Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगरच्या काळकोठडीत मृत्यू झालेला मराठ्यांचा दुर्दैवी छत्रपती

करवीर, भद्रकाली ताराराणी यांनी स्थापन केलेलं राज्य. १८७० मध्ये करवीर अत्याचाराने आणि अनागोंदीने किंचाळत होत. राज्याच्या राणीसाहेब सकवारबाई यांना अवघ्या वयाच्या साडे दहाव्या वर्षी वैधत्व आलं होत. राणीसाहेब राज्यातील या अनागोंदीच्या प्रकाराने अक्षरशः अगतिक आणि हवादिल झाल्या होत्या, आणि दुष्काळातच तेरावा महिना उजाडावा तसा १८७१ च वर्ष उजाडल. महादेव बर्वे नावाचा कारस्थानी आणि कपटी माणूस करवीर राज्यात दाखल झाला. या बर्व्याने आल्यानंतर पहिल्यांदा दरबार सेवेतील सगळ्या ब्राम्हणोत्तरांना हाकलून दिले अन त्या सगळ्या ठिकाणी ब्राम्हनांच्या नेमणूका केल्या. पुढे मुंबई सरकारने (ब्रिटिश कालावधीमध्ये याला Bombay Presidency असं म्हणत) भोसले कुळातील सावर्डेकर भोसल्यांचा पुत्र नारायण यास दत्तक घेण्यास सकवारबाईंना मंजुरी दिली. आणि अशारितीने करवीर राज्याच्या गादीवर चौथे शिवाजी म्हणून नारायणराव विराजमान झाले.

करवीर छत्रपती चौथे शिवाजी हळूहळू मोठे होऊ लागले, राजदरबारातील कारभाराची त्यांना जाण येऊ येऊ लागली. छत्रपती ते असले तरी कारभार हा दिवाण बर्व्याच्या हाती होता. सगळं काही एकतंत्री. जशी वर्षे पुढे जाऊ लागली तशी छत्रपती चौथे शिवाजी यांना अधिक समाज येऊन दिवाण बर्व्यांची कृष्णकृत्ये समझू लागली. याचा अंदाज दिवाण बर्व्याला लवकरच लागला आणि त्या कपटी माणसाच्या मनात विकृत विचार घोंगाऊ लागले. दिवाण बर्व्याने छत्रपती आपल्या कारभाराच्या आड येऊ नये आणि आपल्या कृष्णकृत्याची भांडाफोड होऊ नये म्ह्णून करवीर छत्रपती मनोरुग्ण असल्याच्या अफवा पसरवायला सुरवात केली. दरबार सेवेत असलेल्या त्याच्या अनेक चमच्यांद्वारे करवीरच्या लोकांमध्ये या गप्पा रंगवण्यात आल्या. पुढे गोऱ्यांच्या संगमताने सार्जंट ग्रीन आणि कॉक्स ह्या दोन इंग्रजांना छत्रपती चौथे शिवाजी यांच्या देखभाली साठी मागवून घेण्यात आले, आणि मग शिवाजीला दिवसेंदिवस अधिकच वेडा ठरवण्याचा खेळ चालू करण्यात आला.

मराठ्यांचा दुर्दैवी छत्रपती, मराठ्यांचा छत्रपती, करवीर, भद्रकाली ताराराणी, चौथे शिवाजी, मराठा आणि केसरी, कारस्थानी ब्राम्हण, Hutatma Karveer Chatrapati Chauthe Shivaji Maharaj, Shivaji IV was Raja of Kolhapur, मराठ्यांच्या इतिहास, Maratha History
करवीर छत्रपती चौथे शिवाजी
Source – Discover Maharashtra

हा खेळ चालू असताना हे गोरे अधून मधून शिवाजीच्या या वेडेपणाबाबत अनेक गोष्टी रंगवायचे, एकदा त्यांनी जाणीवपुर्वक सांगितले..

“शिवाजी महाराजांचं वेड पराकोटीला गेलं आहे. आम्ही घौडदौड करत असताना महाराजांनी अचानक माझ्या अंगावर घोडा फेकला आणि माझ्यावर चाबूक फटकाराला”.

आता या खेळाचं रूपांतर अमानुष छळात झालं होत. करवीर खालसा करणे हे गोऱ्याचं ध्येय, ते साध्य झालं की ब्रिटिशांची अनियंत्रित सत्ता थैमान घालायला मोकळीच. या अतोनात छळाचे किंचाळने पुण्यात येऊन धडकले. मराठा आणि केसरी या वृत्तपत्रामधून दिवाण बर्वे आणि गोऱ्यावर कडाडून प्रहार झाला. दिवाण बर्व्याच्या या कटकारस्थानाने अख्खा मराठी मुलुख हादरला. यावर दिवाण बर्व्याने टिळक आणि आगरकरांवर अब्रुनुकसानीचा खटला भरला. गोऱ्यांच्या संगनमताने टिळक आणि आगरकरांना शंभर दिवसांची शिक्षा झाली आणि वातावरण थंड करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.

यानंतर शिवाजीचं वेड वाढत जात असल्याचा रिपोर्ट मुंबई सरकारला देण्यात आला आणि करवीर छत्रपती चौथे शिवाजी यांना अहमदनगरच्या किल्ल्यात कैद करण्यात आले. त्यांच्या बंदोबस्ताला होता मानवी सैतान सार्जंट ग्रीन हा गोरा. स्वकीयांपासून एकाकी दूर ठेवण्यात आलेल्या शिवाजीवर अतोनात अत्याचार तिथे होऊ लागले पण येणाऱ्या किंचाळ्या आणि उठणारे व्रण बघायला दगडाच्या भिंती सोडून कोणी नव्हतं.

शिवाजी मनोरुग्ण झाला आहे, त्याला वेडाचे झटके येतात, तो पिसाळून उठतो अश्या विकृत अफवा पसरवण्याचे काम अजून चालूच होत. आणि जणू पाचवीला पुजलेला अतोनात अत्याचार. महिनो महिने चालेला हा अत्याचार असह्य होऊन शिवाजीने प्रतिकार केला पण तो एकाकी होता, दुबळा होता. एके दिवशी झालेल्या मारहाणीत सार्जंट ग्रीन सैतानाने जोरदार बुटाची लाथ शिवाजीच्या पोटावर मारली आणि प्लिहा फुटून त्यांचा तिथेच स्वर्गवास झाला.

अहमदनगरच्या काळकोठडीत मराठ्यांचा हा दुर्दैवी छत्रपती एका फडतूस गोऱ्याच्या मारहाणीत बळी पडला ती तारीख 24 डिसेंबर 1883. छत्रपती राजाराम महाराजांच्या नंतर स्वराज्याची धुरा हाती घेऊन औरंग्याला महाराष्ट्रातच पैगंबरवासी करणाऱ्या भद्रकाली ताराराणींच्या राज्यात एका कारस्थानी ब्राम्हणाच्या आणि सैतानी इंग्रजांमुळे मराठ्यांच्या छत्रपतीचा दुर्दैवी अंत झाला.


Leave A Reply

Your email address will not be published.