Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

अख्या ब्रिटनला घाबरवून सोडणारा एकमेव भारतीय जादूगार

संपूर्ण जगाला आपल्या इंद्र’जाल’ मध्ये फसवणारा जादूगार

एक असा जादूगार ज्याने आपल्या जादूने लोकांची मती गुंग करून टाकली होती. तो असे काही अचाट प्रयोग करत असे कि पाहणाऱ्याचा आपल्या बुद्धीवर आणि डोळ्यावरही विश्वास बसत नसे. विशेष बाब म्हणजे हा जादूगार कुणी परदेशी नव्हता तर तो आपल्याच भारतात जन्माला आलेला होता. तुम्हाला साधारण अंदाज आलाच असेल कि मी आम्ही कुणाबद्दल बोलत आहोत.

आम्ही बोलतोय पी सी सरकार (PC Sorcar) ह्या महान भारतीय जादूगाराबद्दल ज्याने अख्या जगाला वेड लावले होते. १९१३ साली तत्कालीन पश्चिम बंगालमध्ये (आता तो भाग बांगलादेश मध्ये आहे) जन्मलेल्या PC Sorcar ह्यांचे संपूर्ण नाव प्रोतुल चंद्र सरकार (Protul Chandra Sorcar) आहे, पण लोक आज त्यांना फक्त पी सी सरकार ह्याच नावाने ओळखतात.

त्यांची अजून एक ओळख म्हणजे इंद्रजाल (Indrajaal). १९५५ साली पॅरिसमध्ये इंद्रजालचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला. ह्या प्रयोगामुळे संपूर्ण जगात इंद्रजालचे आणि पर्यायाने पी सी सरकार ह्यांचे नाव फार फेमस झाले.

p c sorcar death, pc sorcar: the maharaja of magic, images of p.c. sorcar, Protul Chandra Sorcar, Indian magician, pc sorcar in marathi, Indrajaal, पीसी सरकार, भारतीय जादूगार, महाराजा ऑफ मॅजिक, इंद्रजाल
PC Sorcar – The maharaja of Magic

तुम्ही म्हणाल जादू हि काही खरी नसते जादू म्हणजे हातचलाखी जिला आपण जादू म्हणतो. पण हि हातचलाखी करण्यासाठी अचूक टायमिंग अन कुशाग्र बुद्धी लागते जी पी सी सरकार ह्यांच्याजवळ उपजतच होती.

अख्या ब्रिटनला घाबरवून सोडले

९ एप्रिल १९५६ साली असे काही घडले कि संपूर्ण जगभरात पी सी सरकार ह्यांच्या प्रतिभेला लोकांनी सलाम ठोकला. रात्रीचे ९ वाजून १५ मिनिटं झालेले, एकाएकी बीबीसीच्या ऑफिसमध्ये फोनचा खणखणाट वाढला. शेकडो फोन बीबीसीच्या त्या कार्यालयात येऊ लागले. लोक फोन करून बीबीसीला कळवत होते कि त्यांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी एक खून होतांना पाहिला आणि तो खून होतांना लोकांनी चक्क टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिला होता म्हणून तर त्याची एवढी मोठी चर्चा झाली.

लोक बीबीसीला सांगत होते कि एका १७ वर्षीय तरुणीचे त्या जादूगाराने चाकूने दोन तुकडे केले. पण हाच तर PC Sorcar ह्यांच्या जादूगारीचा अस्सल नमुना होता. लोकांना वाटले कि पी सी सरकार ह्यांनी त्या तरुणीचे दोन तुकडे केले व ती तरुणी मेली पण प्रत्यक्षात तसे घडले नव्हते. ती पी सी सरकार ह्यांच्या हातचालाखीची कमाल होती व लोकांना हे नंतर लक्षात आले. ती तरुणी होती दीप्ती डे, PC Sorcar ह्यांची सहकारी.

पश्चिमेकडील जादूगार व प्रेक्षक भारतीय जादू व जादूगारांना फारसे मानत नव्हते पण पी सी सरकार ह्यांनी भारतीय जादूचा असा काही अविष्कार जगाला दाखवला कि पश्चिमेकडील लोकांचा भारतीय जादूकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.

माणसाची प्रगती होऊ लागली आणि तो यशाच्या शिखरावर गेला कि त्याचे शत्रूही तयार होतात. सरकार ह्यांच्या बाबतीतही तेच घडले. हिटलरचा प्रिय असलेला जर्मन जादूगार हेल्मट एव्हाल्ड स्क्रीवर (Helmut Ewald Schreiber) जो कलानग ह्या नावाने आपले जादूचे प्रयोग करायचा, त्याने सरकार यांच्यावर आरोप केला कि सरकार माझ्या ट्रीक्सची चोरी करत आहेत, माझी नक्कल करत आहेत. पण त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटला. सरकार ह्यांच्या समर्थनार्थ इतर अनेक जादूगार धावून आले व त्यांनी हेल्मट एव्हाल्ड स्क्रीवर ह्याच्यावरच नक्कल करण्याचा आरोप लावला.

डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे हि होती पी सी सरकार ह्यांची सर्वात मोठी चूक

१९७० च्या दशकात सरकार ह्यांनी संपूर्ण जगावर मोहिनी घातली होती. विविध देशांमधून त्यांना आमंत्रण येत होते. पण डॉक्टरांनी त्यांना प्रवास टाळण्याची सक्त ताकीद दिली होती. पण सरकार ह्यांनी त्या सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष केले. ते चार महिन्यांच्या आपल्या जादूच्या कार्यक्रमांसाठी जपानला गेले.

p c sorcar death, pc sorcar: the maharaja of magic, images of p.c. sorcar, Protul Chandra Sorcar, Indian magician, pc sorcar in marathi, Indrajaal, पीसी सरकार, भारतीय जादूगार, महाराजा ऑफ मॅजिक, इंद्रजाल

६ जानेवारी १९७० साली सरकार ह्यांनी होक्काइडो बेटाच्या शिबेत्सु शहरामध्ये आपला खास असा Indrajaal शो सादर केला. पण त्यांचा तो अखेरचा शो ठरला. स्टेजवरून खाली येताच एक जोरदार कळ त्यांच्या छातीत आली आणि ते कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. सगळ्या जगाला भारतीय जादूची नव्याने ओळख करून देणारे प्रोतुल चंद्र सरकार ह्यांनी त्यादिवशी जगाचा निरोप घेतला.


Leave A Reply

Your email address will not be published.