामुळेच शिवरायांचे हिंदवी स्वराज्य तब्बल १७३ वर्षे मोठ्या दिमाखात उभे होते. याच नेतृत्व गुणांचा संबंध तंतोतंत तुमच्या उद्योगासोबत आहे.

नेतृत्वगुण पहिला – गरज

तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल पण प्रत्येक क्षणाला गरज लक्षात घ्या आणि मगच ती गोष्ट करा. याचा संदर्भ महाराजांशी जोडायचा झाल्यास हिंदवी स्वराज्य स्थापन करणे हे फक्त शहाजीराजे किंवा शिवरायांचे स्वप्न नव्हते तर त्यावेळची ती सगळ्यात मोठी गरज होती, आणि नेमकी हीच गरज शिवरायांनी ओळखली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

एखाद्या गोष्टीची गरज नसताना तुम्ही उगाचच वायफळ पद्धतीने करत असाल तर तुम्ही त्यामध्ये १००% यशस्वी होणार नाही, आणि मग संकटे पाहून तुम्ही ते काम अर्ध्यावरच सोडून द्याल. त्यामुळे नियम क्रमांक ०१ प्रत्येकवेळी गरज ओळखा आणि मग संधीचे सोने करा.

छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य, शहाजीराजे, शिवमुद्रा अर्थ, शिवमुद्रा, Chhatrapati Shivaji Maharaj. Shivaji maharaj information in marathi, Hindavi Swarajya, Shuvmudra, Shuvmudra Meaning, Swarajya, Maratha Empire, Infobuzz Marathi
Image Source – Quora

नेतृत्वगुण दुसरा – नियत

आपण अनेकदा घरी किंवा मित्र परिवारात “नियत” हा शब्द ऐकत असतो त्यामुळे हा शब्द आपल्याला नवीन असा नाही बरं का! पण नियत म्हणजे नेमकं काय? आणि त्याचा इथे काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सोप्या भाषेत नियत म्हणजे एखादी गोष्ट करण्यामागे तुमची असलेली भावना होय, हा शब्द पॉसिटीव्ह किंवा नेगेटिव्ह नाही कारण तुमची नियत चांगली किंवा वाईट सुद्धा असू शकते.

“नियत” या शब्दानेच शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये वेगळेपण आणला आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आपण निवांतपणे राज्य चालवत बसावे अश्या प्रकारची नियत छत्रपतींची कधीच नव्हती पण आपण बारकाईने पाहिल्यास भारतातील इतर अनेक संस्थानमध्ये गादीसाठी रक्ताची होळी खेळली जायची आणि प्रजा मात्र बाजूलाच राहायची. शिवराय स्वराज्य स्थापनेनंतर रामराज्य स्थापन करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहिले.

शिवरायांच्या हाच गुण प्रत्येक कामात महत्वाचा आहे. नोकरी असो किंवा तुमचा व्यवसाय, तुम्ही चांगल्या भावनेने एखादे काम करत असल्यास १००% तुम्हाला त्यामध्ये यश मिळणारच.

नेतृत्वगुण तिसरा – सृजनशीलता

सृजनशीलता म्हणजे इंग्रजी मध्ये Creativity होय. छत्रपती शिवरायांनी याच Creativity चा वापर ३०० वर्षांपूर्वी इतका प्रभावीपणे केला होता कि शत्रुंना शिवरायांची चाल कधी समजलीच नाही, नंतर तर अनेक शत्रू सरदारना पटले होते कि मराठ्यांच्या सैन्यात भुते पण आहेत. याच कारण असं ….

शिवरायांनी एकदा एका शत्रूबरोबर वापरलेली युक्ती पुन्हा त्याच शत्रू सोबत कधीच वापरली नाही याची प्रचिती आपल्याला इतिहासाच्या अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून आली आहे, आणि यालाच आपण आताच्या काळात सृजनशीलता किंवा Creativity असं गोंडस नावाने ओळखतो.

महाराजांच्या Creativity बाबत अधिक बोलायचं झाल्यास तुम्हाला याची चमक सुरतेच्या धाडीमधून अनेकदा पाहायला मिळाली आहे. आणि त्याहीपेक्षा प्रखर अशी Creativity संभाजीराजेंच्या कृतीमधून सुद्धा पाहायला मिळेल.

छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य, शहाजीराजे, शिवमुद्रा अर्थ, शिवमुद्रा, Chhatrapati Shivaji Maharaj. Shivaji maharaj information in marathi, Hindavi Swarajya, Shuvmudra, Shuvmudra Meaning, Swarajya, Maratha Empire, Infobuzz Marathi
Image Source – The Hindu

नेतृत्वगुण चौथा – पर्याय

छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा आणि चौथा महत्वाचा गुण म्हणजे “पर्याय”. क्षेत्र कोणतेही असो त्याच त्याच गोष्टींवर विसंबून राहू नका. तुमच्या जीवनात अनेक पर्याय निर्माण करा. जर तुम्ही प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टींचा विचार केलात आणि तो प्रत्यक्षात आणलात तर शत्रूकडे तुम्हाला हरवण्यासाठी वेळच राहणार नाही.

उद्योगाच्या बाबतीत अधिक विचार केल्यास एखादे प्रॉडक्ट पुढच्या ३ ते ४ वर्षात किंवा एका ठराविक कालावधीनंतर पूर्णपणे कालबाह्य होते आणि तुम्ही त्याला पर्यायी प्रॉडक्ट आणले नाही तर तुमचा व्यावसाय पण कालबाह्य झाल्याशिवाय राहणार नाही. वयक्तिक आयुष्यात सुद्धा असच आहे नवनवीन स्किल आत्मसात करत चला तरच तुम्ही प्रत्येकवेळी एक पाऊल पुढे राहाल.

हा लेख आपल्याला कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की कळवा.


1 Comment
  1. सुदेश चव्हाण says

    अगदी अचूक आणि लहान सहान गोष्टींचा सखोल अभ्यास करून केलेली मांडणी …फारच शिस्तबद्ध

Leave A Reply

Your email address will not be published.