Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

डॉमिनोज पिझाच्या यशाची कहाणी

पिझ्झाच्या छोट्या दुकानापासून सुरवात केलेली आज जगभरात Dominos Pizza चे १७ हजार पेक्षाही जास्त स्टोअर

आयुष्यात काहीतरी मोठं करायचं म्हणजे प्रत्येक पावलावर तुमची परीक्षा घेतली जाते, अनेक संकटाना तुम्हाला सामोरे जावे लागणार. संकटापासून दूर पळून जाणे खूप सोप्पे आहे पण संकटाला घाबरून पळणाऱ्या लोकांना आयुष्यामध्ये काहीच मिळत नाही आणि जे संकटाला न घाबरता सामोरे जातात त्यांच्या पायावर संपूर्ण जग येऊन पडते.

अशाच काही संकटांवर मात करून अनेक लोक यशाच्या शिखरावर पोहचली आहेत. लहानपणापासूनच अडचणींना सामोरे जात असल्यामुळे अश्या लोकांना मोठमोठ्या संकटातून मार्ग काढता येतो. असाच खूप स्ट्रगल करून एक यशस्वी ठरलेल्या कंपनीची कहाणी आपण पाहणार आहोत. पिझ्झा तुमचा आवडता पदार्थ असेल तर Domino’s Pizza तुम्ही नक्कीच खाल्ला असेल, बघूया त्यांचीच Success Story.

१९६० साली या कंपनीची सुरुवात दोन भावांनी मिळून केली होती. त्यावेळी त्यांनी हा पिझ्झा बनवून विकण्याचा व्यवसाय एका छोट्या दुकानापासून सुरु केला होता. खरं म्हटलं तर या कंपनीची सुरुवात ‘टॉम मोनाघन’ याने केली होती. परिस्थिती हलाखीची असूनही Tom Monaghan ने आपले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर काही छोटेमोठे काम करू लागला. त्यानंतर थोडे पैसे जमा करून आणि बँकेकडून थोडे कर्ज घेऊन त्याने त्याच्या भावासोबत म्हणजेच जेम्स (James Monaghan) सोबत मिशिगन शहरामध्ये ‘डोमिनिक्स पिझ्झा’ नावाचे दुकान चालवायला घेतले.

dominos history, why is dominos successful, dominos case study, dominos pizza success story in marathi, dominos success story, dominos founder tom monaghan, डॉमिनोजच्या यशाची कहाणी, डॉमिनोज पिझ्झा, टॉम मोनाघन, डॉमिनोजच्या यशाचे रहस्य, प्रेरणादायी गोष्ट, inspiring story
Dominos History

काही काळानंतर जेम्सने टॉमची साथ सोडली. कारण, त्यावेळी टॉम एक नोकरी देखील करत होता आणि त्याला या व्यवसायामध्ये यश मिळेल कि नाही, दुकान चालेल कि नाही अशा शंका होत्या. त्यामुळे त्याने नोकरीच करायचा विचार केला. जेम्स गेल्यानंतर टॉमला दुकान सांभाळायला खूप कठीण जायला लागले. परंतु, अशावेळी न घाबरत त्यानी सर्व काम व्यवस्थित पार पडले. काही वेळाने त्यांनी होम डिलिव्हरी देखील सुरु केली.

Tom Monaghan ने त्याच्या मेनूमध्ये पिझ्झाचे अनेक नवीन फ्लेवर सुरु केले आणि त्यामुळे लोकांमध्ये त्याच्या पिझ्झाची पसंती खूप वाढली. जसजसा नफा वाढत गेला, तसतसा त्याने त्याचा व्यवसायदेखील वाढवला. टॉमने १९६५ मध्ये स्वतःचे पिझ्झाचे दुकान सुरु केले आणि त्याच्या कंपनीचे नाव ‘डोमिनिकस पिझ्झा’ वरून ‘डॉमिनोज पिझ्झा’ असे ठेवले.

Domino’s Pizza च्या लोगो मध्ये ३ डॉट होते, हे तीन डॉट म्हणजे त्याचे ३ पिझ्झा स्टोअर्स दर्शवत. तो जितके पिझ्झा स्टोर उघडत होता तितके तो त्याच्या कंपनीच्या लोगोमध्ये डॉट्स वाढत गेले. कालांतराने त्याच्या स्टोअर्सची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे इतके जास्त डॉट्स लोगोमध्ये टाकणे कठीण जात होते.

डॉमिनोज एवढी यशस्वी कंपनी कशी झाली ? (Why Domino’s is so Successful ?)

१९७०मध्ये खराब विक्री आणि काही शासकीय अडचणीमुळे त्याच्या नफ्यामध्ये घट होऊ लागली. त्याला जास्त प्रमाणात तोटा होऊ लागला. पण टॉमने न डगमगता सर्व अडचणींवर मात केली आणि १९७३ मध्ये त्याने ३० मिनिटात हमखास डिलिव्हरी अशी सेवा सुरु केली. या कल्पनेने त्याला व्यवसायात खूप वृद्धी आणि जास्त प्रमाणात नफा मिळू लागला. परिणाम त्याने त्याने १९७८ मध्ये २०० पेक्षा जास्त Domino’s Pizza स्टोअर्स उघडले.

dominos history, why is dominos successful, dominos case study, dominos pizza success story in marathi, dominos success story, dominos founder tom monaghan, डॉमिनोजच्या यशाची कहाणी, डॉमिनोज पिझ्झा, टॉम मोनाघन, डॉमिनोजच्या यशाचे रहस्य, प्रेरणादायी गोष्ट, inspiring story
Why Dominos is so Successful

टॉम एवढ्यावरच थांबला नाही तर पुढच्या ५ वर्षात त्याने कॅनडा मध्ये डॉमिनोज पिझ्झाचे पहिले आंतरराष्ट्रीय स्टोअर उघडले. आज बघितले असता डॉमिनोजचे ९० देशांमध्ये एकूण १७,००० पेक्षाही जास्त पिझ्झा स्टोअर आहेत. एवढेच नव्हे तर डॉमिनोजचे जगभरात दिवसाला तब्बल ३० लाख पिझ्झा विकले जातात. २००७ मध्ये डॉमिनोज पिझ्झाची ऑनलाईन व मोबाईल ऑर्डरची सुविधा सुरु केली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी पिझ्झा ट्रॅकरची ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून दिली जेणेकरून ग्राहकांना त्यांचा पिझ्झा तयार झाल्यापासून आता तो कुठे आहे हे सुद्धा कळायचे. बदलत्या काळासोबत घेतलेल्या अश्या निर्णयांमुळे डॉमिनोज जगातील सर्वात यशस्वी पिझ्झा विकणारी कंपनी आहे.

१९९८ साली Domino’s चा संस्थापक टॉम मोनाघनने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तब्बल ३८ वर्ष लोकांना डॉमिनोजचे पिझ्झा खाऊ घातल्यानंतर त्याने हि कंपनी Bain Capital Inc. यांना विकली.

Leave A Reply

Your email address will not be published.