Chanakya Niti: चाणक्य यांच्या चार गोष्टी लक्षात ठेवा; कधीच भासणार नाही आर्थिक चणचण

0
209
विष्णुगुप्त चाणक्य, पैशाची अडचण, पैशाचे आकर्षण, Chanakya Niti, चाणक्य

Chanakya Niti – आपला देशात खूप महान व्यक्ती होऊन गेल्या, कारण त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने इतिहासात आपलं नाव अमर केलं आहे. भारतीय इतिहासातील असंच एक अमर व्यक्तिमत्व म्हणजे चाणक्य. चाणक्याचं पूर्ण नाव विष्णुगुप्त चाणक्य. तक्षशिला विद्यापीठातील आचार्य, तत्वज्ञ, नीतीज्ञ म्हणून चाणक्याचा लौकिक होता.

‘अर्थशास्त्र’ ग्रंथाचा रचयिता कौटिल्य अशीही त्याची ओळख आहे. अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये केवळ अर्थविषयकच नव्हे तर राज्य कसे चालवावे? राजाची कर्तव्ये काय आहेत? राज्यातील प्रशासकीय रचना कशी असावी? प्रशासनातील सर्व विभागांचे नियोजन कसे असावे? याबद्दल सखोल माहिती दिली आहे. पण आता चाणक्याने आर्थिक संदर्भातील मार्गदर्शन कशाप्रकारे केलं आहे! ते समजून घेऊ,

शांततेची आवश्यकता –

चाणक्य सांगतो, जिथे पैसा टिकतो, त्या घरात कायम शांती असते. ज्या ठिकाणी सदैव तंटे असतात, तिथे साहजिकच शांतता नसते, अशा ठिकाणी लक्ष्मी येत नाही किंवा जास्त काळ टिकत नाही.

खरेपणाने मिळवलेला पैसा –

पैसा हा कायम कष्टाने, खऱ्याने मिळवलेला असला पाहिजे. कारण जो पैसा चुकीच्या पद्धतीने मिळवला तर तो जास्त काळ उपयोगात राहत नाही. चाणक्याच्या मते असा पैसा दहा एक वर्षांपर्यंत टिकू शकतो. त्यानंतर या ना त्याप्रकारे त्याला उतरण लागते. आणि या उतरणीत तुमचा हक्काचा पैसाही निघून जातो.

पैशाचे आकर्षण –

हरेक व्यक्तीला पैशाची ओढ असते. तरी चाणक्य नीतीनुसार पैशाचा मोह धरता कामा नये. पैसा जरूर कमावावा, पैशाच्या मागं धावू नये, त्यापायी मानसिक स्थैर्य हरवू नये. जास्त धन यायला सुरुवात झाली आणि साठवण्याचा प्रयत्न होऊ लागला तर गर्व वाढतो. ताण – तणाव ही वाढतो, तेंव्हा फलोत्पादन करणाऱ्या वृक्षाप्रमाणे आपली वृत्ती उपयोगी ठरते.

पैशाचा विनिमय –

उपभोगासह दानासाठी पैशाचा वापर व्हावा. पैशाबद्दल जास्त मोह काही कामाचा नाही. योग्य गुंतवणूक, सुरक्षा व आवश्यक उपभोग असा येणाऱ्या धनाचा विनिमय असावा. जो पैसा कमावतो पण खर्च करत नाही, दानही करत नाही. तरीही त्याचा पैसा हा नष्ट होणारच आहे. पण त्याआधी अनुकूल काळात आणि प्रतिकूल काळातही पैसा हा उपयोगी येतो.

भय –

चाणक्याच्या मतानुसार जर व्यक्ती पैसे खर्च करण्याच्या वेळेला कोणत्याही प्रकारचे भय बाळगून असेल तर तो व्यावहारिक जगात फारसा कामाचा नाही आणि यामुळे तो धनवान ही बनू शकत नाही. त्याचबरोबर ज्याच्याकडून अशा ठिकाणांवर अकारण धनाची उधळपट्टी होते, त्याच्या धनाचा साहजिकच लवकर नाश होतो.


हे ही वाचा –

*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here