Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

फिरायला जाताना ह्या टिप्स फॉलो करा आणि प्रवासखर्च कमी करा

सुट्ट्यांच्या हंगाम म्हणजे बाहेरगावी फिरायला जाण्याची पर्वणीच. पण बाहेरगावी फिरायला जायचं म्हटल्यावर पैसा वारेमाप खर्च होतो आणि आपलं दर महिन्याचं बजेट इकडचं तिकडे होतं. पण जर बाहेरगावी फिरायला गेल्यावर पण आपला जास्त खर्च नाही झाला तर किती छान होईल ना. म्हणूनच आज आम्ही तुमचं बजेट डळमळू नये म्हणून काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत ज्याने तुमचा प्रवासातला खर्च थोड्याफार प्रमाणात का होईना पण कमी मात्र नक्कीच होईल. चला तर मग बघू कोणत्या आहेत त्या टिप्स.

फ्लाईट टाळा (Avoid Flights)

विमानाने कुठेही प्रवास करायचा म्हणजे किती खर्च होतो तुम्हाला माहित आहेच. तुमच्याकडे मोजकेच पैसे असतील आणि तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर तुमचं बजेट कोलमडलं म्हणून समजा. त्यामुळे फिरायला जाताना रेल्वेचा किंवा बसचा वापर करा. यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी पोचायला थोडा उशीर होऊ शकतो पण तुमचे पैसे नक्कीच वाचतील.

टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या ग्रुप सोबत फिरायला जा (Travel in group)

बरेच टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्या एक ठराविक दरात आपल्याला ठराविक ठिकाणं फिरवून आणतात. जसे कि केसरी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनी तुम्हाला अगदी कमी खर्चात चार धाम यात्रा करवून आणते कारण ह्या यात्रेला तुमच्यासोबत अजून ५० जण असतात. त्यामुळे त्यांचा व्यवस्थापनाचा खर्च बराच कमी होतो आणि एक ठराविक बजेट मध्ये तुमची ट्रिप अगदी उत्तम होऊ शकते.

Travel, travel tips, travel on budget, bagpacking, how to save money while on vacation, money saving travel tips, save money while traveling, प्रवासखर्च टाळण्यासाठी टिप्स, प्रवास
Money saving travel tips in Marathi

पायी चाला (Walk in City)

कुठल्याही नवीन शहरात फिरायला गेल्यावर त्या शहराची तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर ते शहर पायी चालून बघा किंवा तेथील स्थानिक लोकांसोबत सार्वजनिक वाहनातून प्रवास करा. प्रायव्हेट गाडी करून फिरलात तर बरेच पैसे खर्च होतील आणि शहर नीट फिरतादेखील येणार नाही.

बॅगमध्ये खाण्याच्या वस्तू ठेवा (Carry food packets in bag)

लहान मुलांना सोबत घेऊन Travel करत असाल तर त्यांना कधीपण अचानक भूक लागते आणि आपण हॉटेलमधील महागडे अन्न घेऊन उगाच खर्च करतो. तसेच कित्येकदा हॉटेलमधील अन्न चांगले देखील नसते. त्यामुळे हा खर्च टाळण्यासाठी तुम्ही बॅकपॅकमध्ये चिवडा, बिस्कीट यासारखा सुका नाश्ता ठेवू शकता.

ह्याशिवाय पैसे आणि वेळ वाचवायचा अजून एक मार्ग आहे. सकाळी नाश्ता थोडा उशिरा आणि जास्त करायचा (ज्याला आपण Brunch म्हणतो) आणि दुपारचे जेवण टाळायचे. दिवसभर फिरून झाल्यावर थेट रात्रीच मस्त पोटभर जेवायचं.

ऑफ सीझनमध्ये फिरायला जा (Travel in Off-Season)

एखाद्या ठिकाणी फिरायला जाताना तुम्ही कोणत्या सीझनमध्ये जात आहेत ते तपासा कारण गोव्यासारख्या ठिकाणी डिसेंबर महिण्यात जात असाल तर तिथे गर्दी तर फार असणारच पण सोबतीला प्रत्येक गोष्टीचे दर गगनाला भिडलेले असतील. म्हणून फिरायला जाताना अशी वेळ निवड जेव्हा तिथे कमी लोक फिरायला जात असतील, अश्या प्रकारे तुम्ही बरेच पैसे वाचवू शकाल.

हॉस्टेलमध्ये राहा (Avoid Hotels and Try Hostels)

फिरायला गेल्यावर आपल्या राहण्याची व्यवस्था आपण हॉटेलमध्ये करतो पण ह्या हॉटेलवर राहणं काही परवडणारं नसतं. तुम्ही जर एकटे किंवा मित्रांसोबत फिरायला गेले असाल तर हॉटेल ऐवजी Hostel वर राहू शकता. हे हॉस्टेल म्हणजे कॉलेजचं हॉस्टेल नव्हे बरं का. हे हॉस्टेल फिरणाऱ्या लोकांसाठी बांधण्यात आलेलं असते आणि तुमच्यासारखे अनेक फिरायला आलेले लोक तुम्हाला भेटतील आणि अगदी कमी खर्चात तुम्ही इथे राहू शकता.

टी शर्ट्स (T-Shirts)

Travel करत असाल तर शर्ट पेक्षा तुम्ही टी शर्ट्स सोबत ठेवा. T-shirts रोल करून बॅग मध्ये ठेवता येतात आणि ते कमी जागा घेतात परिणामी तुम्ही जास्त कपडे सोबत घेऊन जाऊ शकता. तसेच T-shirts धुतल्यावर लवकर सुकतात आणि त्यांना इस्त्री करायची सुद्धा गरज पडत नाही. तसेच फिरायला जाताना तुमच्याकडे कपड्यांचे एक्सट्रा सेट असुद्या त्यामुळे कपडे लौंड्रीवर होणार खर्च तुम्ही टाळू शकता.

Travel, travel tips, travel on budget, bagpacking, how to save money while on vacation, money saving travel tips, save money while traveling, प्रवासखर्च टाळण्यासाठी टिप्स, प्रवास

गुगल मॅप (Use Google Map)

आपण जेव्हा बाहेरगावी एखाद्या प्रेक्षणीय स्थळी फिरायला जातो तेव्हा आपला जास्तीत जास्त पैसा तेथील जागा फिरवणाऱ्या गाईड्सवर खर्च होतो. आपण बाहेरगावाहून आल्यामुळे गाईड्स सर्रास तोंडाला येईल तो रेट सांगून आपल्याला लुबाडण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला पण ज्ञानाअभवी पैसे खर्च करावे लागतात. पण तुमचे पैसे वाचवण्याची एक भन्नाट आयडिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि ती म्हणजे तुमचा स्मार्ट फोन. होय, तुमच्या स्मार्ट फोनमधील गुगल मॅपची मदत घेऊन तुम्ही कुठेही गेला कि न चुकता सर्व ठिकाणी बिनधास्त फिरू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.