Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

आईन्स्टाईनच्या E = mc2 सिध्दांताला आव्हान देणारा भारतीय गणितज्ञ

भाईंनी 5 वर्षाचा Bsc आणि Msc अभ्यासक्रम त्यांनी फक्त 2 वर्षातच पूर्ण केला.

आईन्स्टाईन बद्दल माहीत नाही असा कदाचित एखादाच सापडेल. अगदी कम्प्युटरच्या वेगाने काम करावं तशी त्याच्या बुद्धीक्षमता. अनेक नवीन नवीन सिद्धांत मांडून आईनस्टाईन भाऊंनी जगाला आपली भूरळ पडली पण त्यांचा सगळ्यात जास्त जगलेला आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेला सिद्धांत म्हणजे E=mc2. अगदी प्राथमिक शाळा, अभ्यासिका, ग्रंथालय आणि उच्च माध्यमिक शाळा ते विविध शैक्षणीक संस्थेच्या भिंतीवर हा सिद्धांत तुम्हाला हमखास पाहायला मिळेल.

आपल्याकडं पोरगं लै हुशारी दाखवत असेल तर त्याला आईन्स्टाईन हायस व्हय ? अस म्हणतात. आपल्यासाठी आईनस्टाईन म्हणजे बुद्धीचा शेवटचं. अश्या थोर माणसाच्या या सिध्दांताला आव्हान एक भारतीय गणितज्ञने दिले होते. चक्क आईन्स्टाईनच्या जगात सगळ्यांनी मानलेल्या सिध्दांताला आव्हान दिल्याने भारतीय गणितज्ञ जगभरात कमालीचे चर्चेत आले होते. या महान गणिततज्ज्ञांच नाव डॉ वशिष्ठ नारायण सिंह.

mathematician vashisth narayan, आईन्स्टाईन, भारतीय गणितज्ञ, वशिष्ठ सिंह, वैज्ञानिकजी, स्किझोफ्रेनिया, Vashishtha Narayan Singh, E=mc2,

वशिष्ठ सिंह (mathematician vashisth narayan) यांचा जन्म 2 एप्रिल 1942 ला बिहार मधील भिजपुर जिल्ह्यातील बसंतपूर या गावाचा. प्रख्यात नेटरहाट निवासी शाळेतून त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. लहानपणापासूनच आकड्यांच्या खेळात तरबेज झाल्याने त्यांना त्यात इच्छा असल्याची जाणीव झाली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण राज्यात प्रथम येऊन त्यांनी पूर्ण केल्यानंतर Bsc करण्याचा निर्णय घेतला. पाटणा विज्ञान महाविद्यालयात त्यांनी त्यासाठी प्रवेश घेतला. वशिष्ठ सिंह यांची अफलातून बुद्धी पासून इथं सगळे त्यांना वैज्ञानिकजी म्हणून ओळखू लागले.

बुद्धीमातेची दखल घेत पाटणा विद्यापीठाने त्यांना पहिल्याच वर्षात Bsc गणित विषयात अंतिम वर्षाची परीक्षा देण्याची विशेष परवानगी दिली.

त्यांची प्रचंड हुशारी पाहून ते कुतूहलाचा विषय झाले होते. Bsc च्या पहिल्या वर्षाच्या शिक्षकांपेक्षा तेच जास्त हुशार ठरत होते त्यांच्या बुद्धीमातेची दखल घेत पाटणा विद्यापीठाने त्यांना पहिल्याच वर्षात Bsc गणित विषयात अंतिम वर्षाची परीक्षा देण्याची विशेष परवानगी दिली. या परीक्षेत ते अव्वल आलेच आणि पुढील वर्षी त्यांनी Msc अंतिम परीक्षा पण उत्तीर्ण झाले. म्हणजे 5 वर्षाचा Bsc आणि Msc अभ्यासक्रम त्यांनी फक्त 2 वर्षातच पूर्ण केला.

पुढे अमेरिकी गणितज्ञ जॉन केली यांच्या आमंत्रणावरून त्यांनी शिष्यवृत्तीसह कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला. आपल्या बौद्धिकतेची प्रचिती तिथेही देत त्यांनी Reproducing Kernels and Operators with a Cyclic Vector हा प्रबंध त्यांनी सादर करत 1969 साली आपली PhD मिळवली.

यानंतर त्यांनी वोशिंग्टन विद्यापीठ मध्ये साहयोगी प्राध्यापक म्हणून काम चालू केले. पुढे त्यांना अमेरिकी अंतराळ संस्था नासानेही आमंत्रण धाडले आणि ते तिथेही राजू झाले पण कालांतराने मन रमत नसल्याने त्याची परतीची वाट धरत भारतात आले. 1974 साली भारतात आल्यानंतर त्यांनी आयआयटी कानपुर, मुंबई मधील टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि नंतर कोलकाता मधील भारतीय सांख्यिकी संस्था मध्ये काम केले. 2014 मध्ये बिहारच्या मधेपुरा येथील भुपेंद्र नारायण मंडळ विद्यापीठात त्यांची अभ्यागत प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती.

सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात त्यांना फार खडतर वाटेवरून जावे लागले. त्यांना स्किझोफ्रेनिया नावाचा आजार होता. त्यांचा विवाह फार काळ टिकला नाही तर आयुष्यातील तब्बल 40 वर्षे स्किझोफ्रेनिया मध्ये गेली. अश्या या महान गणितज्ञ वशिष्ठ सिंह यांचा 14 नोव्हेंबर 2019 रोजी पाटणा येथे आजाराने निधन झाले.


Leave A Reply

Your email address will not be published.