Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

देशातील विविध राज्यांच्या नावामागे दडलेला इतिहास

ऋषी कश्यप यांच्या नावावरून काश्मीर हे राज्य नावारूपाला आलं. मग महाराष्ट्राच्या नावामागे काय इतिहास दडलाय ?

भारत हा विभिन्न संस्कृती आणि भाषांचा एक अथांग समुद्र आहे आपल्याकडे प्रत्येक ३० किलोमीटरला भाषा बदलते असं म्हटलं जातं. एवढी विविधता असताना देखील आपण एकसंध आहोत हेच भारताचं वैशिष्ट्य आहे.

आपण सर्वजण भारताच्या विविध राज्यांमध्ये राहतो, ज्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची संस्कृती आहे आणि इतर राज्यांपेक्षा वेगळी भाषा तिथे बोलली जाते. मग आपल्या या राज्यांची आणि केंद्र शासीत प्रदेशांची नावं कशा पद्धतीने ठेवण्यात आली असतील याचा विचार केला आहे का ?

मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलो आहोत…..

काश्मीर

आपण सर्वांनी ऋषी कश्यप यांचं नाव नक्कीच ऐकलं असेल, त्यांच्या नावावरूनच या भागाचं नाव काश्मीर असं ठेवण्यात आलेलं आहे. या भागात पाण्याचा बर्फ होतो त्यामुळे संस्कृत मध्ये अशा भागाला ‘क अश्मीर’ असे म्हणतात, क म्हणजे पाणी आणि अश्मिर म्हणजे दगड म्हणून या भागाचं नाव काश्मीर असं ठेवण्यात आलं.

पंजाब

पंजाब हा शब्द भारत आणि इराणी संस्कृतीचा संगम आहे. यामधील पंज म्हणजे पाच आणि आब म्हणजे पाणी, म्हणजेच ज्या ठिकाणी पाच नद्यांचा संगम होतो त्या भागाला पंजाब असं म्हटलं जातं आणि अशाच प्रकारे या भागाला पंजाब असं नाव देण्यात आल.

हिमाचल प्रदेश

या भागात बर्फ एखाद्या चादरी सारखा डोंगरावरती अंथरलेला असतो आणि इथे प्रचंड थंडी असते म्हणून ह्या भागाला हिमाचल प्रदेश असं म्हटलं जातं. हिमाचल प्रदेश या शब्दाची उत्पत्ती सुद्धा संस्कृत भाषेतून झालेली आहे. संस्कृतमध्ये हीम म्हणजे बर्फ आणि आचल म्हणजे डोंगर, ज्या भागात डोंगर मोठ्या प्रमाणात बर्फाने आच्छादित होतात त्या भागाला हिमाचल प्रदेश असं म्हणतात.

हरियाणा

एका कथेनुसार असं सांगितलं जातं या भागात महाभारत काळात श्री कृष्ण आले होते. श्रीकृष्ण म्हणजेच श्रीहरी, ते या भागात ते येऊन गेले म्हणून या भागाला हरियाणा असं नाव देण्यात आलं.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश राज्य भारताच्या उत्तर सीमेजवळ स्थित असल्यामुळे या प्रदेशाला उत्तर प्रदेश असं नाव देण्यात आलेलं आहे.

उत्तराखंड

इसवी सन 2000 मध्ये उत्तराखंड हे राज्य उत्तरप्रदेश पासुन वेगळं करण्यात आलं. प्रशासकीयदृष्ट्या कारभार सांभाळण्यासाठी अशा प्रकारची रचना करण्यात आली. उत्तर प्रदेश पासून खंडित झालेला प्रदेश म्हणून या प्रदेशाला उत्तराखंड असं नाव देण्यात आलेलं आहे.

राजस्थान

या राज्याच्या नावाची उत्पत्ती देखील संस्कृत मधून झालेली आहे. यातील राज हा शब्द राजा या संस्कृत शब्दातून घेण्यात आलेला आहे आणि स्थान म्हणजे ठिकाण, जिथे पराक्रमी राजे राहतात ते ठिकाण म्हणजे राजस्थान असा याचा अर्थ आहे.

बिहार

या शब्दाची उत्पत्ती बौद्ध संस्कृतीतून झालेली आहे. कारण या राज्यात मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्खूंसाठी विहार बांधण्यात आले होते म्हणून पुढे अपभ्रंश होत या राज्याचे नाव बिहार असे ठेवण्यात आले.

पश्चिम बंगाल

या शब्दाची उत्पत्ती देखील संस्कृत भाषेतील वांग या शब्दामधून झालेली आहे पण पुढे अनेक लोकांनी केलेल्या अपभ्रंशामुळे बंगाली लोक याला बांगला म्हणतात तर हिंदी मध्ये याला बंगाल असे म्हणतात. इंग्रजांनी बंगालची फाळणी केल्यामुळे या भागाला पश्चिम बंगाल असे नाव देण्यात आलेलं आहे, अशी कथा देखील प्रचलित आहे.

झारखंड

या नावाची उत्पत्ती देखील संस्कृत भाषेतून झालेली आहे. संस्कृत भाषेनुसार झर म्हणजे जंगल आणि खंड म्हणजे प्रदेश. या राज्यात जंगल मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून या राज्याला झारखंड अस नाव देण्यात आलं.

ओडिशा

या नावाची उत्पत्ती देखील संस्कृत भाषेतून झालेली आहे. या राज्यात ओड्रा जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असतात आणि शा म्हणजे प्रदेश म्हणून या राज्याला ओडिशा असं नाव पडलं.

छत्तीसगढ

या राज्याच्या नावाची विशेष अशी कथा उपलब्ध नाही तरीही असं लक्षात येतं की या भूभागात 36 किल्ले आहेत, म्हणून या राज्याला छत्तीसगड असं नाव देण्यात आलेलं आहे.

मध्य प्रदेश

या शब्दाचा अर्थ सर्वश्रुत आहे आणि सर्वांना माहिती असेल जो प्रदेश भारताच्या अगदी मधोमध स्थित आहे त्याला मध्य प्रदेश असं नाव देण्यात आलेलं आहे.

गुजरात

या भागात गुज्जर लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास होते असं सांगितलं जातं त्यामुळेच पुढे अपभ्रंश होत या राज्याला गुजरात असं नाव देण्यात आलं. पण पुढे या भागात सर्व प्रकारचे व्यापारी स्थित झाले आणि त्यांनी या प्रदेशाची एक वेगळी भाषा शैली शिकली या वैशिष्ट्यपूर्ण भाषेला प्रदेशा नुसारच गुजराती असं नाव देण्यात आलं.

महाराष्ट्र

आपल्या महाराष्ट्राचे नाव देखील संस्कृत भाषेतून घेण्यात आलेलं आहे, यातील महा म्हणजे भव्य (ग्रेट) आणि राष्ट्र म्हणजे देश, ज्या राज्याने आपलं नाव सर्वदूर पसरलेलं आहे अशा राज्याला महाराष्ट्र असं नाव देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र या शब्दाच्या अनेक कथा उपलब्ध आहेत परंतु भारतामध्ये सर्व ठिकाणी संस्कृत शब्दातूनच राज्यांच्या नावाची उत्पत्ती झालेली आहे, त्यामुळेच संस्कृत शब्दानुसार आम्ही दिलेला अर्थ हा विश्वासार्ह्य आहे.

गोवा

आजवर कोणीही आत्मविश्वासाने या शब्दाचा अर्थ सांगू शकलेलं नाही पण काही लोकांच्या मते गोवा हा पोर्तुगाली शब्द आहे. या ठिकाणी पोर्तुगिज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास होते.

आंध्र प्रदेश

या राज्याच्या नावाची उत्पत्ती देखील संस्कृत भाषेतूनच झालेली आहे. यातील आंध्र म्हणजे दक्षिण दिशा होय आणि प्रदेश म्हणजे प्रांत जो प्रदेश भारताच्या दक्षिणेकडे स्थित आहे त्याला आंध्र प्रदेश असं म्हटलं जातं.

कर्नाटक

या राज्याच्या नावाची उत्पत्ती करू या संस्कृत शब्दातून झालेली आहे, याचा अर्थ डोंगर असा होतो. जिथे उंच उंच पठारी डोंगर उपस्थित आहेत असा प्रदेश म्हणजे कर्नाटक.

तमिळनाडू

तमिळनाडू म्हणजे तमिळ भाषिक लोकांचा प्रदेश. तमिळ ही एक जुनी पारंपरिक भाषा आहे, म्हणून ज्याठिकाणी तमीळ भाषिक लोक मोठ्या प्रमाणात राहतात त्या भागाला तमिळनाडू असे म्हणतात.

केरळ

या राज्याच्या नावाबद्दल देखील अनेक मतभेद आहेत परंतु एका प्रसिद्ध कथेनुसार हा शब्द तेथील स्थानिक भाषेतून उत्पन्न झालेला आहे. यातील चरण म्हणजे एकत्रित लोकांचा प्रदेश म्हणून पुढे अपभ्रंश होत याला केरळ असं म्हणलं जात असेल.

तेलंगणा

2014 मध्ये तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आली. तेलंगणा या शब्दाचा अर्थ त्रीलिंग असा होतो, त्रीलिंग म्हणजे महादेवाचे तीन लिंग होय. ज्या भूमीत महादेवाची तीन लिंग आहेत अशा भूमीला त्रिलींग म्हणजेच तेलंगणा असे म्हणतात.

सिक्किम

येथील स्थानिक भाषेत सिक्कीम या शब्दाचा अर्थ लिंबू असा होतो म्हणजेच जो प्रदेश जवळपास लिंबाच्या आकाराचा आहे अशा राज्याला सिक्कीम असं नाव देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.