Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

क्रिकेट जगतातील कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो

राहुल द्रविडला आला राग

राहुल द्रविडचे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येते त्याची उत्कृष्ट शैलीदार फलंदाजी व त्याचा मैदानावरील शांत स्वभाव. पण एखाद्या प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूने आपली मर्यादा ओलांडली तर द्रविडही शांत बसणाऱ्या पैकी नव्हता. 2004 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यानही असेच झाले द्रविड व अजित आगरकर फलंदाजी करत होते, द्रविडने बॉल फटकारला व धाव घेण्यासाठी निघाला पण धाव घेत असतानाच शोएब अख्तर मुद्दाम त्याच्या वाटेत आला व द्रविड आणि अख्तर मध्ये चांगलीच जुंपली.

cricket, rare moments in cricket, rare images in cricket, unbelievable moments in Cricket, craziest moments on cricket field, 9 player in slip, bees attack on cricket ground, क्रिकेट, क्रिकेट मधील दुर्मिळ फोटो, virat kohli keeping
Rahul Dravid got angry on Shoib Akhtar

विराट कोहली जेव्हा विकेट किपर बनतो

२०१९ पर्यंत महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा विकेट किपर होता हे सगळ्यांनाच माहित आहे. परंतु एका मॅच मध्ये विराट कोहलीने विकेट किपींग केलेली. ही घटना 2015 ची आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान सामना चालू होता आणि धोनी चालू मॅच मध्ये बाथरूमला गेला, तेव्हा कोहलीने त्याची जागा घेतली व तो काही वेळासाठी विकेट किपर बनला.

जेव्हा लक्ष्मण बॉलिंग करतो

“वेंगिपुरप्पा व्यंकटा साई लक्ष्मण” असे व्ही.व्ही.एस लक्ष्मणचे पूर्ण नाव आहे, तसेच क्रिकेट जगतात त्याला “व्हेरी व्हेरी स्पेशल” या नावाने सुद्धा ओळखले जाते. लक्ष्मण आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखल्या जायचा पण, बॉलिंग करतानाचा त्याचा एक दुर्मिळ फोटो आहे. 30 मार्च 2018 ला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी लक्ष्मणने या सामन्यात गोलंदाजी केली होती.

पॉंटिंग झाला रक्तबंबाळ

“रिकी पॉंटिंग” हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता आणि त्याच्या काळात ऑस्ट्रेलियाने क्रिकेटवर राज केले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तो मैदानावर एखाद्या सत्ताधिशाप्रमाणे वावरत असे. पण 2005 मध्ये त्यांच्यासाठी थोडा कठीण काळ होता. इंग्लंडविरुद्ध ते अँशेस मालिका हरले होते आणि एका सामन्यादरम्यान स्टुअर्ट ब्राँडचा चेंडू उसळी घेऊन त्याच्या तोंडावर येऊन आदळला व पॉन्टिंग रक्तबंबाळ झाला.

cricket, rare moments in cricket, rare images in cricket, unbelievable moments in Cricket, craziest moments on cricket field, 9 player in slip, bees attack on cricket ground, क्रिकेट, क्रिकेट मधील दुर्मिळ फोटो, virat kohli keeping
Blood runs down Ricky Ponting’s face

जेव्हा सेहवाग फलंदाजी दरम्यान बॉल सोडतो

सेहवाग म्हंटलं की बस… चौफेर फटकेबाजी. मग गोलंदाज कुणीही असो, तो अगदी भुकेल्या वाघाप्रमाणे त्यांच्यावर तुटून पडायचा. कारण त्याच्या खेळाची शैली Eye and Hand Co-oradination प्रकारची होती म्हणजेच बॉल बघायचा आणि जोरदार फटकवायचा, मग तो बॉल ऑफ स्टंपवर असो की लेगस्टंप वर.

सेहवागच्या नावावर असे एक रेकॉर्ड आहे की त्याने एका वर्षामध्ये एकही मेडन ओवर खेळली नव्हती. परंतु हा एक दुर्मिळ फोटो आहे ज्यात सेहवाग बॉल सोडताना दिसतोय. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान हा सामना चालू होता, जलद गती गोलंदाजासमोर त्याला खेळायला थोडा त्रास होत होता व तो आँफ स्टॅम्प बाहेरील बॉल सोडून देत होता.

जेव्हा जाँन्टी रोड्स कॅच सोडतो

एखादा खेळाडू क्षेत्ररक्षणा दरम्यान किती चपळ असावा याचा उत्तम नमुना म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू ‘जाँन्टी रोड्स’. 90 च्या दशकात जाँन्टी रोड्सने क्षेत्ररक्षणाची व्याख्याच बदलली, तो इतका चपळ होता की बॉल त्याच्या दहा ते बारा फुटावर जरी असला तरीही तो पकडत असे. पण 2003 साली वर्ल्डकप मध्ये केनिया सोबत एका सामन्यादरम्यान त्याने हा झेल सोडला आणि त्यानंतर लगेच त्याने आपली निवृत्ती सुद्धा जाहीर केली.

विराट कोहलीचे सायलेंट सेलिब्रेशन

भारतीय कर्णधार विराट कोहली आपल्या फलंदाजीमुळे तसेच मैदानावरील त्याचा आक्रमक स्वभावामुळे ओळखला जातो. त्याने शतक केल्यानंतर अथवा प्रतिस्पर्धी संघाची विकेट पडल्यानंतरचे त्याचे सेलिब्रेशन तुम्ही बघितलेच असेल. पण या फोटोतील त्याचे सेलिब्रेशन त्याच्या नेहमीच्या सेलिब्रेशनच्या अगदी उलट आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मोहाली येथील सामन्यात इंग्लंडला हरवल्यानंतर त्याने हे सेलिब्रेशन केले होते.

cricket, rare moments in cricket, rare images in cricket, unbelievable moments in Cricket, craziest moments on cricket field, 9 player in slip, bees attack on cricket ground, क्रिकेट, क्रिकेट मधील दुर्मिळ फोटो, virat kohli keeping
Virat Kohli’s silent celebration

स्लिपमध्ये 9 खेळाडू

असे क्रिकेट जगतात पहिल्यांदाच घडले की एखाद्या गोलंदाजांने आपले सर्वच खेळाडू स्लिपमध्ये तैनात केले. 1977 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामधील एका सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज “डेनिस लिली” याने अशी फिल्डिंग लावली होती.

मॅच दरम्यान केला मधमाश्यांनी हल्ला

हा फोटो पाहून तुम्हाला वाटत असेल कि अंपायर सहित सर्वच खेळाडू मैदानावर का झोपले आहेत. त्यामागचे कारण असे कि दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना चालू होता व अचानक त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला व त्यापासून बचाव करण्यासाठी सगळ्यांनी मैदानावर लोटांगण घातले.


Leave A Reply

Your email address will not be published.