Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

भारतीय ड्रायव्हिंग लायसन वापरून या १० देशांमध्ये तुम्ही बिनधास्त गाडी चालवू शकता

भारतातील सर्व कायदे हे परदेशातील नियम आणि कायद्यांपेक्षा खूप वेगळे आहे. तसंच इतर देशांमध्ये वाहतुकीचे नियम देखील वेगळे आहेत. आपण ड्रायव्हिंग लायसनशिवाय गाडी चालवू शकत नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे. जेव्हा तुम्ही बाहेर देशात जात तिथे तुमच्याकडे लायसन असून सुद्धा गाडी चालवता येत नाही कारण तुमच्याकडे भारताचे ड्रायव्हिंग लायसन असते जे इतर देशांमध्ये चालत नाही.

पण तुम्हाला माहिती आहे का, असे काही देश आहेत जिथे तुमचे भारतीय ड्रायव्हिंग लायसनचा उपयोग करून तुम्ही गाडी चालवू शकता. असे काही देश आहेत जिथे गाडी चालवण्यासाठी आपल्या भारताचे लायसन मान्य आहे.

इतर देशांमध्ये फिरायला जाणारे लोक गुगल वर नेही countries where Indian Driving Licence is valid असं सर्च करतात. चला तर पाहूया कि नक्की कोणकोणत्या देशामध्ये आपल्या भारताचे ड्रायव्हिंग लायसन चालू शकते.

दक्षिण आफ्रिका (South Africa)

दक्षिण आफ्रिकेमध्ये तुम्ही तुमचे भारतीय ड्रायव्हिंग लायसन सोबत ठेऊन आफ्रिकेच्या कोणत्याही भागात मनसोक्त ड्रायव्हिंग करू शकता. मात्र एक लक्षात ठेवा कि, दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्या देशाचे लायसन मंजूर आहे पण ते लायसन इंग्रजी भाषेतील असावे, त्या लायसनवर तुमचा फोटो असावा आणि लायसनवर तुमची सही असणे आवश्यक आहे.

indian driving license valid countries list, driving in foreign countries, countries where indian driving licence is valid, भारतीय ड्रायव्हिंग लायसनचा परदेशात वापर, drive with indian licence
Countries where you can drive using Indian Driving Licence

ब्रिटन (Britain)

ग्रेट ब्रिटनमध्ये असे काही प्रांत आहेत जिथे आपले भारतीय Driving Licence वैध आहे आणि हि प्रांत म्हणजे इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स. या प्रांतामध्ये तुम्ही तुमचे भारतीय लायसन सोबत ठेऊन बिनधास्त गाडी चालवू शकता. या देशामध्ये भारतीय ड्रायव्हिंग पूर्ण एक वर्षासाठी वैध आहे. परंतु, या देशातील वाहतूक विभागाने काही ठराविक वाहनांसाठीच आपल्याला परवानगी दिली आहे आणि फक्त तीच वाहने आपण या देशात चालवू शकतो.

स्वित्झर्लंड (Switzerland)

स्वित्झर्लंड हा देश निसर्गरम्य वातावरणात थाटलेला आहे आणि अशा ठिकाणी छान ट्रिप करणे कोणाला आवडणार नाही. या देशात गेल्यावर तिथल्या नैसर्गिक वातावरणातील रस्त्यांवर गाडी चालवण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. त्यामुळे जर तुमची इच्छा झाली तर तुम्ही स्वित्झर्लंडच्या रस्त्यांवर बिनधास्त ड्रायव्हिंग करू शकता कारण, स्वित्झर्लंडमध्ये आपल्या भारतीय ड्रायव्हिंग लायसनला पूर्ण एक वर्षाची मान्यता आहे.

नॉर्वे (Norway)

नॉर्वे या देशात गेले असता तुम्हाला तिथे स्वतः गाडी चालवून फिरायचे असेल तर सर्वात आधी तुमच्या समोर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे नॉर्वे मध्ये भारतीय लायसन चालते का ? तर काळजी करू नका, कारण नॉर्वेमध्ये एकूण तीन महिन्यासाठी भारतीय ड्रायव्हिंग लायसन चालते.

मॉरिशस (Mauritius)

मॉरिशस या देशामध्ये कोणतीही भारतीय व्यक्ती त्याच्या भारतीय Driving Licence च्या साहाय्याने वाहन चालवू शकते. मॉरिशसमध्ये आपले भारतीय ड्रायव्हिंग लायसन एक महिन्याकरीता मान्य आहे. त्यामुळे कोणतीही भारतीय व्यक्ती मॉरिशससारख्या निसर्गरम्य देशाच्या रस्त्यावर बिनधास्त गाडी चालवू शकते.

ऑस्ट्रेलिया (Australia)

ऑस्ट्रेलिया या खंडप्राय देशातसुद्धा इतर देशांप्रमाणे आपले भारतीय ड्रायव्हिंग लायसन वैध आहे. तुम्ही आरामात तुमचे ड्रायव्हिंग लायसन सोबत ठेऊन ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर वाहन चालवू शकता. या देशामध्ये आपल्या देशाचे लायसन पूर्ण तीन महिन्यासाठी मंजूर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि, तुमचे भारतीय ड्रायव्हिंग लायसन हे इंग्रजी भाषेतच असावे.

न्यूझीलंड (New Zealand)

न्यूझीलंड या देशात तुमचे भारतीय Driving Licence पूर्ण एक वर्षासाठी मंजूर आहे. परंतु, तुम्हाला एका प्रक्रियेद्वारे जावे लागते आणि ती म्हणजे, तुम्हाला तुमचे भारतीय ड्रायव्हिंग लायसन न्यूझीलंडच्या स्थानिक भाषेत रूपांतरित करून घ्यावे लागते. हि प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही न्यूझीलंडच्या रस्त्यावर विनाकाळजी ड्रायव्हिंग करू शकता, फक्त सोबत तुमचे लायसन असुद्या.

फ्रान्स (France)

फ्रान्स हा असा देश आहे ज्या देशाला असंख्य परदेशी लोक भेट द्यायला जात असतात. कारण, फ्रान्स या देशाला सांस्कृतिक आणि मोठे ऐतिहासिक वारसा लाभला आहे. म्हणूनच अनेक भारतातील लोक या देशात पर्यटनासाठी येत असतात. अशावेळी जर तुम्हाला फ्रान्समध्ये तुम्हाला गाडी चालवायची असेल तर काळजी करू नका. या देशात देखील भारतीय Driving Licence मंजूर आहे. फक्त तुम्हाला आपले भारतीय ड्रायव्हिंग लायसन फ्रान्सच्या स्थानिक भाषेत म्हणजेच फ्रेंचमध्ये भाषांतरित करून घ्यावा लागते.

indian driving license valid countries list, driving in foreign countries, countries where indian driving licence is valid, भारतीय ड्रायव्हिंग लायसनचा परदेशात वापर, drive with indian licence

जर्मनी (Germany)

तुमचे भारतीय Driving Licence जर्मनी या देशामध्ये सुद्धा मान्य आहे. फक्त तुम्हाला German Diplomatic Mission यांच्याकडे जर्मनीच्या स्थानिक भाषेत म्हणजेच जर्मनमध्ये Licence भाषांतर करायला द्यावे लागते. हि प्रक्रिया झाल्यानंतर भारतीय लोक सुद्धा जर्मनीमध्ये वाहन चालवू शकता. जर्मनीमध्ये भारतीय लायसन सहा महिन्यासाठी मंजूर आहे.

अमेरिका (America)

अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशामध्ये सुद्धा भारतीय Driving Licence चा वापर करून तुम्ही गाडी चालवू शकता. परंतु, अमेरिकेमध्ये वाहन चालवण्यापूर्वी तुम्हाला आंतरराष्ट्रीय वाहतूक परवाना आणि I-94 फॉर्म भरणे अनिवार्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.