पेट्रोल पंप वर ग्राहकांना देण्यात आलेले अधिकार आणि हक्क तुम्हाला माहित आहेत का ?

आपण फक्त पेट्रोल भरून निघून जातो परंतु पेट्रोल पंप वर देखील ग्राहकांना काही अधिकार देण्यात आलेले आहेत. आपल्यापैकी अनेकजण या अधिकारांपासून अनभिज्ञ आहेत.
मित्रांनो आपण दैनंदिन आयुष्यात अनेक अशा गोष्टीचा लाभ घेतो ज्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती देखील नसते. रोज आपण या सुविधांचा लाभ विनातक्रार घेत असतो यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल पंप. आपण आठवड्यातून दोन-तीन वेळेस तरी या जागी नक्कीच भेट देतो.
आपल्याकडे इतर चौकशी करायला वेळ नसल्यामुळे आपण फक्त पेट्रोल भरून पुढे जातो परंतु इतर गोष्टींप्रमाणे पेट्रोल पंपावर देखील ग्राहकांना काही अधिकार (rights) देण्यात आलेले आहेत. आपल्यापैकी अनेकजण या अधिकारांपासून अनभिज्ञ असतील आज.
बघुयात पेट्रोल पंप वर सामान्य ग्राहकांना कुठले अधिकार आहेत (Consumer Rights at Petrol Pumps)
दर्जा तपासणी (Quality Test)
आपल्यापैकी प्रत्येकालाच पेट्रोलच्या क्वालिटी बद्दल काळजी असते. कारण जर पेट्रोल चांगल्या प्रतीचं नसेल तर आपल्या गाडीचे इंजिन सुद्धा लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक जण चांगल्या क्वालिटीचं पेट्रोल टाकायचा प्रयत्न करत असतो.
मित्रांनो, म्हणुनच कुठल्याही पेट्रोल पंपावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे पेट्रोलचा दर्जा तपासण्याची मुभा एक ग्राहक म्हणून देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला एखादा पेट्रोल स्टेशनवर पेट्रोलच्या दर्जाबद्दल चिंता वाटली तर तुम्ही अगदी कसलाही विचार न करता त्याची तपासणी करायला लावू शकता. या तपासणीचे कसलेही पैसे घेतले जात नाहीत.
यासोबतच अनेक पेट्रोल पंपावरती असं लक्षात येतं की आपण दिलेल्या पैश्यांपेक्षा कमी पेट्रोल टाकल जात आहे, अशी शंका जरी आली तरी तुम्ही पेट्रोल पंपाची तपासणी करून घेऊ शकता.
एक ग्राहक (consumer) म्हणून तुम्हाला असलेल्या अधिकाराबद्दल कुठलाही पेट्रोल पंप तुम्हाला तपासणी करण्यापासून अडवू शकत नाही किंवा त्या तपासणीचे पैसे तुमच्या कडून घेऊ शकत नाही.
प्राथमिक आरोग्योपचार (First Aid)
पेट्रोल पंप हे हायवेपासून जवळच अंतरावरती असतात. त्यामुळे जर पेट्रोल पंपापासून काही अंतरावर अपघात घडला तर अशा प्रसंगी किमान प्राथमिक औषधोपचार करता यावेत म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर फर्स्ट एड किट उपलब्ध असते.
जर कधी अशा प्रसंगात अडकलात तर बिनदिक्कत जवळच्या Petrol Pump वर जाऊन प्राथमिक औषधोपचारासाठी आवश्यक असणारे फर्स्ट एड किट तुम्हाला अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात येईल.
आपत्कालीन फोन (Emergency Phone Call)
दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना अगदी अनपेक्षितपणे घडत असतात. जर कधी तुमचा अपघात झाला आणि तुम्हाला कोणाला निरोप द्यायचा असेल आणि जवळपास कोणी नसेल तर सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुम्ही जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन आपत्कालीन फोन अगदी हक्काने करू शकता तोही अगदी मोफत.
अपघातच नाही तर प्रवास करताना तुमच्या मोबाईलची बॅटरी कधी संपली किंवा तुम्हाला इतर अगदी महत्वाचा निरोप पोहोचवायचा आहे अशा प्रसंगी तुम्ही एक consumer म्हणून पेट्रोल पंपावर जाऊन अगदी मोफत आणि हक्काने हा फोन करू शकता.
टॉयलेट (Toilet)
ही सुविधा मात्र आपण सर्वांनी कधीतरी नक्कीच वापरली असेल. कारण अनेक वेळेस लांबचा प्रवास करताना पेट्रोल पंपावर असलेल्या या सुविधेचा आपल्याला नेहमीच वापर करावा लागला असेल.
त्यातही तुमच्यासोबत जर महिला असतील तर त्यांना इतर ठिकाणी टॉयलेटला जायला अडचण निर्माण होऊ शकते. परंतु पेट्रोल पंपावर यासाठी विशेष सोय केलेली असते.
त्यामुळे जर भविष्यात कधीही तुम्हाला प्रवास करताना टॉयलेटला जायची आवश्यकता भासली तर तुम्ही अगदी मोफत पेट्रोल पंपावर टॉयलेट वापरू शकता.
पिण्यासाठी स्वच्छ पाणी (Drinking Water)
काही वर्षांपूर्वी पेट्रोल पंपावरती ही सुविधा देण्यात येत नव्हती. परंतु आता गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल पंप ग्राहकांना ही सुविधा देण्यासाठी बंधन कारक नियम करण्यात आलेले आहेत.
तुम्हाला प्रवास करताना तहान लागली आहे आणि चांगलं पाणी कुठे मिळेल याची तुम्हाला शाश्वती नाही, अशावेळी तुम्ही कुठलाही विचार न करता पेट्रोल पंपावरती जाऊन पाणी पिऊ शकता.
तसेच तुमच्या जवळील बॉटलमध्ये हे पाणी भरून घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला गाडीमध्ये पेट्रोल टाकायची काहीही आवश्यकता नाही. म्हणजेच तुम्ही ग्राहक जरी नसाल तरीही Petrol Pump तुम्हाला अगदी मोफत पाणी देण्यासाठी बांधील आहे.
चाकातील हवा (Free Air)
मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आजकाल प्रत्येक पेट्रोल पंपावर गाडीच्या चाकामध्ये अगदी मोफत हवा भरून मिळते.
जर एखादा पेट्रोल पंप आणि तुम्हाला मोफत हवा भरून देण्यासाठी नकार देत असेल तर तुम्ही अगदी निश्चिंतपणे त्या पेट्रोल पंपाच्या मालकाविरुद्ध तक्रार दाखल करू शकता.