Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

भारत Middle Income Trap मध्ये अडकलाय ?

वर्ष २०१९ चालू झाल्यापासून तशी भारतीय अर्थव्यवस्था काहीशी आजारीच आहे. लोकसभेच्या निवडणुका चालू असताना ‘मोदी पुन्हा निवडून येऊद्या, मग बघा कसा GDP वाढतो तो’ असा एक Whatsapp मेसेज फिरत होता. मोदी प्रचंड आणि ऐतिहासिक जनमताने निवडून आले पण अजूनतरी भारतीय अर्थव्यवस्था हि खालच्या दिशेनेच प्रवास करत आहे. अगदी नवा विक्रम करत अर्थव्यवस्थेचा GDP निच्चांकी म्हणजेच ५ टक्क्यांवर आला आहे. असं फार काही मोठं घडलेलं नाही फक्त एवढाच कि पहिल्यांदाच भारताचा GDP ५ टक्के आणि पाकिस्तानचा GDP ५.२ टक्के आहे.

साधारणतः लोकसभेची निवडणूक, त्यानंतर ऐतिहासिक जनमताने निवडून आलेले नरेंद्र मोदी आणि मग आल्या आल्या फक्त ७० दिवसात काढून टाकलेले ३७० कलाम यामुळे कदाचित तुम्हला भारतीय अर्थव्यवस्थेच्या बातम्या फारच कमी दिसल्या असतील पण गेल्या महिनाभरापासून अर्थव्यवस्थेच्या ढिम्म वेगाबद्दल बराच काही दिसून येत आहे. यामध्ये विविध बँकांमधील गैरव्यवहार, मंदावलेला ऑटो सेक्टर, वाढती बेरोजगारी इ. समावेश करायला हरकत नाही. पण या सगळ्यावर एक नजर टाकल्यावर मात्र अशी चिंता होते कि भारत Middle Income Trap मध्ये अडकलाय कि काय ?

भारत, Middle Income Trap, GDP, काय आहे MIT, PMEAC, भारत MIT मध्ये का सापडू शकतो ?
Image Source – YouTube

“मागच्या काही महिन्यांपूर्वी Economic Advisory Council म्हणजेच PMEAC ने नव्या सरकारला स्पष्ट इशारा दिला होता की अर्थव्यवस्थेच्या वेग असाच राहिल्यास भारत Middle Income Trap मध्ये अडकू शकतो.”

काय आहे MIT ?

MIT म्हणजेच Middle Income Trap हा तसा भारतीयांसाठी नवीन प्रकार आहे. याचा पहिल्यांदा शब्दप्रयोग जागतिक बँकेने २००७ मध्ये केला होता. जागतिक बँकेच्या व्याख्येनुसार एखादा देश झपाट्याने प्रगती करू लागतो, त्याचा GDP उच्चांकावर जातो, लोक ज्यादा पैसे मिळवू लागतात, नोकरदारांचे पगार वाढू लागतात आणि त्याच्या राहणीमानात कमालीचा बदल होतो पण जसे जसे पुढे जाऊ तसे तसे त्या देशाला ते दरडोई उत्पन्न टिकवता येत नाही आणि मग लोकांचे उत्पन्न पुन्हा कमी होऊ लागते.

अशावेळी या देशाची परिस्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी होते कारण Middle Income Trap मध्ये अडकलेला देश कमी उत्पन्न असणाऱ्या आणि जादा उत्पन्न असणाऱ्या अश्या दोन्ही देशांसोबत आपली तुलना करू शकत नाही. यावेळी प्रत्यक्ष फरक हा लोकांच्या उत्पन्नावर आणि अप्रत्यक्ष फरक सामाजिक जीवनावर जाणवू लागतो. लोकांमध्ये असंतोष वाढू लागतो आणि मग अर्थव्यवस्था पूर्णपणे ढिम्म होऊ लागते.

Middle Income Trap च उत्तम उदाहरण सांगायचं झाल्यास सगळ्यात पहिला नंबर लागतो तो ब्राझील या देशाचा. अत्यंत वेगाने प्रगती करणाऱ्या ब्राझील देशाने सगळ्या जगाच लक्ष वेधून घेतले होते पण भ्रष्टाचार आणि चुकीच्या नियोजनामुळे ब्राझील Middle Income Trap मध्ये अडकला आणि आपल्या प्रगतीचा सगळं वेग गमावून बसला.

भारत MIT मध्ये का सापडू शकतो ?

१. जागतिकीकरणाबाबत रोष
चीन, जपान आणि दक्षिण कोरिया याना मिळालेल्या फायद्यमुळे विकसित देशात जागतिकीकरणाबाबत रोष किंवा तिरस्कार निर्माण झाला आहे. यामुळे अनेक विकसित देश जागतिकीकरणाला विरोध करत आपले दरवाजे इतर देशांसाठी बंद करू लागले आहेत. गेल्या काही वर्षात अनेक देशात देशभक्तीचे नारे लागू लागले आहेत त्यामुळे भारताला आता पहिल्यासारखी संधी उपलब्ध नाही.

२. रचनात्मक परिवर्तन
विकसित होत असताना देशाने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वेळोवेळी रचनात्मक बदल करणे गरजेचे असते. जस कि Low productivity पासून भारताने आता High productivity च्या दिशेने प्रवास करायला हवा पण भारताची सद्य परिस्तिथी पाहता हा बदल होणे कठीण दिसत आहे. जगभरात भारताची हवा नक्कीच होत आहे पण मोठ्या कंपन्या येऊन Production करताना अजूनही दिसत नाही.

भारत, Middle Income Trap, GDP, काय आहे MIT, PMEAC, भारत MIT मध्ये का सापडू शकतो ?
Image Source – khabarindia.in

३. वातावरणातील बदल
पहिली पासून आपण शिकत आलो आहे कि शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाया आहे पण तो पायाच आपण विसरलो आहे असं काहीस चित्र निर्माण झालं आहे. बदल्या वातावरणामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि Production कमी होत आहे. तब्बल ५० टक्कापेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबुन असल्यामुळे याचा थेट परिणाम लोकांवर होत आहे आणि बेरोजगारी वाढत आहे. हि स्थिती अशीच राहिल्यास भारताला लवकरच अन्न धान्य सुद्धा आयात करावे लागणार.

४. मानवी भांडवल
बदल्या मागणीनुसार भारतीय युवक फक्त कौशल्य प्रशिक्षित पुरेसे नाहीत. तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल घडत असल्यामुळे युवकांना सतत त्यांचे कौशल्य वाढवणे गरजेचे बनले आहे आणि नेमकं यातच भारतीय युवक कमी पडत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे.

५. ठप्प निर्यात
काही काही महिन्यांचे निर्यातीबाबत आकडे तुम्ही पाहिल्यास भारतीय निर्यात किरकोळ वगळता पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठप्प निर्यातीमुळंच Financial crisis ची भीती वाढत आहे.

MIT टाळता येईल का ?

MIT म्हणजेच Middle Income Trap कशामुळे होते आणि त्याला कसे टाळता येईल यावर जगभरातील अनेक अर्थतज्ज्ञ आपले आपले मत सांगत आहेत, यामध्ये अनेक मतांतरे सुद्धा आहेत. साधारणपणे भारताच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास काही उपाययोजना ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला Middle Income Trap टाळता येईल.

भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे ते बेरोजगारी कमी करणे म्हणूनच प्रथम प्राधान्य हा तरुणांना लवकरात लवकर जॉब मिळवून देणे हा आहे. आता यामध्ये ज्यांना कौशल्य नाही त्यांना ते देणे हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. सरकारला त्यांच्या फालतू योजना बंद करून फक्त अत्यन्त महत्वाच्या सामाजिक योजना राबवाव्या लागतील त्या पण अगदी काटेकोरपणे. काटेकोरपणे म्हणजे त्या योजनेची मदत गरजू पर्यंत पोचणे.

भारत, Middle Income Trap, GDP, काय आहे MIT, PMEAC, भारत MIT मध्ये का सापडू शकतो ?
Image Source – Madhyamam

अर्थव्यवस्थेला पुन्हा भरारी देण्यासाठी निर्णय घेण्याचा वेग वाढवणे फार गरजेचे आहे यासाठी आर्थिक व्यवस्थापनेचे Decentralization करणे फार गरजेचे आहे आणि त्याचे अधिकार संस्थांना द्यायला हवेत. सध्या भारतात याच्या अगदी उलट होत आहे तो भाग वेगळा.

भारताची प्रगती जैसे थे ठेवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. जगभरातील विविध देशांची शिक्षण क्रमवारी पाहून भारताने शिक्षण क्षेत्रात Long range planning च्या हिशोबाने बदल घडवणे गरजेचे आहे.

सरकारने तातडीने जागतिक – भारतीय मोठ्या कंपन्या आणि भारतीय लहान उद्योग यासाठी वेगवेगळ्या कमिटी स्थापन करून त्यांना येणारे अडथळे ओळखणे गरजेचे आहे. त्यानंतर येणारे अडथळे पाहून बदल करणे महत्वाचे तरच मोठ्या प्रमाणात जॉबच्या संधी वाढतील.

यासोबतच रचनात्मक बदल घडवण्यासाठी योग्य उपाय योजना, परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि शेती विषयक धोरण योग्य रीतीने आखायला हवे तरच येणारे Middle Income Trap चे संकट भारत धुडकावून लावेल.


आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.

Leave A Reply

Your email address will not be published.