Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

घर गहाण ठेऊन मराठी माणसाने भारताला कुस्तीतलं पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून दिलेलं

हि गोष्ट आहे स्वातंत्र्यानंतर भारताला मिळालेल्या पहिल्या वयक्तिक ऑलिम्पिक मेडलची. जगातील मोठमोठे कुस्तीपटू त्यांच्यासमोर ५ मिनिटेही उभे राहू शकले नाही परंतु एका घटनेने मात्र….

ज्यांच्या नसा-नसांमध्ये कुस्ती रक्ताप्रमाणे वाहायची अशा खाशाबा जाधवांनी स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले होते. देश स्वतंत्र झाला अन आसमंतात सगळीकडे तिरंगा अभिमानाने फडकू लागला. त्या फडकत्या ध्वजाकडून प्रेरणा घेऊन त्यांच्यातला पैलवान पुन्हा जागा झाला. त्यांनी निश्चय केला की जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवणार म्हणजे फडकवणारच !

Khashaba Dadasaheb Jadhav, indian wrestler, 1952 Olympics, Helsinki Olympics, khashaba jadhav information in marathi, khashaba jadhav story in marathi, olympic gold medal, K D Jadhav, khashaba jadhav in marathi, खाशाबा जाधव, Indias first individual Olympic medal, खाशाबा जाधव मराठी माहिती, khashaba jadhav biography, १९५२ ऑलम्पिक, khashaba jadhav photo
Indian Wrestler Khashaba Dadasaheb Jadhav

ठरवल्याप्रमाणे त्यांनी ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवलाच. ऑलिंपिकमध्ये देशाला पहिले वयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा दादासाहेब जाधव (khashaba jadhav) यांच्याबबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

किस्सा आहे त्या पहिल्या पदकाबद्दल, ज्याच्या जोरावर भारत ४४ वर्षे उराशी अभिमान बाळगत राहिला. दिनांक १५ जानेवारी १९२६ रोजी जन्मलेल्या आणि दिनांक १४ ऑगस्ट १९८४ रोजी जगाला निरोप देणाऱ्या भारताच्या या प्रतिभावान कुस्तीपटूची कहाणी खूप खास आहे.

खाशाबा जाधव (khashaba jadhav) यांचे वडील दादासाहेब जाधव हे सुप्रसिद्ध कुस्तीपटू होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या मनात कुस्तीची आवड निर्माण होत गेली. त्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. याच दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यांना वारसा म्हणून मिळालेल्या कौशल्यांना आजमावण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यांनी परिश्रमांची पराकाष्ठा केली.

सन १९४८ मध्ये लंडन ऑलिम्पिकची वेळ आली तेव्हा जाधव यांना लक्षात आले की फक्त मेहनत पुरेशी नाही, मेहनतीला पैशाचीसुद्धा आवश्यकता असते पण त्याकरिता त्यांच्याजवळ पैसे नव्हते. अखेर त्यांनी इथे-तिथे हातपाय मारले आणि पैशांची व्यवस्था केली गेली. कोल्हापूरच्या महाराजांनी तर काही गावकऱ्यांनी पैशांची व्यवस्था केली. लंडन ऑलिम्पिकमध्ये ते ५२ किलो गटात सहाव्या क्रमांकावर आले. त्याचे पारंपरिक घरगुती डावपेच पाहून अमेरिकेचे माजी कुस्ती विश्वविजेता रईस गार्डनर यांनीही त्यांना प्रशिक्षिण दिले.

जरी लंडनहून ते पदक आणू शकले नाही, तरी लंडन ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर जाधव यांनी जणू काही भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचा निर्धारच केला होता. म्हणून पुढची ४ वर्षे ते त्यातच मग्न राहिले आणि सन १९५२ मध्ये ती वेळ आली जेव्हा जाधव हेलसिंकीमध्ये इतिहास घडवणार होते. पण इतिहास घडवण्यापूर्वी जाधव यांना बऱ्याच कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले.

शासकीय निवडकर्त्यांनी त्यांना कमी ठरविण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. त्यांचे नाव अगदी ऑलिम्पिकच्या यादीतूनही कापले गेले.

Khashaba Dadasaheb Jadhav, indian wrestler, 1952 Olympics, Helsinki Olympics, khashaba jadhav information in marathi, khashaba jadhav story in marathi, olympic gold medal, K D Jadhav, khashaba jadhav in marathi, खाशाबा जाधव, Indias first individual Olympic medal, खाशाबा जाधव मराठी माहिती, khashaba jadhav biography, १९५२ ऑलम्पिक, khashaba jadhav photo
Story of Khashaba Jadhav and India’s first indivisual Olympic medal

पण Khashaba Jadhav यांनी हार मानली नाही आणि त्यांनी पटियालाच्या महाराजांकडून न्यायासाठी विनवणी केली. खुद्द महाराजांनाही खेळाची प्रचंड आवड होती.

अशा परिस्थितीत कित्येक प्रकारचे प्रयत्न केल्यानंतर जाधव यांना ऑलम्पिक मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. जाधव यांना माहित होते की आता नाही तर कधीच नाही. मग त्यांच्यासमोर जे कोणी आले, जाधव त्यांना मातीत मिसळत गेले आणि त्यांचे ऑलिम्पिकचे तिकीट कन्फर्म झाले.

हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये जाण्याची त्यांची जागा निश्चित झाली होती. पण हे प्रकरण पुन्हा एकदा पैश्यांवर येऊन अडकले. जाधव पुन्हा एकदा सगळ्याची जुळवाजुळव करण्याच्या मागे लागले, पण यावेळी पैशांसाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्याच्या कुटुंबियांनी पैसे गोळा करण्यासाठी गावातील प्रत्येकाचा दरवाजा ठोठावला. काहींनी मदत केली पण ती पुरेशी नव्हती.

असे म्हटले जाते की जाधव यांच्या कुटुंबियांनी त्यावेळी मुंबईच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे ४००० रुपयांची मदत मागितली होती, परंतु त्यांना काही फारशी मदत मिळाली नाही. शेवटी कोल्हापूरच्या मराठा बँकेत त्यांनी आपले घर गहाण ठेवले, ज्यातून त्यांना ७००० रुपये मिळाले होते. त्यांच्या किटची व्यवस्था त्यांच्या काही मित्रांनीच केली होती. यानंतर, मात्र त्यांनी ऑलिंपिकमध्ये जाऊन आपल्या चाहत्यांना निराश नाही केले .

1952 Olympic मध्ये त्यांना जगभरातील मोठं-मोठ्या दिग्गजांशी सामना करावा लागणार होता. पण जाधवही काही कमी उत्साही नव्हते. त्यांनी सलग पाच सामने जिंकलेले आहेत. तरी कोणताही कुस्तीगीर त्यांच्यासमोर ५ मिनिटेही उभे राहू शकला नव्हता. पण त्यानंतर मात्र एक जोरदार सामना रंगला.

Khashaba Jadhav यांच्यासमोर होता जपानी कुस्तीगीर सोहाची इशी. हा सामना १५ मिनिटे चालला. जाधवांनी त्याला तोडीस तोड उत्तर दिले परंतु एका गुणाने त्यांनी तो सामना गमावला. इशी फायनलमध्ये पोहोचला.

Khashaba Dadasaheb Jadhav, indian wrestler, 1952 Olympics, Helsinki Olympics, khashaba jadhav information in marathi, khashaba jadhav story in marathi, olympic gold medal, K D Jadhav, khashaba jadhav in marathi, खाशाबा जाधव, Indias first individual Olympic medal, खाशाबा जाधव मराठी माहिती, khashaba jadhav biography, १९५२ ऑलम्पिक, khashaba jadhav photo
Khashaba Jadhav Biography

जाधव यांच्याकडे अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आणखी एक संधी होती, परंतु जे घडले ते अपेक्षांवर पाणी फेरणारे होते. त्यांचा पुढील सामना सोव्हिएत युनियन कुस्तीपटू राशिद मम्मदबीयोव्ह याच्याशी झाला.

खरतरं, नियमाप्रमाणे एका बाऊटनंतर दुसरा बाऊट ३० मिनिटांच्या अंतराने व्हायला हवा. पण जाधव सलग ६ बाऊट लढल्यानंतर थकूनही सामन्यात उतरावे लागले. कारण याची विचारणा करणारा कोणताही भारतीय अधिकारी तेथे नव्हता. याचा परिणाम असा झाला की, जाधव यांनी हा सामना गमावला आणि देशाला कांस्यपदकावर (Bronze Medal) समाधान मानावे लागले.

दिनांक १५ जानेवारी, १९२६ रोजी जाधव यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गोलेश्वर या लहानशा गावात झाला. याच गावातील लोकांनी ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी निधी गोळा करून त्यांना प्रोत्साहित केले होते. जाधव जेव्हा Olympic मधून देशासाठी पहिले पदक घेऊन परतले तेव्हा सरकारने याकडे फारसे लक्ष दिले नाही कारण सर्वांचे लक्ष त्यावर्षी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या हॉकी संघाकडे लागले होते. पण गोलेश्वर गाव त्यांना विसरले नाही.

जाधव यांच्या स्वागतासाठी गावातले लोक १५१ बैलगाड्या घेऊन पोहोचले. ढोल-ताशांच्या गजरांत नाचत गाजत आलेल्या लोकांनी त्यांना स्टेशनपासून गावात नेले. थाटामाटात त्यांचे जंगी स्वागत करणारे गावकरी त्त्यांच्या निधनानंतरही त्यांना विसरले नाहीत. १४ ऑगस्ट १९८४ रोजी त्यांच्या निधनानंतर गावकऱ्यांनी जाधव यांची मूर्ती स्थापन करून त्यांच्या स्मृतींना अजरामर केले. जाधव यांनी ३० वर्षे महाराष्ट्र पोलीस सेवेतही काम केले.

जाधव हे एकमेव ऑलिम्पिक पदक विजेते आहेत, ज्यांना पद्म पुरस्कार मिळालेला नाही.

२५ जुलै २०१७ रोजी Khashaba Jadhav यांचा मुलगा रणजित केडी जाधव यांनी वडिलांनी जिंकलेल्या कांस्यपदकाचा लिलाव करण्याची धमकीही दिली होती. त्यांची खरी नाराजी सरकारच्या वृत्तीवर होती.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.