Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

भारतीय निवडणुकीतील हि मजेदार घोषवाक्य तुम्हाला खळखळून हसवतील

भारतीय राजकारणात निवडणुकीच्या घोषणा देण्याचा इतिहास फार मनोरंजक आहे. विरोधी पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना अगदी गमतीदार शैलीत लक्ष्य करण्यासाठी सगळेच पक्ष निवडणुकीच्या काळात क्रिएटिव्ह लेखकांना घोषवाक्य लिहिण्यासाठी कामाला लावतात. अनेकवेळा ह्या गमतीदार घोषवाक्यांचा मतदारावर परिणाम दिसून आला आहे. भारतातील जनता सुद्धा ह्या निवडणुकीच्या काळात मजेदार घोषवाक्यांचा आनंद घेते. आज आम्ही तुम्हाला भारताच्या इतिहासातील अश्याच काही मजेदार घोषणांविषयी माहिती देत आहोत. ह्या घोषणा वाचून तुम्हालाही नक्कीच हसू येईल.

जनसंघ को वोट दो, बीड़ी पीना छोड़ दो
बीड़ी में तंबाकू है, कांग्रेसवाला डाकू है

election punchline, funny election slogans, funny election posters india, indian election taglines, funny election quotes india, निवडणुकीतील मजेदार घोषवाक्य, निवडणूक

1967 च्या निवडणुकीत भारतीय जनसंघाने मतदारांना या घोषणेद्वारे कॉंग्रेस आणि तंबाखू दोन्ही नाकारण्याचे आवाहन केले होते.

ये देखो इंदिरा का खेल, खा गई शक्कर, पी गई तेल

या गंमतीदार घोषणा देऊन जनसंघाने निवडणूक प्रचारात कॉंग्रेस सरकारच्या त्या काळातील वाढलेल्या महागाईवर प्रकाश टाकला. हि घोषणा त्या काळात बर्‍यापैकी लोकप्रिय झाली होती.

एक शेरनी, सौ लंगूर, चिकमंगलुर भाई चिकमंगलुर

election punchline, funny election slogans, funny election posters india, indian election taglines, funny election quotes india, निवडणुकीतील मजेदार घोषवाक्य, निवडणूक

ही राजकीय ओळ विरोधकांची खिल्ली उडवित होती. हा नारा कॉंग्रेसचे कवी श्रीकांत वर्मा यांनी 1978 मध्ये चिकमंगलुर जिल्ह्यातील इंदिरा गांधींच्या पोटनिवडणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी दिला होता.

जब तक रहेगा समोसे में आलू, तब तक रहेगा बिहार में लालू

लालू प्रसाद यादव यांना बिहारचे अस्सल नेते म्हणून सादर करणारी एक अतिशय मनोरंजक अशी हि एक घोषणा होती.

मिले मुलायम-काशीराम, हवा हो गए जय श्री राम

election punchline, funny election slogans, funny election posters india, indian election taglines, funny election quotes india, निवडणुकीतील मजेदार घोषवाक्य, निवडणूक

अयोध्येत वादग्रस्त इमारत पाडल्यानंतर अशा घोषणा देण्यात आल्या आणि मुलायमसिंग यादव, काशीराम यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले.

गालों में लाली है, तोपों की दलाली है

बोफोर्स घोटाळ्याला धरुन राजीव गांधी व काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी हे घोषवाक्य लिहिल्या गेलं होतं.

यूपी में है दम, क्योंकि जुर्म है यहां पर कम

election punchline, funny election slogans, funny election posters india, indian election taglines, funny election quotes india, निवडणुकीतील मजेदार घोषवाक्य, निवडणूक

२००७ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात अशी टॅगलाईन अमिताभ बच्चन यांनी समाजवादी पक्षाला दिली. त्याबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी त्यांना उत्तर प्रदेश माहिती आयोगाने नोटीस बजावली होती.

यूपी में था दम, लेकिन कहां पहुंच गए हम

या घोषणेने समाजवादी पक्षावर लक्ष केंद्रित करून कॉंग्रेसने अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीस प्रत्युत्तर दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.