Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

नोटबंदी नंतर मनमोहनसिंग यांना लोकांनी खुळ्यात काढलं पण आता ते खरं झालंय.

नोटबंदी झाल्यावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशाचा विकासदर २ टक्क्यांनी पडणार असं सांगितले, आणि आता देशाचा GDP धडाम झालाय.

२०१६ च्या डिसेंबर महिन्यात मोदी सरकारने नोटबंदी करण्याची घोषणा केली आणि देशात एकच गोधंळ उडाला. त्यावेळी देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री मनमोहनसिंग यांच्या सोबतच अनेक अर्थतज्ज्ञांनी नोटबंदी करण्याची वेळ चुकली आहे आणि याचा भारताच्या विकास दरावर मोठा परिणाम होणार असं सांगितले होते. पण मोदी प्रेमात आंधळे झालेल्या अनेकांनी या सगळ्या लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यापाठोपाठ सरकारने कोणत्याही चर्चेविना GST पण लागू केला आणि कंबरडे मोडलेल्या अनेक उद्योगधंद्यांना दिवाळखोरीतच काढले. नोटबंदी झाल्यापासून भारताच्या विकासदाराचा आलेख हा उतरताच आहे आणि आता तर ६ वर्षाचा नीचांक नोंद करत नकोसा असणारा विक्रम केला आहे.

आज म्हणजेच २९ नोव्हेंबर २०१९ ला सायंकाळी दुसऱ्या तिमाहीतील विकासदाराचे आकडे समोर आले आणि सगळ्यांची झोपच उडाली आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ५ टक्के असणारा विकासदार आता घटून ४.५ टक्क्यांवर आला आहे. लाजिरवाणी गोष्ट अशी कि एकही सेक्टरमध्ये तेजी झालेली नाही. दुसऱ्या तिमाहीत मायनिंगमध्ये ०.१ टक्के, बांधकामात ८.५ टक्क्यांवरुन ३.३ टक्के, उत्पादन क्षेत्र ६.९ टक्क्यांवरुन एक टक्का, सर्व्हिस सेक्टर ७.३ टक्क्यावरुन ६.८ टक्क्यापर्यंत घट झाली आहे. कृषी, उत्पादन आणि सर्व्हिस, ऑटोमोबाइल आणि रिअल इस्टेट या सगळ्याच क्षेत्रात देशाच्या विकासदाराने गटांगळ्या खाल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सरकार विविध घोषणा करत होते पण आजार वेगळाच आणि देणाऱ्या गोळ्यांच वेगळ्या असं काहीस सरकारने केल्याचं दिसत आहे.

काही महिन्यापूर्वी रॉयटर्स या नामंकित वृत्तपत्राने जगभरातील अनेक अर्थतज्ज्ञांशी भारताच्या विकासदराबाबत प्रश्न विचारून एक सर्वे केला होता. त्यावेळी अनेकांनी मते नोंदवल्यानंतर भारतचा दुसऱ्या तिमाहीत ४.७ टक्के इतका विकासदर असेल असं त्यांनी जाहीर केले होते पण सरकारने हा एक विरोधातला प्रपोगंडा असल्याची बतावणी करून दुर्लक्ष केले. आज विकासदाराचे आकडे आले आहेत आणि देशाचा विकासदर आहे ४.५ टक्के.


Leave A Reply

Your email address will not be published.