Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

टरबूज कापल्याशिवाय ते गोड आहे का नाही असे ओळखा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक प्रकारची फळे बाजारात दाखल झालेली आहेत, अर्थात कोवीड 19 मुळे ही फळे आपल्यापर्यंत उपलब्ध व्हायला थोडी अडचण होणं स्वाभाविक आहे. परंतु उन्हाळ्याचा हा काळ म्हणजे अनेक प्रकारच्या फळांचा काळ आहे. आंबे, टरबूज, खरबूज अशी अनेक फळं आज बाजारात येणे अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा आपल्याला टरबूज चांगले आहे की नाही, ते गोड निघेल की नाही, आत मध्ये लाल आहे की नाही याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी खास टरबूज/कलिंगड कसं निवडायचं यावर माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…..

टरबूज असे फळ आहे जे आपल्यापैकी खूप जणांना नक्कीच आवडत असेल. आपण खूप आवडीने एखादं टरबूज बाजारातून घेतो आणि विचार करा जर ते टरबूज चांगलं चविष्ट नाही निघालं तर तुम्हाला किती वाईट वाटेल. टरबूज ह्या फळाची खासियत अशी आहे की हे फळ जेवढे चविष्ट असेल तेवढीच खाणाऱ्याला मजा येते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना टरबूज खरेदी करण्याची योग्य पद्धत माहिती नसेल त्यामुळे आपण अनेक वेळा फसवले देखील गेले असू.

सहाजिकच मित्रांनो टरबुजाच्या आत मध्ये तर आपण बघू शकत नाही कि हे टरबूज चांगले आहे की नाही. काही टरबूज अजिबात चविष्ट नसतात मग अशावेळी बाजारात आपली फसवणूक होऊ नये म्हणून खाली दिलेल्या काही टिप्स वापरा आणि स्वतःला फसवणुकीपासून दूर ठेवा. दिलेल्या माहितीच्या मदतीने तुम्ही हे सहज पद्धतीने जाणून घेऊ शकाल की कुठलं टरबूज गोड आहे आणि कुठलं टरबूज गोड नाही.

आकार

मंडळी लक्षात घ्या टरबूज किंवा कलिंगड घेताना त्याचा आकार फार महत्त्वाचा असतो. बाजारात अनेक जातीचे, अनेक प्रकारचे टरबूज उपलब्ध आहेत. हे सर्वच टरबूज गोड आणि चांगले असतात असे नाही. परंतु त्यातही चांगलं टरबूज निवडण्यासाठी मात्र कौशल्य असावे लागतं. टरबूज घेताना कधीही एकसमान आकार असलेलं टरबूज घ्यावं तसेच ते कुठे कापले गेले आहे का हे पहावे, ते कुठे दबत आहे का हे देखील पाहावे. जर टरबूज कुठे दबत असेल तर लक्षात घ्या त्याची वाढ योग्य झालेली नाही किंवा ते जास्त पिकलेलं आहे आणि असं टरबूज कधीही चांगलं, गोड, चविष्ट निघणार नाही.

how to pick a sweet watermelon, how to tell if a watermelon is bad, watermelon picking guide, good watermelon vs bad, how to tell watermelon is ripe, tips to pick good watermelon in marathi, watermelon yellow spot, कलिंगड मराठी माहिती, गोड टरबूज असं ओळखा

टरबुजाला उगवताना योग्य प्रमाणात पाणी आणि ऊन न मिळाल्याने सुद्धा त्याचा आकार बिघडू शकतो तसेच ते टरबूज काही ठिकाणी नरम देखील असू शकते. असे असल्यास ते टरबूज आतून लाल आणि गोड नसण्याची दाट शक्यता असते.

वजन

टरबूज खरेदी करताना दुसरी गोष्ट बघितली गेली पाहिजे ती म्हणजे त्या टरबुजाचे वजन. टरबूज जर चांगले वजनदार असेल तर ते चांगल्या प्रकारे पिकले आहे आणि ते नक्कीच चविष्ट निघेल. समान आकार असलेल्या टरबूज हातात घेऊन त्यांच्या वजनाची तुलना करा. जे टरबूज जास्त वजनदार असेल ते आतूनही गॉड असणार.

पिवळा डाग

टरबूज शेतात अशा पद्धतीने ठेवलेले असते की संपूर्ण टरबूजावर सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात पडू शकत नाही. एका विशिष्ट भागावरती सूर्यप्रकाश पडत नाही आणि त्यामुळे तो भाग हलका किंवा गडद पिवळा होतो. त्यामुळे टरबूज घेताना हा पिवळा डाग शोधा ज्या टरबूजावर असे डाग मोठ्या प्रमाणात असतील ते टरबूज आतून नक्कीच पाण्याने भरपूर भरलेलं असेल आणि तेच टरबूज खायला देखील चविष्ट असेल. त्यामुळे पिवळा डाग शोधून तो पिवळा डाग ज्या टरबूजा वर मोठ्या प्रमाणात आहे तेच टरबूज बाजारातून खरेदी करावे.

रंग

जे टरबूज चांगल्या पद्धतीने पिकलेले असते ते गडद हिरव्या रंगाचे असते त्यामुळे बाजारात टरबूज घेताना शक्यतो गडद हिरव्या रंगाच घ्यावे.

टरबूज चिरून घेत असाल तर

आपल्यापैकी बरेच जण टरबूज घेत असताना बाजारातच त्याला चिरून घेतात अशावेळी लक्षात घ्या की जे टरबूज लाल रंगाचे असेल ते टरबूज नक्कीच गोड आणि चविष्ट असणार आणि तेच टरबूज बाजारातून घ्यावे याउलट जे टरबूज तुम्हाला पांढऱ्या रंगाचे दिसेल आणि ज्याची योग्य वाढ झालेली नाही असे लक्षात येईल असे टरबुज कधीच घेऊ नये कारण ते गोड निघण्याची शक्यता कमीच असते.

देठ

मित्रांनो टरबूज घेताना त्याचे देठ देखील बघितले गेले पाहिजे कारण देठावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असतात. ज्या टरबूजाचे देठ हिरवं असेल, असे टरबूज घेऊ नये कारण त्याला पिकायला अजून एक-दोन दिवसांचा वेळ लागणार आहे. याउलट ज्या टरबुजाचे देठ वाळलेले आहे असे टरबूज खायला योग्य पद्धतीने तयार झाले आहे हे लक्षात घ्या.

how to pick a sweet watermelon, how to tell if a watermelon is bad, watermelon picking guide, good watermelon vs bad, how to tell watermelon is ripe, tips to pick good watermelon in marathi, watermelon yellow spot, कलिंगड मराठी माहिती, गोड टरबूज असं ओळखा
Leave A Reply

Your email address will not be published.