एकेकाळी भारतात धुमाकूळ घालणारा Mircomax मोबाईल कुठं गायब झाला ?

Micromax एकेकाळी भारतात दोन नंबरला असणारी मोबाईल कंपनी. अगदी भारतातल्या खेड्यातील शेतकऱ्यांपासून ते व्यावसायिक लोकांना कडे मायक्रोमॅक्सचा मोबाईल होता. कंपनी एवढ्या वेगाने भारतात पसरली होती की लवकरच जागतिक पातळीवर सॅमसंगला जोरदार टक्कर देऊन मार्केट आपल्या हाती घेणार असं बोललं जात होत पण अस काहीच घडलं नाही. वर आजचे निम्मे अर्धे लोक मायक्रोमॅक्स हे नाव सुद्धा विसरून गेले आहेत. नेमकं काय झालं ज्यामुळे Micromax कंपनीला बाजारातून हद्दपार व्हावं लागले ? आज आपण पाहूया या अश्या गोष्टी जिने Micromax ला यशाच्या शिखरावर नेले तर चुका ज्यामुळे ते हद्दपार झाले.
राजेश अग्रवाल यांनी 1991 मध्ये Micromax Informatics या कंपनीची पायाभरणी केली, तेव्हा ही कंपनी डेल, hp आणि इतर बड्या ब्रँडच्या लॅपटॉपची डिस्त्रीबुटर कंपनी होती. कंपनीची वाढ होईल तशी मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज पडू लागली आणि नवीन इन्व्हेस्टर यात सामील झाले. त्यापैकी महत्वाचे नाव म्हणजे राहुल शर्मा. राहुल शर्मा यांनीच पहिल्यांदा मोबाईल क्षेत्रात पाय ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आणि इतर इन्व्हेस्टर लोकांना तयार केले. Micromax ने आपला पहिला मोबाईल X1I लॉन्च केला आणि त्याला भरगोस प्रतिसाद मिळाला.
पुढे कंपनीने एकापेक्षा एक नवीन मोबाइल काढले आणि प्रतिसाद मिळत गेला पण मोबाईल जास्त तर ग्रामीण भागातील लोक वापरात होते, यावर कंपनीने आपले लक्झरी मोबाईल काढून शहरी भागात सुद्धा पाय ठेवला. अँड्रॉड मुळे Micromax भारतातील दोन नंबरची कंपनी झाली. यानंतर Micromax ने टॅब आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयार करण्यास सुरवात केली. अक्षय कुमार, त्त्विकल खन्ना सारखे सेलेब्रिटी Micromax सोबत जोडले गेले आणि Micromax ची गाडी सुसाट चालत होती. कंपनीने सॅमसंग पेक्षा जास्त मोबाइल विक्री करून नवीन विक्रम केला. लवकरच जागतिक बाजारपेठेचे वेध कंपनीला लागू लागले. Micromax च्या यशाचा हा सर्वोच्च शिखर. पण या नंतर अस काही घडलं की Micromax कंपनी फक्त नावालाच उरली.

Micromax कंपनीला पहिला सुरुंग लागला तो रिलायन्स जिओच्या अगमनानाने. होय तुम्ही योग्य वाचलात. तुम्हाला प्रश्न पडला असेल जिओ आणि Micromax चा काय संबंध? तर Micromax चे 100 टक्के मोबाईल 2G आणि 3G या प्रकारातील होते. जिओच्या फुकट 4G डेटामुळे 2G आणि 3G प्रकारातील फोन मागे पडून मार्केट मध्ये 4G ची मागणी वाढत गेली आणि तसे तसे मायक्रोमॅक्स मोबाईल विक्री कमी होत गेली. भारतात एवढ्या लवकर 4G चालू होईल असे राहुल शर्माच्या स्वप्नात सुद्धा आले नव्हते त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानाबाबत कंपनीची कोणतीही तयारी नव्हती.
तुम्हाला प्रश्न पडला असेल मग जिओ आपल्यानंतर मायक्रोमॅक्स लगेच नवीन फोन बाजारात अनु शकत होती. याच उत्तर आहे हो, पण यात मायक्रोमॅक्स पूर्णपणे अयशस्वी ठरली. आधीपासूनच कंपनीने खूप मोठ्या प्रमाणात 3G फोन तयार केले होते ते खपत नसल्यामुळे नवीन भांडवल निर्माण होत नव्हते, यावेळी कंपनीने कोणतीही तत्परता न दाखवता योग्य वेळेची वाट पाहण्याचं ठरवलं आणि तो पर्यंत याचा फायदा चायनिज कंपनी MI ने घेतला. अगदी मायक्रोमॅक्स च्या विरुद्ध Mi चे नवीन तंत्रज्ञान आधारित फोन तयार होते त्यांनी ते भारतीय बाजरपेठेत योग्य वेळी उतरवून आपली जागा तयार केली आणि हळूहळू मायक्रोमॅक्स बाहेर फेकला जाऊ लागला.
मायक्रोमॅक्स कंपनी स्वतःचे वेगळे असे काहीच तयार करत नव्हते. मार्केट मध्ये असणाऱ्या इतर मोबाईलला हुबेहूब कॉपी करून ते कमी पैशात तयार करत आणि विकत त्यामुळे त्यांचा कारभार एक ट्रेडिंग कंपनी सारखा होता यामुळे रिसर्च आणि विकास याच्याशी त्यांचा फार संबंध आलाच नाही. आधी आपण वाचल्याप्रमाणे कंपनीला 4G बाबत एवढी प्रगती होईल याचा अंदाज बांधता आला नाही आणि अचानक आलेल्या तंत्रज्ञान बदलामुळे त्यांची पूर्णतः भंबेरी उडाली. नवीन तंत्रज्ञानावर काम करून फोन बाजारात आणेपर्यंत अनेक चायनीज मोबाईल कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत पाय रोवले होते ज्यामुळे कंपनी पुन्हा उभारी घेऊच शकली नाही. मध्यंतरी त्यांनी पुन्हा एकदा गाजावाजा करण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ.
मग तेच झालं जे एखाद्या संकटात सापडलेल्या कंपनीत होतं, मतभेद. या मतभेदमधून मग कंपनीला एक कोणती गोष्ट करता येईना आणि अखेर यातून अनेक इन्व्हेस्टरनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वीच मोबाइल तयार करण्याची कल्पना मांडणारे राहुल शर्मा यांनीही कंपनीला राम राम केला आहे.
आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी Uniksone94@gmail.com वर ई-मेल करा.