Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जुल्फिकार खानाला धडा शिकवण्यासाठी जेव्हा महाराणी येसूबाईंनी तलवार उपसली

महाराणी येसूबाईं – हिंदुस्तानवर प्रथम जेव्हा मोघलांनी आक्रमण केले, तेव्हा हिंदुस्तानात एक प्रथा म्हणा किंवा एक दुर्बलता होती ती म्हणजे, “राजा संपला कि त्या राजाचे राज्य हि संपले.” मग तेथील लोक त्या प्रतिस्पर्ध्याला विरोध करत नसत. त्यामुळे मोघलांनी अवघा हिंदुस्थान काबीज केला होता.

परंतु छ. शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे ह्या गोष्टीला अपवाद ठरले कारण महाराजांनी नुसते स्वराज्याच स्थापन केले नाही, तर त्यांनी माणसांच्या मना मना मध्ये असलेली मानसिकता बदलली. त्यामुळे जर राजा संपला तर त्यानंतर राज्य कधीच संपले नाही. त्यामुळे छ. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छ. संभाजी महाराजांनी मोघलांना असा काही धडा शिकवला कि बस्स. परंतु काळाच्या घाटाने छ. संभाजी महाराज पकडले गेले. तरी पण शिवाजी महाराजांच्या शिकवणीमुळे स्वराज्य टिकून राहिले.

yesubai in sambhaji, maharani yesubai death in marathi, maharani yesubai wikipedia, maharani yesubai history in marathi, sambhaji maharaj wife, maharani yesubai images, yesubai history, महाराणी येसूबाई, संभाजी महाराज, महाराणी येसूबाईंचा इतिहास, महाराणी येसूबाईंची माहिती
maharani yesubai history in marathi, shivaji maharaj (Source – shrichatrapatishivaji.com)

ज्या वेळी संभाजी महाराजांना कैद झाली त्याच्या काही काळानंतरच त्यांचा मृत्यू झाला व येसू बाईंनी म्हणजेच संभाजी राजांच्या पत्नी, यांनी राजाराम महाराजांना अवघ्या १८ व्या वर्षी सिंहासनावर बसवले. राजाराम महाराजांनी संभाजी महाराजांनी कैद केलेल्या सरदारांना सोडून त्यांच्या मदतीने स्वराज्याचे संरक्षण करण्याचे प्रयत्न चांगल्या प्रकारे केले, परंतु त्याचवेळी औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकार खान त्याचे सैन्य घेऊन स्वराज्यावर चाल करून आला. येसू बाईंनी राजाराम राजेंना आपल्या काही मात्तबर सरदारांसह विशाल गडावर पाठवले व स्वतः तलवार घेऊन जुल्फिकार खानला मात देण्यास तयार झाल्या. ह्या सगळ्या प्रकारामुळे मराठ्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली व मराठ्यांनी जुल्फिकार खानाच्या सैन्यावर आक्रमण करण्यास सुरवात केली, त्यांनी त्याचा प्रदेश लुटायला सुरुवात केली.

ह्या सगळ्या प्रकारात जुल्फिकर खान असा काही अडकला कि त्याच्या रसादही मराठ्यांनी अडवल्या त्यामुळे त्याला काहीच करता येईना व तो एका जागी स्तब्ध होऊन पडला. त्याच वेळी त्याच्या लक्षात आले कि इथे थांबून किंवा असे युद्ध करून काही फायदा नाही आहे आणि त्यांनी एक युक्ती लढवली. आपल्या संपूर्ण इतिहासात आपल्याला कधी कोणाकडून हार पत्करावी लागलीच असेल तर ती केवळ आणि केवळ आपल्याच लोक्कांनी केलेल्या फितुरीमुळेच आहे. त्याचप्रमाणे येसूबाईंच्या सैन्यामध्ये हि एक व्यक्ती होती ज्याला सुभेदारी हवी होती आणि ती व्यक्ती म्हणजे “सूर्याजी पिसाळ”. ह्या सूर्याजी पिसाळांना जुल्फीकाराने वाईच्या सुभेदारीचे आमिष दाखून आपल्या गटात सामील करून घेतले.

त्यांनतर जेव्हा जुल्फिकार गडावर सैन्य घेऊन आला त्यावेळी सूर्याजी पिसाळांनी गडाचे दरवाजे उघडले, त्यामुळे गडावर अतिशय भयानक युद्ध झाले व त्या युद्धात येसू बाईंचा पराभव झाला. जुल्फिकार खानाने येसू बाईंना व शाहू महाराजांना अटक केली तसेच त्याने इतर मराठी सैनिकांना अटक करून औरंगजेबासमोर नेले.

अनेक वर्षांनंतर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मुहम्मद शहा पहिला याने शाहू महाराजांना सोडून दिले त्यामागे त्याचे अनेक वाईट मनसुबे होते, परंतु शिवाजी महाराजांच्या शिकवणीमुळे ते स्वराज्यात खरे ठरले नाहीत. नंतर अनेक वर्षांनी शाहू महाराजांचे सेनापती म्हणजे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी येसू बाईंना मोघलांच्या कैदेतून सोडवून आणले. ह्या सगळ्या प्रकारात येसू बाईंनी जुल्फिकार खानाची जी काही गचांडी पकडली होती ती शब्दात सांगणे जरा अवघडच आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.