Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

अर गरिबाचा राजा हाय मी असल नबाबी चोचल मला परवडायच न्हाईत

आज राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी. काळ रात्रीपासूनच विविध माध्यमातून महाराजांना मानवंदना देणाऱ्या पोस्ट शेअर होत आहेत. बहुतेक पोस्ट या लोकराजा, गरिबांचा कैवारी अश्या आहेत. अनेकांना प्रश्न पडला असेल शाहू महाराजांनी नेमकं काय केलं त्यांना इतकं लोकराजा वैगरे बोललं जात.

कोल्हापूर संस्थांचे महाराजा म्हणजे शाहू छत्रपती हे सर्वागीण नेतृत्व होत. बहुजनांचा विकास असो किंवा धर्मतील अंधश्रद्धा असोत, शिक्षण असो किंवा शेतीविषयक बाबी असोत महाराजांनी जातीने यात लक्ष घालत सगळ्यांचे दुःख दूर करण्याचे प्रयत्न केलेत. शाहू महाराजांचा साधेपणा आणि जनतेविषयी असणारी कमालीची तळमळता सांगणारा हा प्रसंग….

राजर्षी शाहू महाराज, शाहू, शाहू महाराज कार्य, लोकराजा, Lokraja, Rajrshi Shahu Maharaj, Chhatrapati Shahu Maharaj, Kolhapur Maharaja, shahu karya, Shau contribution

कोल्हापूरच्या या छत्रपतींची ख्याती सर्वदूर पसरली होती, विशेषकरून शाहू महाराज कलाकारांना आश्रय देऊन त्याला उत्तेजन देण्याची गोष्ट सगळ्या देशभरात झाली होती त्यामुळे देशाच्या अनेक भागातील कलाकार मंडळींची कोल्हापूरच्या दरबारात विशेष हजेरी असायची. असाच एकेदिवशी महाराजांची ख्याती एकूण एक नवाबाच्या पदरी काम करणारा आचारी शाहू महाराजांच्या दरबारात आला आणि त्याने जेवण करण्याची इच्छा व्यक्त केली. महाराजांनी त्याची विनंती मान्य करून त्याला दरबारी जेवण बनवण्यास घेतले. पहिलीच दिवशी या नवाबाच्या आचाऱ्याने जेवण केले. छत्रपती शाहूंनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्याची स्तुती सुद्धा केला. आचारी महाराजांची प्रतिक्रिया पाहून आपली नोकरी पक्की समजून खुश झाला.

दुसऱ्या दिवशी महाराजांनी दरबारात मात्र आचाऱ्याचा कौतुक करून यथोचित सत्कार केला आणि त्याला बिदागी दिली. बिदागी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी पाठवणे किंवा विशिष्ठ ठिकाणी रवानगी केली. म्हणजे सरळ त्याला काढून टाकले. यानंतर आश्चर्यचकित झालेल्या दरबारातील मंडळींनी महाराजांना विचारले कि इतके चविष्ठ जेवण बनवून सुद्धा तुम्ही आचाऱ्याला बिदागी का दिलीत??

तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी त्या जेवणासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी बाहेर काढली, ती यादी ते वाचू लागले आणि म्हणले,

“अर गरिबाचा राजा हाय मी असल नबाबी चोचल मला परवडायच न्हाईत. भाकरी, खर्डा, रस्सा खाणारी मानस. अमास्नी त्येचं बर.”

शाहू एका स्वातंत्र्य राज्याचे राजे पण त्या राजेपदाचा डामडौलाशिवाय जगणे ही त्यांची खासियत. वरचा प्रसंग वाचून तुमच्या लक्षात आले असेल शाहू “लोकराजा” का होते.

Leave A Reply

Your email address will not be published.