तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपते? या भन्नाट टिप्स वापरा!

मोबाईलची बॅटरी, बॅटरी लाईफ, मोबाईल चार्जिंग, मोबाईलची बॅटरी लवकर संपते?, अतिप्रमाणात चार्जिंग, चार्जर, mobile battery saving tips, tips to increase mobile battery life in marathi, Mobile Battery Tips, how to increase Mobile battery life in marathi

आज-काल मोबाईल कंपनी जास्त काळ टिकणाऱ्या मोबाईलच्या बॅटरीचे वचन देताना दिसत आहेत पण गेल्या काही दिवसांपासून मोबाईलची बॅटरी लवकर संपत असल्याची ओरड देखील ग्राहकांमधून येत आहे. सध्याच्या काळात आपल्या दिनचर्येचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपला मोबाईल. जर त्या मोबाईलला चार्जिंग नसेल आणि तो बंद पडला तर आपली अनेक कामे अडकून पडतात. यामुळे अनेकांची चीडचीड होत असते, अनेकजण तर त्या मोबाईलचा राग इतरत्र काढतात आणि भलतंच काहीतरी करून बसतात.

आता यामध्ये कंपन्यांची चूक असू शकते पण कदाचित ग्राहक म्हणजेच आपण देखील चुकीच्या पद्धतीने मोबाइल वापरात असल्याने तसेच चुकीच्या पद्धतीने त्यांची बॅटरी चार्जिंगला लावत असल्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. आता मग यावर उपाय काय ? तर आपला प्राणाहून प्रिय झालेल्या या मित्राची योग्य काळजी घेणे हा एकमेवा रामबाण उपाय. आजच्या या लेखात आम्ही इन्फोबझ्झ वाले तुम्हाला काही भन्नाट टिप्स देणार आहे ज्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी लाईफ तर वाढेलच पण मोबाईलची काळजी पण घ्याल.

1) मोबाईलचा ब्राईटनेस

आपल्या मोबाईलची जास्तीत जास्त बॅटरी या ब्राईटनेस मध्येच जाते त्यामुळे उपलब्ध असलेल्या प्रकाशानुसार तुम्हाला हवा तेवढाच मोबाईलचा ब्राईटनेस ठेवावा यातून तुमची बॅटरी तर सेव्ह होईलच आणि तुमच्या डोळ्यांना त्रास सुद्धा होणार नाही. सध्याच्या बहुतेक सगळ्या मोबाईलला ऑटोब्राईटनेसची सोय आहे ती जर तुम्ही ऑन केलात तर उत्तमच.

2) लोकेशन सेटिंग्स वर नजर टाका

अनेक महत्वाच्या अप्लिकेशनसाठी लोकेशन गरजेचे असते पण त्या त्या वेळी परवानगी देऊन इतर वेळी लोकेशन सेटिंग्स बंद ठेवल्यास तुमच्या मोबाइलची बॅटरी लाईफ वाढवण्यास मदत होईल. प्रत्येकच्या मोबाइल सेटिंग्स मध्ये खाली दिल्याप्रमाणे वयक्तिक सेटिंग करण्याची मुभा असते, इथून तुमच्या गरजेनुसार सेटिंग्स करा आणि मोबाईलची बॅटरी लाईफ वाढवा.

मोबाईलची बॅटरी, बॅटरी लाईफ, मोबाईल चार्जिंग, मोबाईलची बॅटरी लवकर संपते?, अतिप्रमाणात चार्जिंग, चार्जर, mobile battery saving tips, tips to increase mobile battery life in marathi, Mobile Battery Tips, how to increase Mobile battery life in marathi

3) मोबाईलची बॅटरी अत्यंत कमी होईपर्यंत मोबाईलचा वापर करणे आणि त्यानंतर त्याला शंभर टक्के पर्यंत चार्ज करणे.

आपल्यापैकी अनेक जण असंच करत असतील नाही ? असे करणे चुकीचे आहे. लक्षात ठेवा तुमच्या मोबाईल मध्ये आजकाल अशा बॅटरीज वापरल्या जातात ज्यांना तुम्ही केव्हाही चार्ज करू शकता अर्थात चार्जिंग खुपच कमी झाल्यानंतर त्याला चार्जिंगला लावायच्या सवयीमुळे तुमच्या मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य कमी होत आहे.

तुमच्या मोबाईलची बॅटरी अशा प्रकारे तयार केलेली असते जेणेकरून ती बॅटरी 30 ते 80 टक्के मध्ये चांगले काम करू शकेल. त्यामुळे जेव्हा तुमची चार्जिंग तीस टक्के पेक्षा कमी होईल तेव्हा तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावायला हवा आणि मोबाईलला शंभर टक्के पर्यंत चार्जिंग करण्याचे काहीच गरज नाही.

मोबाईलची बॅटरी, बॅटरी लाईफ, मोबाईल चार्जिंग, मोबाईलची बॅटरी लवकर संपते?, अतिप्रमाणात चार्जिंग, चार्जर, mobile battery saving tips, tips to increase mobile battery life in marathi, Mobile Battery Tips, how to increase Mobile battery life in marathi
Source – New Atlas

4) लो पॉवर मोड

जेव्हा आपण स्मार्टफोन वापरात असतो तेव्हा पडद्याच्या मागे इत्तर अनेक अप्लिकेशन चालू असतात आणि त्यामुळे स्मार्टफोन ज्यादाची बॅटरी खर्ची घालतो. मोबाइल मधील लो पॉवर मोड ऑन करून ठेवलात तर पडद्यच्या मागच्या जवळपास सगळ्या गोष्टी बंद होतील आणि तुम्ही वापरात असलेल्या अँपमुळेच फक्त बॅटरी संपून तिचे आयुष्य वाढेल.

5) मोबाईलला चुकीच्या ठिकाणी चार्जिंगला लावणे

वर सांगितल्याप्रमाणे तुमच्या मोबाईलची बॅटरी ही विशिष्ट तापमानात चांगल्या प्रकारचं काम करू शकते. त्यामुळे मोबाईल चार्जिंगला लावताना अत्यंत गरम ठिकाणी ठेवणे शक्यतो टाळावे त्यामुळे बॅटरीवरील वातावरणाचा दबाव वाढण्यास सुरुवात होते आणि ही गोष्ट तुमच्या बॅटरीच्या आयुष्यासाठी चांगली नाही.

मोबाईल चार्जिंगला लावताना खूप थंड ठिकाणीही ठेवू नये उदाहरणार्थ एसी समोर मोबाईल ठेवल्याने मोबाईल खूपच थंड होतो आणि त्याचा अर्थातच परिणाम जाणवतो. चार्जिंगला लावताना मोबाईल मोकळ्या जागेत ठेवावा जेणेकरून त्याला हवा लागावी.

6) डिसप्ले टाईमआऊट

सगळ्या मोबाइलला हा पर्याय दिलेला असतो. तुम्ही मोबाइलला वापरात असताना लॉक न करता तसाच ठेवलात तर किती वेळ तो ऑन राहावा हे ठरवण्यासाठी डिसप्ले टाईमआऊटचा उपयोग होतो. फोनचं डिसप्ले टाईमआऊट तीस सेकंदांपेक्षा जास्त असू नये यामुळे विनाकारण तुम्ही मोबाइलला वापरात नसताना मोबाइल आपोआप बंद होईल (लॉक होईल) आणि बॅटरीची कार्यक्षमता वाढते.

मोबाईलची बॅटरी, बॅटरी लाईफ, मोबाईल चार्जिंग, मोबाईलची बॅटरी लवकर संपते?, अतिप्रमाणात चार्जिंग, चार्जर, mobile battery saving tips, tips to increase mobile battery life in marathi, Mobile Battery Tips, how to increase Mobile battery life in marathi
Source – Greenbot

7) अतिप्रमाणात चार्जिंग करणे

आता ही चूक मात्र सर्वसाधारणपणे प्रत्येकाकडून होणारी चूक आहे. आपण बऱ्याच वेळेस झोपताना मोबाईल चार्जिंगला लावतो आणि सकाळी किंवा झोपेतून उठल्या नंतरच मोबाईलची चार्जिंग बंद करतो. यामुळे गरज नसताना बॅटरी जास्त प्रमाणात चार्ज होते. याचा परिणाम तुमच्या फोनच्या बॅटरीवर होतो.

8) आपल्या मोबाईलला बसणाऱ्या कुठल्याही चार्जरने मोबाईल चार्ज करणे

आपला मोबाईल कुठल्याही चार्जरने चार्ज करणे ही सर्वात मोठी चूक आहे. आपण आपला मोबाईल शक्यतो आपल्या नेहमीच्याच चार्जरने चार्ज करावा. यामागील कारण असे कि प्रत्येक फोनचा चार्जर त्या फोनमधील बॅटरीनुसार तयार करण्यात आलेला असतो. दुसऱ्या फोनचा चार्जर वापरला तर नक्कीच तुमच्या बॅटरीवर त्याचा परिणाम होणार.

मोबाईलची बॅटरी, बॅटरी लाईफ, मोबाईल चार्जिंग, मोबाईलची बॅटरी लवकर संपते?, अतिप्रमाणात चार्जिंग, चार्जर, mobile battery saving tips, tips to increase mobile battery life in marathi, Mobile Battery Tips, how to increase Mobile battery life in marathi
Source – Android Pit

*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here