Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

रस्त्यावरील अपघातांपासून वाचायचं आहे..? तर मग रस्त्यावर असलेल्या पट्यांचा अर्थ समजून घ्या

प्रवास कोणाला नाही आवडत हो….फिरायला जायचं म्हटलं की सर्वच जण कसे उड्या मारत तयार होतात. त्यातल्या त्यात ट्रेनपेक्षा रस्त्याने प्रवास करायचा म्हटलं तर जसं की चेरी ऑन केकचं ! बस, कार, बाईक अशा कोणत्याही वाहनाने जायचं म्हटलं की आपण निश्चिंत असतो. स्वतःचं वाहन असेल तर कसला त्रास नाही, काही नाही…मस्त आराम करत आजूबाजूच्या प्रदेशाकडे कुतुहलाने पाहत रस्ता कापायचा असतो.

मंडळी तुमच्यापैकी प्रत्येकाने कधी न कधी रस्त्याने प्रवास केला असेल, पण तुमच्यापैकी फारच कमी जणांचं लक्ष रस्त्यावरील एक वेगळ्या गोष्टीने वेधून घेतलं असेल. ती वेगळी गोष्ट थेट रस्त्यावरच असते. तुमच्या आमच्या वाटेत सतत आडवी येते. नाही ओळखलंत ? अहो आम्ही रस्त्यांवरील पट्ट्यांबाबत म्हणतोय…. हे पट्टे अर्थात लाईन्स रस्त्यावर प्रशासनाकडूनच आखले जातात आणि प्रशासनाकडून हे पट्टे आखले जातात म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी लॉजिक असणारच….!

traffic lines on the road in india, types of road markings, road markings and what they mean in marathi, can you cross a solid white line, horizontal white lines on highway, overtaking road markings, road lines meaning in marathi, white and yellow lines on road meaning in marathi, yellow lines on the road mean, रस्त्यावरील पांढऱ्या पिवळ्या पट्यांचा अर्थ
Road lines meaning in Marathi

जर अजूनही या लाईन्सकडे तुम्ही निरखून पाहिलं नसेल तर पुढच्या वेळेस नक्की पहा. तुम्हाला वेगवेगळ्या रस्त्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स दिसून येतील. काही ठिकाणी तुम्हाला सरळसोट पांढ-या रंगाची पट्टी दिसेल तर काही रस्त्यांवर पिवळ्या रंगाची पट्टी दिसेल. कधी कधी या पट्ट्या तुटक देखील असतात तर काही समांतर रस्त्याच्या मधोमध. पण, अजूनही ब-याच लोकांना या पट्टयांमागील खरं कारण माहित नाही पण ते अत्यंत महत्वाचं कारण आहे. मित्र-मैत्रिणींनो चला तर जाणून घेऊयात वाहतूकीचे महत्त्वाचे पण काही हटके नियम.

भरीव पांढरी पट्टी (Solid white line)

या सरळसोट आणि जाडसर पट्टया असं दर्शवतात की तुम्ही ज्या लेनमधून जात आहात त्याच लेनमधून गाडी पुढे न्यावी. लेन बदलून दूस-या लेनमध्ये जाऊ नये.

तुटक पांढरी पट्टी (Broken white line)

traffic lines on the road in india, types of road markings, road markings and what they mean in marathi, can you cross a solid white line, horizontal white lines on highway, overtaking road markings, road lines meaning in marathi, white and yellow lines on road meaning in marathi, yellow lines on the road mean, रस्त्यावरील पांढऱ्या पिवळ्या पट्यांचा अर्थ
Broken white line meaning

हि लाईन त्या रस्त्यांवर असते जिथे डिव्हायडर्स नसतात. अशावेळी चालक लेन बदलून दूस-या लेनमध्ये गाडी चालवू शकतो. पण, असे करताना खबरदारी बाळगावी. समोरून किंवा मागून गाडी येत नसल्याची खात्री करून मगचं लेन बदलावी.

भरीव गडद पिवळ्या रंगाची पट्टी (One solid yellow line)

या भरीव पिवळ्या लाईन हे दर्शवतात की चालक पुढील गाड्यांना ओव्हरटेक करू शकतो. परंतु पिवळी पट्टी क्राॅस करू शकतं नाही. पण या पट्टयांचे नियम प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत.

दूहेरी भरीव पिवळ्या पट्टया (Double solid yellow lines)

traffic lines on the road in india, types of road markings, road markings and what they mean in marathi, can you cross a solid white line, horizontal white lines on highway, overtaking road markings, road lines meaning in marathi, white and yellow lines on road meaning in marathi, yellow lines on the road mean, रस्त्यावरील पांढऱ्या पिवळ्या पट्यांचा अर्थ
Double solid yellow lines meaning

या दुहेरी भरीव आणि गडद पिवळ्या पट्ट्या हे दर्शवतात की या रस्त्यावर पासिंग करण्यास परवानगी नसून एका लाईनमध्ये पुढे जायचं आहे.

तुटक पिवळी पट्टी (Broken Yellow Line)

तुटक पिवळी पट्टीचा अर्थ असा आहे की इथे पासिंग करण्यास परवानगी आहे पण, ती देखील काळजीपूर्वक !

एक भरीव पिवळी पट्टी आणि एक तुटक पिवळी पट्टी (Solid yellow line with broken yellow line)

traffic lines on the road in india, types of road markings, road markings and what they mean in marathi, can you cross a solid white line, horizontal white lines on highway, overtaking road markings, road lines meaning in marathi, white and yellow lines on road meaning in marathi, yellow lines on the road mean, रस्त्यावरील पांढऱ्या पिवळ्या पट्यांचा अर्थ
Solid yellow line with broken yellow line meaning

अशा प्रकारच्या पट्टया ज्या रस्त्यांवर आहेत त्यावर चालक जर तुटक पिवळ्या पट्ट्यांच्या बाजूने वाहन चालवत असेल तर त्याला ओव्हरटेक (Overtake) करण्यास परवानगी आहे. परंतु, जर चालक भरीव पिवळी पट्टीच्या बाजूने आपली गाडी चालवत असेल तर तो ओव्हरटेक करू शकत नाही !

तर मंडळी असं आहे हे सगळं…आता या पट्ट्यांमधला नेमका फरक तुमच्या लक्षात आला असेलच. तर यापुढे नक्की हे नियम कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या सोबत इतरांना सुद्धा हे नियम समजावून सांगा.. जेणेकरून हे नियम माहित झाल्यावर तरी लोक नियमांचं उल्लंघन न करता गाडी चालवतील आणि अपघातांचे प्रमाण कमी होऊन लोकांचे जीव तरी वाचतील…!

Leave A Reply

Your email address will not be published.