जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | Inspirational Quotes In Marathi

जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असावाच लागतो पण या प्रवासात अनेक यश अपयशाचे टप्पे येतात त्यावेळी स्वतःचे मनोबळ वाढवणे गरजेचे आहे. खालील अस्सल मराठी सुविचार तुमच्यात पुन्हा आग निर्माण करून तुम्हाला सतत ऊर्जा देत राहतील. Inspirational Quotes In Marathi सोबतच अनेक प्रेरणादायी कथा सुद्धा आपल्या वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत. Marathi Inspirational Quotes आणि प्रेरणादायी कथा तुम्हाला नक्कीच कमी येथील हि आशा आणि तुम्हाला शुभेच्छा !
1. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
Inspirational Quotes In Marathi, जबरदस्त प्रेरणादायक सुविचार, Motivational Quotes In Marathi
2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
3. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
4. चुकण हि ‘प्रकृती’,
मान्य करण हि ‘संस्कृती’
आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
5. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
6. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
7. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,
निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडिन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
8. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा
आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील
तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
9. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
10. स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
Inspirational Quotes in Marathi, Infobuzz Marathi, मराठी सुविचार
11. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
12. मनुष्या जवळची नम्रता संपली कि,
त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
13. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहता त्यानांच यश प्राप्त होते.
14. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
15. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
16. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
17. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?
18. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
19. भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती
आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती.
20. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
Motivational Quotes In Marathi, शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स, Inspiration Quotes, Marathi Inspirational Quotes
21. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
22. जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.
23. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात,
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
24. आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
25. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
26. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
27. स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.
28. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक तुम्हाला प्रेरणा देते,
तर टीका सुधारण्याची संधी.
29. मानवाचा दानव होणे ही त्याची हार,
मानवाचा महामानव होणे,
हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे
हे त्याचे यश आहे.
30. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण,
ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
Inspirational Quotes In Marathi, जबरदस्त प्रेरणादायक सुविचार, Motivational Quotes In Marathi, शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स
31. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.