ऍपल पहिल्यांदाच घेऊन आला आहे हे भन्नाट फिचर
आयफोनचं हे नवीन मॉडेल, फीचर्स ऐकून नक्कीच म्हणाल आयफोन इज द बेस्ट
ऍप्पल (Apple) नेहमीच असं काहीतरी नवीन फिचर घेऊन मार्केटमध्ये येतं ज्यामुळे आयफोनच्या लोकप्रियतेमध्ये अजूनच भर पडते. ऍप्पल आपल्या आगामी आयफोनमध्ये काय नवीन घेऊन येणार याकडे आयफोनप्रेमी लक्ष ठेवूनच असतात. यावेळी ऍप्पलने असंच एक नवं आणि हटके फिचर आपल्या फोनमध्ये आणलंय. ऍप्पलने ३ कॅमेरे असलेला आयफोन इलेव्हन प्रो (Iphone – 11 pro) लाँच केला आहे.
पीव्हीडी कोटिंग (physical vapor deposition) ह्या तंत्रज्ञानाचा वापर ह्या आयफोन ११ प्रो मध्ये केला गेला आहे ज्यामुळे हा आयफोन दीर्घकाळापर्यंत उत्तम सेवा देऊ शकेल. ग्रीन, गोल्ड, सिल्वर व ग्रे ह्या चार रंगांमध्ये हा आयफोन उपलब्ध करण्यात आला आहे. आयफोन-११ प्रोमध्ये ओएलईडी डिस्पले पॅनलचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे ऊर्जेची बचत १५ टक्के जास्त होऊ शकेल व फोनची बॅटरी कमीतकमी चार्ज करावी लागेल.
या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे ह्यात १२ मेगापिक्सेल वाइड कॅमेरा, १२ टेलीफोटो कॅमेऱ्यासह १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. आयफोन इलेव्हन प्रो (Iphone – 11 pro) च्या ह्या ३ उच्च क्षमता असलेल्या कॅमेऱ्यांच्या मदतीने तुम्ही फिल्म सुद्धा शूट करू शकता. आयफोन ११ प्रो ह्या फोनची किंमत आहे ७१ हजार रुपये तर आयफोन ११ प्रो मॅक्सची किंमत आहे ७९ हजार रुपये.