Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

रस्ते झाडून काढणाऱ्या ह्या भारतीयाने लंडनमध्ये भारतीय खाद्य पदार्थांचं साम्राज्य उभं केलं

लंडनमध्ये रस्ते झाडून काढणाऱ्या लक्ष्मीशंकर पाठक ह्यांनी आपल्या पत्नी सोबत लंडनमधील सर्वात मोठं भारतीय खाद्य पदार्थांचं साम्राज्य उभं केलं

जगातले जास्तीत जास्त प्रथितयश व्यवसायी, कलाकार, नेते, खेळाडू अथवा इतर कुठल्याही वर्गातले लोक आहेत ना, ते अगदी सामान्य घरातूनच पुढे येतात की काय कोण जाणे !

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणारेही यशस्वी होत असतील, परंतु ही अत्यंत गरीब, सामान्य घरातील मुलं पुढे चालून अशी काही झेप घेतात ना की लोकांचे डोळेच दिपावेत !

अशा लोकांनी गरिबीचे चटके सोसलेले असतात, अनेक अडचणींवर मात करत ते वर आलेले असतात त्यामुळे अर्थातच त्यांच्यातील नैतिकता, माणुसकी जागी असते. जुने दिवस कधीच न विसरल्यामुळे त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात !

अगदी रस्ता झाडून स्वच्छ करणारा देखील स्वतःचं असं साम्राज्य निर्माण करून देशोदेशी नावलौकिक मिळवू शकतो – हे दाखवून दिलं लक्ष्मीशंकर पाठक यांनी!

गुजरातमधील एका खेडेगावात अत्यन्त गरिबीत जीवन कंठणाऱ्या पाठक यांच्या परिवाराने १९४० मध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.. आणि थेट केनियात दाखल झाले!

भारतही तेव्हा ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता आणि केनियातही ब्रिटिशांचीच सत्ता होती. त्यातच दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली.

१९४५ मध्ये Lakshmishanker Pathak यांचं लग्न शांता गौरी यांच्याशी झालं. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारे केनियन आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष जोमो केन्याटा हे होते. ते नंतर केनियाचे पंतप्रधानही झाले. दुसरं महायुद्ध सुरू असण्याने ब्रिटिश सत्तेला आपलं सगळं लक्ष युद्धाकडे वाळवावं लागलं..

परिणामी ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या हालचाली तेथे वेगाने सुरू झाल्या. परंतु जोमो केन्याटा यांच्याविरुद्धही काही लोकांमध्ये असंतोष होताच. त्यांच्याविरुद्धच्या चळवळीला ‘माऊ माऊ चळवळ’ संबोधण्यात येतं, जी केनियात सुरू झाली होती.

ह्या सगळ्या धामधुमीमुळे लक्ष्मीशंकर हे आपल्या ४ मुलं व २ मुली, पत्नी, परिवारासह युगांडा ते मार्सेलीस असा प्रवास करून लंडनला आले. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ ५ $ होते ! आता एवढं मोठा परिवार चालवायचं तर जरा बरं काम शोधावं लागणार ज्यायोगे बरे पैसे मिळतील असा विचार करून त्यांनी कामाची शोधाशोध सुरू केली.

Laxmishanker Pathak, Shanta Gaury, Indian food brand, Britain, London, UK, story of Pataks food empire, Patak Food India, kirit pathak, street sweeper, pataks curry, inspiring story of patak foods, curry king Laxmishanker Pathak, लक्ष्मीशंकर पाठक, शांता गौरी, पाटक फूड्स, इंग्लंड, लंडन, प्रेरणादायी, motivational
Lakshishanker Pathak children in London

काम तर मिळालं परंतु ते होतं रस्ते झाडून स्वच्छ करण्याचं! अशा कामात असे कितीसे पैसे मिळणार, आठ जणांचं कसं भागणार ह्याच विचारात असतांना त्यांना एक विचार सुचला- याच रस्त्यावर खाद्यपदार्थ विकले तर !

एशियन फूड हे लंडनच्या रस्त्यांवर विक्रीकरिता निघत होतंच. त्याचाच फायदा करून घ्यायचा लक्ष्मीशंकर यांनी ठरवलं. पत्नीच्या मदतीने भारतीय खाद्यपदार्थ बनवले जाऊ लागले… विक्रीसाठी रस्त्यावर उतरू लागले.

केंटीश टाऊन मध्ये त्यांनी एक छोटेखानी फ्लॅट भाड्याने घेतला. भारतीय मिठाया, सामोसे लोकांपर्यंत पोहचू लागले. अर्थात खाण्याचे पदार्थ बनवून विकणं हे ‘खायचं काम’ नक्कीच नव्हे ! स्वच्छता, टापटीप, तसंच ते रुचकर बनवणं हे सगळं ओघाने आलंच !

आपल्या माहेरी शिकलेल्या रेसिपीज शांता गौरी येथे बनवू लागल्या. लोकांची पसंती मिळू लागली, ग्राहकांची गर्दी वाढत गेली. आता थांबणे नाही.. हे ठरवून दोघे नवरा बायको दिवसाचे १८-१८ तास काम करू लागले. त्यांची सहाही मुले अभ्यास, शाळा सांभाळून आई वडिलांना या कामात मदत करू लागली.

फ्लॅटमध्ये पदार्थ बनवणं, ग्राहक आला की ते देणं इतकंच ते मर्यादित नव्हतं. तर तिथल्या भारतीय वस्त्यांमध्ये फिरून, तिथल्या ऑर्डर्स मिळवणं, त्या वेळेत पूर्ण करून मालाची होम डिलिव्हरी करणं हे कठीण तर होतंच.

होम डिलिव्हरीसाठी कुणी मदतनीस घेऊन त्याला पैसे देणं परवडत नसल्याने लक्ष्मीशंकर यांनी आपल्या किरीट नावाच्या मुलालाच या कामावर नेमलं.. त्या वेळी किरीट होता केवळ 6 वर्षे वयाचा!

जेव्हा तुम्हाला काहीतरी लक्ष्य गाठायचं असतं तेव्हा इतर कुठल्याच, अक्षरशः कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न देता मार्गक्रमण करायचं असतं. त्यासाठी मग बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टींचा त्याग तुम्हाला करावा लागतो. हे कदाचित ह्या कोवळ्या वयातील पोरालाही उमजत असावं !

खेळण्या-बागडण्याचं वय असलेल्या, इंग्रजी भाषा जमत नसलेल्या ह्या चिमुरड्याने वडिलांनी दिलेली ही जबाबदारी विनातक्रार पार पाडली. एका हातात स्वतःच्या घरचा पत्ता व दुसऱ्या हातात जेथे माल पोचवायचा आहे त्याचा पत्ता… ह्या बळावर स्वारी बसमधून निघायची!

बस ड्रायव्हर, रस्त्यावरचे लोक सगळेच मोठ्या कुतूहलाने बघायचे, मदतही करायचे….. आता या गड्याला त्याचं एकूण वय बघता ज्युनिअर फ्री पास मिळत असे ज्यामुळे पाठक कुटुंबाचे प्रवासाचे भरपूर पैसे वाचले.

व्यवसाय भरभराटीला आला…. १९५० च्या सुमारास लक्ष्मीशंकर यांनी एक दुकान भाड्याने घेतलं तर दुसरं १९६१ मध्ये… १९६२ मध्ये शेजाऱ्यांनी तक्रार करायला सुरुवात केली कि सततचा आवाज व वास याने हैराण झालो आहोत ! ,

पाठक कुटुंबीयांनी लंडनच्या बाहेर, नॉर्थहेमटनशायर येथे आपलं बस्तान बसवलं. १९६५ मध्ये काही कारणांनी ते कर्जबाजारी झाले, परंतु डगमगले नाहीत. चटण्या, लोणची ह्या पदार्थांचीही विक्री सुरू केली. काही वर्षांत ते भारतीय खाद्यपदार्थात लागणाऱ्या साहित्याचे प्रमुख पुरवठादार बनले.

Laxmishanker Pathak, Shanta Gaury, Indian food brand, Britain, London, UK, story of Pataks food empire, Patak Food India, kirit pathak, street sweeper, pataks curry, inspiring story of patak foods, curry king Laxmishanker Pathak, लक्ष्मीशंकर पाठक, शांता गौरी, पाटक फूड्स, इंग्लंड, लंडन, प्रेरणादायी, motivational
Story of Patak’s food empire in London

ब्रिटनमध्ये भारतीय हॉटेल्स वेगाने वाढत होते. बहुतेक सगळ्याच ठिकाणी पाठकांचे खाद्यपदार्थतील साहित्य जात होतं. बरोबर सॉस, चटण्या, लोणची हे चमचमीत सोबती होतेच !

इदि अमीन – जो युगांडाचा लष्करी हुकूमशहा होता, जो नंतर तिथला अध्यक्ष बनला, त्याने युगांडातील एशियन लोकांना देशाबाहेर काढायला सुरुवात केली. लोक ब्रिटनमध्ये येऊ लागले. शरणार्थी शिबिरं बनवली गेली. लक्ष्मीशंकर यांच्यातील चतुर व्यावसायिक जागा झाला. त्यांनी ब्रिटिश आर्मी ऑफीसर्सना विनंती केली,

“या लोकांना आज अन्नाची जशी भूक आहे तशीच गरज इथल्या चालीरीती समजून घेण्याचीही आहे. यांना अन्न मी पुरवतो; त्याच्या बदल्यात इथली इत्थंभूत माहिती मी त्यांना हिंदी भाषेत प्रिंट करून वितरित करिन…. मला परवानगी द्या “

हे शरणार्थी इथलेच होणार हे गृहीतच धरल्या जाणार होतं. पुढे चालून या लोकांनी जेव्हा स्वतःचे व्यवसाय उभारले तेव्हा त्यांच्याकडे अर्थातच पाठकांचे पदार्थ, साहित्य गेलं !!

Patak Foods आता घराघरात, दुकानांमध्ये, हॉटेल्समध्ये, अगदी तिथल्या इंडियन हाय कमिशन मधेही पोचला. व्यवसायी माणसासाठी त्याचा ग्राहक त्याचा “देव” असतो. पाठक या नावातील ‘ठ’ या अक्षराने ब्रिटिश जनता गोंधळून जाऊ नये म्हणून लक्ष्मीशंकर पाठक ‘लक्ष्मीशंकर पाटक’ झाले!

बालवयापासूनच अतिशय चोख कामगिरी बजावणारा हुशार मुलगा किरीटच्या हातात व्यवसाय देण्यात आला. भाज्या, मसाले यांचं अचूक ज्ञान असणाऱ्या किरीटला, त्याच्या बायकोची मिनाचीही साथ लाभते आहे. मीनाने फूड टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिग्री घेतली आहे.

रिटायर्ड झाल्यावर लक्ष्मीशंकर पाठकांनी भारतात व ब्रिटनमध्ये चालवण्यात येणाऱ्या हेल्थ व एज्युकेशन प्रोग्रॅमना आपल्या फाउंडेशन द्वारे सढळ हाताने मदत केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही हे काम अव्याहत सुरू आहे.

‘कोकाकोला’ सारख्या नामांकित कंपनीच्या बाजूला मॉडेल कंपनी म्हणून जेव्हा ‘Patak Foods’ उभी राहिली तेव्हा वडिलांच्या डोळ्यातले आनंदाश्रू मी बघितले – किरीट पाठक सांगतात .

Laxmishanker Pathak, Shanta Gaury, Indian food brand, Britain, London, UK, story of Pataks food empire, Patak Food India, kirit pathak, street sweeper, pataks curry, inspiring story of patak foods, curry king Laxmishanker Pathak, लक्ष्मीशंकर पाठक, शांता गौरी, पाटक फूड्स, इंग्लंड, लंडन, प्रेरणादायी, motivational
Kirit Pathak with wife Meena

ब्रिटनच्या बिलिअन पौंड इंडियन फूड इंडस्ट्रीमध्ये एक चतुर्थ सहभाग “पाटक्स”चा आहे !! ब्रिटनमध्ये सॅटरडे नाईट्सना जे इंडियन डिनर असतं, त्यात ९०% पाटक्सचे पदार्थ असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही!

भारताबरोबरच ४० देशांमध्ये पसरलेलं हे “पाटक्स” चं नाव भारताची शान वाढवतं !!

Leave A Reply

Your email address will not be published.