दररोज सायकलवरून 24Km दूर शाळेला जाणाऱ्या मुलगीने दहावीत 98.75% मिळवले.
दररोज शाळेला जाण्यासाठी 24 किलोमीटर सायकल चालवून जाणाऱ्या 15 वर्षाच्या पोरीने फक्त आणि फक्त जिद्दीच्या जोरावर 98.75 टक्के मिळवले आहेत.
स्वतः विद्यार्थी, पालक, शाळा आणि आपले नातेवाईक या सगळ्यांसाठीच दहावीची परीक्षा स्पेशल असते म्हणायला हरकत नाही. मुलगा किंवा मुलगी यंदा दहावीला आहे असं बोललं की लोक दोन चार सल्ले देऊनच जातील एवढं तीच महत्व. त्यात कमी मार्क पडू नयेत म्हणून पोरग्याला वैयक्तिक अभ्यासाची खोली, मार्केट मध्ये असतील नसतील तेवढे गाईड आणि बुद्धी वाढायला ढीगभर बदाम. आपल्यालाकडे तर अभ्यासाच्या पॅटर्नला विशेष महत्व. लातूर पॅटर्न, चाटे पॅटर्न ही काही त्यातली निवडक नावं. सांगायचं तात्पर्य इतकंच की दहावीत पोराने चांगले मार्क्स मिळवावे म्हणून आईवडील शक्य आहेत त्या सगळ्या सुखसुविधा मुलाला देतात.
पण सुखसुविधा आणि पॅटर्नपेक्षा यश मिळवण्याची जिद्द अधिक महत्वाची आहे हे सिद्ध करणारे उदाहरण मध्य प्रदेशच्या दहावीच्या निकालातून समोर आले आहे. (Marathi Motivational Story) नुकताच मध्य प्रदेशच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला आहे. दररोज शाळेला जाण्यासाठी 24 किलोमीटर सायकल चालवून जाणाऱ्या 15 वर्षाच्या पोरीने फक्त आणि फक्त जिद्दीच्या जोरावर 98.75 टक्के मिळवले आहेत. रोशनी भडोरिया (Roshani Bhadoriya) अस तिचं नाव आहे.
मध्ये प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील चांभाळ भागातील अंजुळ या गावाची रोशनी भडोरिया (Roshani Bhadoriya) रहिवाशी आहे. दहावीत 98.75 टक्के मिळवत राज्यात आठव्या क्रमांकाने पास होण्याचा बहुमान तिने मिळवला आहे. निकलानंतर तिचे वडील पुरुषोत्तम भडोरिया म्हणले, रोशनी आठवी पर्यन्त असणाऱ्या शाळेला जाण्यासाठी बसची सुविधा होती पण त्यानंतर नववीसाठी तिने सरकारी शाळेत प्रवेश घेतला आणि तिथे कोणतीही ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध नव्हती.
मुलगीने मिळवलेल्या या यशाने भारावून जाऊन आता तिला पुढे शिकण्यासाठी ट्रान्सपोर्टची सोय करणार असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.
याबाबत रोशनी म्हणते, दररोज 24 किलोमीटर सायकल चालवत शाळेला जाणे सोपं नव्हतं. पण मी कधीही याचा कंटाळा न करता माझ्या ध्येयावर नजर ठेवली आणि धावत राहिले. शाळेतून परत आल्यानंतर दररोज 6-7 तास अभ्यास केला. यामध्ये तिच्या आईवडिलांची आणि शिक्षकांची मोलाची साथ लाभली असंही ती सांगते. तिला स्पर्धा परीक्षा देऊन IAS व्हायचंय.
निकाल लागल्यानंतर रोशनीचे सगळीकडे भरभरून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सध्या ती अनेकांची प्रेरणास्थान झाली आहे. जिद्दीने यश खेचून आणणाऱ्या रोशनी भडोरियाला इन्फोबझ्झचा सलाम.