Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

चीन वापरत असलेले हायब्रीड वॉरफेअर म्हणजे काय ?

गेल्या अनेक दिवसांपासून चीन आणि भारत यांच्यातील तणाव वाढताना आपण पाहिले आहे. 1962 च्या युद्धात झालेल्या मृत्यूनंतर भारत आणि चीनच्या सीमेवर कितीही तणाव असला तरी जीवितहानी झाल्याची नोंद नव्हती पण आता हा वाद त्याच्यापुढे गेला आहे. थोडं लक्ष देऊन पाहिल्यास दोन्ही सरकार मध्ये विविध स्तरांवर चर्चा चालू असल्याच्या बातम्या दोन्ही बाजूनी दिल्या जातात पण नंतर तणावाचे वातावरण दिसू लागते. याचा नेमका अर्थ काय ?

चीन आता त्याच्या जुन्या खेल्या पुन्हा वापरात असल्याचं हे चिन्ह. सीमेवर कोणताही गोळीबार करायचा नाही पण शत्रूराष्ट्रांच्यात अशांतता निर्माण करायची हा त्याचा एक मोठा भाग. चीन हे सतत करत आला आहे आणि यालाच हायब्रीड वॉरफेअर (Hybrid warfare) अस म्हणतात. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध मंत्री, उच्च अधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर चीनने पाळत ठेवल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे चीनने आता हायब्रीड वॉरफेअर भारताविरुद्ध वापरायला सुरवात केल्याच्या जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहेत.

Hybrid warfare, Hybrid warfare in marathi, चीन, भारत, हायब्रीड वॉरफेअर, आर्थिक युद्ध, माहितीपूर्ण लेख
Source – News18.com

वरवरचं वाचल्यानंतर आता तुम्हाला प्रश पडला असेल की हायब्रीड वॉरफेअर म्हणजे नेमकं काय ? तर खालील गोष्टींचा या हायब्रीड वॉरफेअरमध्ये समावेश होतो.

तंत्रज्ञाना मध्ये अव्वल असणारा चीन विविध उपकरांनाचा वापर करून शत्रुराष्ट्राच्या महत्वाच्या व्यक्तीवर लक्ष ठेवतो आणि माहिती चोरतो. ही माहिती तांत्रिक पध्दतीने विश्लेषण केली जाते आणि मग त्यावर रणनीती ठरवून त्या देशात सामाजिक द्वेष पसरवला जातो. अर्थव्यवस्थेला अधिक नुकसान करणे आणि शांतता भंग करणे हे यातील प्रमुख उद्दिष्ट.

अगदी जगाला खुळ्यात काढून आम्ही म्हणजे पैक्के वैरी असे दाखवणारे चीन आणि रशिया दोघेही आतल्या अंगाने मात्र एकमेकाला मदत करतात. क्रिमिया देशावर विजय मिळवण्यासाठी रशियाने याच तंत्रज्ञानाचा वापर केल्याचेही आता समोर आले आहे.

हायब्रीड वॉरफेअर मध्ये चीन सगळ्यांचा बाप असल्याचे वारंवार सिद्ध सुद्धा झाले आहे म्हणूनच अमेरिकेने याला आळा घालण्यासाठी चीनच्या विविध तंत्रज्ञान कंपन्यांना बॅन करण्याचे जोरदार प्रयत्न चालू केलेत. 5G तंत्रज्ञान च्या प्रयोगात हुवाई या चीनच्या कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवला तो यासाठीच.

1990 च्या दशकात चीनच्या अनेक तंत्रज्ञानस्नेहीनी सीमेवर युद्ध करण्यापेक्षा राजकीय आणि आर्थिक युद्ध करून शत्रू राष्ट्राला संपवायची थेरी मांडली आणि चीनने ही वापरात आणून नवी युद्धनीती तयार केली. हे युद्ध कोणत्याही सैन्याशी नसून तेथील सर्वसामान्य जनतेशी असत. त्या देशात अशांतता माजवायची, आर्थिक खच्चीकरण करायचे आणि या सगळ्याचा लोकांवर कसा परिणाम होईल याची पुरेपूर खबरदारी घ्यायची. यालाच तंत्रज्ञानाची मोठी जोड देऊन काम केलं जातं आणि यासाठी शत्रूराष्ट्रात जायची सुद्धा गरज नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.