Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

RAW ची चतुराई आणि Indian Army च्या शौर्याने ९३ हजार पाक सैनिकांना गुडघे टेकायला भाग पाडलं

RAW ने पाकिस्तानचा “The Bird is Caged” हा संदेश पकडला आणि….

बांग्लादेशच्या निर्मितीसाठी भारताचे योगदान फार मोठे आहे. बांगलादेश मुक्तीसाठी भारताने पाकिस्तानशी पुकारलेल्या युद्धाची सुरुवात झाली २५ मार्च १९७१ ला आणि त्याचा विजयी शेवट झाला १६ डिसेंबर १९७१ ला आणि म्हणूनच आपण १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस (Vijay Diwas) म्हणून साजरा करतो. ९३,००० पाकिस्तानी सैनिकांना गुडघे टेकविण्यास भाग पडणाऱ्या Indian Army चा अभिमान प्रत्येक भारतीयास वाटायला हवा असा पराक्रम भारतीय सेनेने या युद्धात गाजवला.

पण, या युद्धात भारताच्या गुप्तचर खात्याचे अर्थात RAW (Research and Analysis Wing) चे सुद्धा फार मोठे योगदान आहे ज्याबद्दल फारसे कुणी बोलत नाही किंवा RAW ने बजावलेल्या कामगिरीची कुणी आठवण काढत नाही असे आपण म्हणूया. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून गुप्तहेर खात्याचे महत्व वेळोवेळी अधोरेखित झालेले आहे.

indo pakistani war of 1971 results, bangladesh 1971 war history, 1971 war stories, 1971 bangladesh war photos, mukti bahini, Vijay Diwas 16 December, Sheikh Mujibur Rahman,Bangladesh Liberation War, RN Kao, RAW, Yahya Khan, बांगलादेश मुक्ती वाहिनी, १९७१ भारत पाक युद्ध, १६ डिसेंबर विजय दिवस, 1971 India pakistan war in marathi
Role of RAW and RN Kao in Bangladesh Liberation War 1971

१९७१ भारत पाकिस्तान युद्धातही RAW ने एक यशस्वी कामगिरी पार पडली ती R. N. Kao यांच्या नेतृत्वाखाली. १९७१ भारत पाकिस्तान युद्धाची २ भागात विभागणी करता येईल, एक म्हणजे RAW ने यशस्वीरित्या पार पाडलेले गुरिल्ला ऑपरेशन आणि भारतीय सेना व पाकिस्तानी आर्मीचे समोरासमोर घडलेले युद्ध ज्याविषयी आपण सर्वच जाणतो.

डिसेंबर १९७० च्या पूर्वार्धात पाकिस्तानमध्ये निवडणुक होणार होत्या आणि त्यात जर मुजिबूर रेहमान (Sheikh Mujibur Rahman) यांना बहुमत प्राप्त झाले तर ते पाकिस्तानचे तत्कालीन पूर्व पाकिस्तानवरील शासन मान्य करणार नाहीत अशी खबर RAW च्या सूत्रांनी भारत सरकारला दिली. कारण RAW चे हस्तक आधीच पाकिस्तानच्या सैन्य गोटात तसेच पाकिस्तानी राजकीय वर्तुळात गुप्तपणे दाखल झाले होते व सक्रिय होते.

९३,००० पाकिस्तानी सैनिकांना गुडघे टेकण्यास भाग पाडणाऱ्या भारतीय सेना व RAW चे कौतुक करावे तितके कमी कारण हि संपूर्ण मोहीम व १९७१ चे युद्ध भारताच्या उत्कृष्ठ युद्धनीतीचे एक उदाहरणच म्हणता येईल. चीनसोबत झालेल्या युद्धातील चुका भारताने ह्यावेळेस टाळल्या ज्याचे श्रेय इंदिरा गांधींच्या खंबीर नेतृत्वाला सुद्धा नक्कीच जाते.

हे युद्ध २ टप्प्यात, २ भागात लढले गेले

पहिला टप्पा म्हणजे RAW ने सुमारे १ लाख पूर्व पाकिस्तानातील बांग्लादेशींना गुरिल्ला युद्धाचे प्रशिक्षण देऊन पूर्व पाकिस्तानातील पाक सैन्याचे कंबरडे मोडले. RAW ने प्रशिक्षण दिलेले १ लाख बांगलादेशी सैनिक ज्यांनी तब्बल ८ महिने गुरिल्ला युद्धनीतीद्वारे पाकिस्तानी सैन्याची दमछाक घडवून आणली. १९७१ च्या मुख्य युद्धाच्या आधी झालेली पाकिस्तानी सैन्याची दमछाक साहजिकच भारतीय सैन्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारी होती. या मोहिमेतील पहिला टप्पा RAW व आर एन काओ यांनी यशस्वी पार पाडला व आपले काम फत्ते केले.

आता वेळ होती दुसऱ्या व निर्णायक टप्पा पार पडण्याची जी भारतीय सैन्याने केवळ २ आठवड्यात पार पडली. ३ ते १६ डिसेंबर दरम्यान चाललेल्या या भारत पाकिस्तान युद्धात (India Pakistan War 1971) आधीच दमलेल्या पाकी सैन्याने सहज गुडघे टेकले. याह्या खानला (Yahya Khan – President of Pakistan) पुढे घडणाऱ्या घटनांची कुणकुण आधीच लागली असावी. म्हणूनच याह्या खान ढाक्याहून कराचीला सुखरूप पोहोचताच सुरु झाली पाकिस्तानी सैन्याची क्रूरता व दडपशाही.

indo pakistani war of 1971 results, bangladesh 1971 war history, 1971 war stories, 1971 bangladesh war photos, mukti bahini, Vijay Diwas 16 December, Sheikh Mujibur Rahman,Bangladesh Liberation War, RN Kao, RAW, Yahya Khan, बांगलादेश मुक्ती वाहिनी, १९७१ भारत पाक युद्ध, १६ डिसेंबर विजय दिवस, 1971 India pakistan war in marathi
Pakistan President Yahya Khan (left) and USA President Nixon (right)

मध्यरात्री १.३० वाजता पाकिस्तानी सैन्याने मुजिबूर रेहमानच्या निवासस्थानाला घेराव घातला व त्यांना अटक केली.

RAW ने पाकिस्तानचा “The Bird is Caged” हा संदेश पकडला व तात्काळ भारत सरकारला हि माहिती दिली कि मुजीबुर यांना पाकिस्तानने अटक केली आहे व पुढील पावले त्वरित उचलावीत. Sheikh Mujibur Rahman हे बांगलादेश मुक्ती चळवळीसाठी लढणारे महत्वाचे नेते होते जे पुढे जाऊन बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष बनले.

RAW चा हा संदेश मिळताच पंतप्रधान इंदिरा गांधी, जनरल सॅम माणेकशॉ आणि आर एन काव यांची तातडीची बैठक पार पडली ज्यात पुढे कोणती पावले उचलायची याची आखणी केली गेली. भारतीय सेनेने थेट युद्धात उतरण्याआधी भारतीय सेनेसाठी अनुकूल परिस्थिती तयार करण्याची जबाबदारी RAW व RN Kao यांचावर होती. काओ यांच्या नेतृत्वाखाली RAW च्या कुशल अधिकाऱ्यांची टीम होती ज्यात के शंकरन नायर, पी एन बॅनर्जी, ब्रिगेडियर एम बी के नायर, या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

RAW ने अजून एक महत्वपूर्ण खबर भारत सरकारला दिली ती म्हणजे पाकिस्तानचे सैन्य मोठया प्रमाणात पूर्व पाकिस्तान भागात स्थलांतरित होणार आहे. म्हणजेच पाकिस्तानलाही कदाचित कल्पना असावी कि शेख मुजिबूर रेहमान पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानपासून तोडण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच पाकने इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्य त्या भागात पाठविण्याची तयारी केली असावी. हे सैन्य हवाई मार्गाने जाणार असल्याचे RAW ने भारत सरकारला कळविले होते.

काव यांनी अगदी चतुराईने तो हवाई मार्ग बंद केला व पाकिस्तानची कोंडी केली

हा हवाई मार्ग बंद झाल्यामुळे पाकिस्तानला कोलंबो (श्रीलंका) हवाई मार्गाद्वारे पूर्व पाकिस्तानात जावे लागले व अर्थातच यात जास्त वेळ गेला. २५ मार्च १९७१ ला पाकिस्तान लष्करशहा याह्या खान ढाका इथे दाखल झाला. त्याला RAW ची इतकी धास्ती होती कि आपल्या सुरक्षेसाठी त्याने कडक बंदोबस्त तैनात केला होता. डिसेंबर १६ ला बांगलादेशला भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. १६ डिसेंबर हा दिवस भारतात व बांग्लादेशात सुद्धा विजय दिवस (Vijay Diwas) व मुक्तिदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

indo pakistani war of 1971 results, bangladesh 1971 war history, 1971 war stories, 1971 bangladesh war photos, mukti bahini, Vijay Diwas 16 December, Sheikh Mujibur Rahman,Bangladesh Liberation War, RN Kao, RAW, Yahya Khan, बांगलादेश मुक्ती वाहिनी, १९७१ भारत पाक युद्ध, १६ डिसेंबर विजय दिवस, 1971 India pakistan war in marathi
93000 Pakistani Soldiers surrender to Indian Army

भारतीय सैन्याने १९७१ च्या युद्धात (Bangladesh Liberation War) बजावलेला पराक्रम सर्वच जाणतात पण RAW ने या युद्धात बजावलेल्या अत्यंत महत्वाच्या कामगिरीविषयी फार कमी लोकांना माहिती असावी. या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या RAW व भारतीय सेनेला आमचा सलाम

जय हिंद !

भुज मधील काही महिलांनी १९७१ च्या युद्धाचा निकालंच फिरवला

Leave A Reply

Your email address will not be published.