Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

या मार्गांद्वारे तुम्ही पंतप्रधान मोदींशी संपर्क साधू शकता

Contact PM Narendra Modi

काही वर्षांपूर्वी रेल्वे मंत्री ‘सुरेश प्रभू’ यांना कोणीतरी ट्विटरद्वारे मदत मागितली होती, लगेच त्या ट्विटची दखल घेत त्या व्यक्तीला मदत मिळाली देखील. अशाच प्रकारे माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांना विदेशात अडकलेल्या काही भारतीयांनी ट्विटर द्वारे मदत मागितली आणि ताबडतोब त्यांना देखील मदत मिळाली. Contact PM Narendra Modi

अगोदर काही तक्रारी असल्यास त्या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत मोठ्या मुश्किलीने पोहोचायच्या किंवा पोहोचतही नव्हत्या. पण आता काळ बदलला आहे. आता एका ‘क्लिक’ वर देशाच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडे पोहचणे शक्य झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बाबतीत मागे नाहीत, त्यांनी यासाठी खास पावले उचलली आहेत. जनतेला संबोधित करण्यासाठी त्यांनी ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरू केला. या द्वारे ते भारतातील तमाम जनतेला संबोधित करतात. भारतातील सामान्य नागरिकांना आपला मुद्दा, आपले विचार, आपले प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडायचे असतात.

तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही सुद्धा अगदी सहजपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपर्क (Contact PM Narendra Modi) करू शकता.

खाली दिलेल्या सोप्या स्टेप फॉलो करा, जेणेकरून तुम्ही अगदी सहजपणे पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क साधू शकाल.

अधिकृत वेबसाईट द्वारे नरेंद्र मोदी यांच्याशी कसा संपर्क साधावा ?

स्टेप 1 – तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास PMO च्या अधिकृत वेबसाईटवर जावे. website : www.pmindia.gov.in

स्टेप 2 – आता ‘Write to the Prime Minister’ या option वर क्लीक करावे.

स्टेप 3 – तिथे दिलेल्या फॉर्ममध्ये योग्य ती डिटेल भरावी.

स्टेप 4 – फॉर्म सबमिट करावा.

स्टेप 5 – लवकरच पंतप्रधान कार्यालयातून तुमच्याशी संपर्क साधण्यात येईल.

पोस्टाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क कसा साधावा ?

ऑनलाईन माध्यमे खेड्यापाड्यांमध्ये उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाइन व्यतिरिक्त पोस्टाद्वारे सुद्धा तुम्ही पंतप्रधानांशी संपर्क साधू शकता. त्यासाठीचा पत्ता खालील प्रमाणे आहे.

पंतप्रधान कार्यालय (Prime Ministers Office)
साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली 110011 (South Block, New Delhi 110011)

‘NaMo App’ द्वारे पंतप्रधानांशी संपर्क कसा साधावा ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आणखी एक पर्यायदेखील आहे. तो म्हणजे मोबाईल ॲप द्वारे संपर्क साधणे. तुमच्या मोबाईल मध्ये ‘नमो’ नावाचे ॲप डाऊनलोड करा. ह्या ॲपच्या साहाय्याने तुम्ही पंतप्रधानांपर्यंत आपले म्हणणे पाठवू शकता. हे ॲप iOS, Android किंवा Windows यामध्ये देखील उपलब्ध आहे.

NaMo App ॲप डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

फॅक्सद्वारे पंतप्रधानांशी संपर्क कसा साधावा ?

आपण फॅक्सद्वारे पंतप्रधानांना आपले प्रश्न पाठवू शकता
Fax No. 0091-11-23019545/0091-11-23016857

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ई-मेलद्वारे संवाद कसा साधावा ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधायचा असेल तर खाली दिलेल्या ईमेल ॲड्रेस द्वारे संपर्क साधावा.
Email : narendramodi1234@gmail.com

सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कसा संपर्क साधावा ?

Facebookhttps://www.facebook.com/narendramodi/

Twitterhttps://twitter.com/narendramodi?s=20

Youtubehttps://www.youtube.com/c/NarendraModi

Instagramhttps://instagram.com/narendramodi?igshid=tmos1eycq204

पंतप्रधानांबरोबर Contact PM Narendra Modi अपॉइंटमेंटसाठी कधी संपर्क करावा ?

सर्वात आधी तुमच्या क्षेत्रातील आमदार किंवा खासदार यांच्याकडे आपली तक्रार किंवा शंका कळवावी. तिथे तुमच्या शंकेचे निरासन न झाल्यास तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधावा. हे सर्व करून देखील तुमच्या शंकेचे तुम्हाला समाधान मिळाले नसेल तर, तुम्ही थेट नरेंद्र मोदी यांच्याशी देखील संपर्क साधू शकता.


Leave A Reply

Your email address will not be published.