Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

आज डिमांडमध्ये असणारी Royal Enfield कंपनी एकेकाळी चालत नसल्यामुळे विकायला काढली होती, पण

कसा झाला हा चमत्कार ? एका बंद पडायला आलेल्या कंपनीला मार्केट लिडिंग कंपनी बनवण्याची किमया ‘त्या’ व्यक्तीने कशी साधली हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.

ती जेव्हा येते तेव्हा साऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वळतात, ती जेव्हा रस्त्यातून चालते तेव्हा तिचा रुबाब काही न्याराच असतो. तिचा आवाज, तिचं दिसणं इतरांपेक्षा अगदी वेगळं, प्रत्येकालाच ती हवीहवीशी वाटते, ती भेटावी म्हणून कित्येक लोक महिनोंमहिने वाट पाहतात. हे वर्णन वाचून तुम्हाला वाटलं असेल की मी एखाद्या सुंदर हिरोईनबद्दल बोलतोय पण तसं अजिबात नाही. हे वर्णन आहे रॉयल एन्फिल्डच्या मोटारसायकलींचं. चला जाणून घेऊया Royal Enfield Success Story.

आज असे कित्येक लोक आहेत ज्यांच्यासाठी Royal Enfield ची मोटारसायकल घेणं हे एक स्वप्न आहे आणि ती लवकर मिळावी म्हणून ते अधिकचे पैसे सुद्धा द्यायला तयार असतात. पण तुम्हाला माहितेय का, ज्या रॉयल एन्फिल्डच्या मोटारसायकली घ्यायला आपण महिनोंमहिने थांबतो, किंबहुना लवकर मिळावी म्हणून अधिकचे पैसे द्यायला तयार होतो, तिच रॉयल एन्फिल्ड कंपनी एकेकाळी गाड्यांचा खप होत नसल्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर होती.

royal enfield history, royal enfield owner, royal enfield ceo, royal enfield success story in marathi, Siddhartha Lal, रॉयल एन्फिल्डच्या यशाचं रहस्य, सिद्धार्थ लाल

रॉयल एनफिल्डचा ‘इतिहास’ History of Royal Enfield

रॉयल एनफिल्ड ही मूलतः एक ब्रिटिश कंपनी होती. १९९४ साली आयशर मोटर्सने रॉयल एन्फिल्डला खरेदी केले. पण हा सौदा आयशर मोटर्ससाठी काही फायद्याचा ठरताना दिसत नव्हता. कारण रॉयल एन्फिल्ड सात्यत्याने घाट्यात चालली होती. त्यामुळे आयशर मोटर्सचा असा विचार होता की एकतर रॉयल एन्फिल्ड कंपनीला विकून टाकावे किंवा मग बंद करावे. पण विकण्यासाठी देखील कोणी खास खरेदीदार आयशरला मिळत नव्हता. शेवटी नाईलाजास्तव रॉयल एन्फिल्ड बंद करण्याचे प्लॅनिंग करण्यास आयशरने सुरवात केली.

त्याचवेळी आयशर मोटर्सचे मालक विक्रम लाल यांचे सुपुत्र सिद्धार्थ लाल जे एक पॅशनेट रायडर आणि रॉयल एन्फिल्डचे चहिते होते, त्यांनी कंपनीच्या बोर्डाकडे रॉयल एन्फिल्डला वाचवण्याची एक संधी मागितली. असंही रॉयल एन्फिल्ड कंपनी खराब कंडिशन आणि तोट्यातून चालली होती. त्यामुळे जर संधी दिलीच तर यापेक्षा अधिक वाईट अजून काय होणार या विचाराने बोर्डाने त्यांना संधी देऊन टाकली.

रॉयल एनफिल्डचे ‘सूत्र एका नवख्या तरुणाच्या हाती’

सिद्धार्थ लाल (Siddhartha Vikram Lal) त्यावेळी अवघ्या २६ वर्षांचे होते. ते बाईक आणि बाईक रायडींगबद्दल पॅशनेट असल्यामुळे त्यांनी अगोदरच ठरवलं होतं की आयशर मोटर्समध्ये काम करायला सुरवात केल्यास मी रॉयल एन्फिल्डला मॅनेज करणार. सिद्धार्थ लाल यांच्याबाबतीत एक गोष्ट सांगितली जाते ती अशी की, ते अतिशय Focused व्यक्ती आहेत. एखादं काम त्यांनी हाती घेतलं की त्यांच सारं लक्ष हे त्याच कामावर केंद्रित होतं.

Siddhartha Lal चा ‘नवा विचार नवा दृष्टिकोन’

एकदा वॉरन बफेट आणि बील गेट्स यांना एक प्रश्न विचारण्यात आला की, ‘ती अशी कोणती गोष्ट आहे जिने आपल्या यशामध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे ?’ तेव्हा दोघांनी एकसारखंच उत्तर दिलं आणि ते म्हणजे ‘फोकस’ (लक्ष केंद्रित असणे). सुदैवाने ही गोष्ट सिद्धार्थ लाल यांच्यामध्ये आधीपासूनच होती.

जेव्हा सिद्धार्थ लाल आयशर मोटर्सचे CEO झाले तेव्हा आयशर मोटर्सचे १५ वेगवेगळे उद्योग होते, जसे की ट्रॅक्टर, ट्रक, कन्सल्टन्सी, फुटवेअर, गारमेंट्स, मोटरसायकल, इत्यादी. पण यापैकी कोणताही उद्योग हा मार्केट लीडर नव्हता. सिद्दार्थ लाल यांनी १५ पैकी १३ उद्योग विकून टाकले आणि फक्त ट्रक आणि मोटारसायकलचा उद्योग स्वतःजवळ ठेवला. त्यांनी आपला पूर्ण फोकस या दोन उद्योगांकडे वळवला, खासकरून रॉयल एनफिल्डकडे आणि त्यांच्यासारख्याच पॅशनेट लोकांची कंपनीतील वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती केली.

यामागे Siddhartha Lal यांचा असा विचार होता की १०० जेमतेम चालणारे बिझनेस करण्यापेक्षा दोनच बिझनेस असे मनापासून करा की ते मार्केट लीडर झाले पाहिजेत. जेव्हा त्यांनी आयशर मोटर्सचे १३ उद्योग विकले तेव्हा त्यामध्ये आयशर मोटर्सचा सर्वात पहिला असणारा ट्रॅक्टरचा उद्योग देखील होता. हा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नव्हता पण सिद्दार्थ लाल आपल्या निर्णयावर ठाम होते.

royal enfield history, royal enfield owner, royal enfield ceo, royal enfield success story in marathi, Siddhartha Lal, रॉयल एन्फिल्डच्या यशाचं रहस्य, सिद्धार्थ लाल

Royal Enfield च्या समस्या समजून घेण्यासाठी सिद्दार्थ लाल यांनी स्वतः रॉयल एनफिल्ड हजारो किलोमीटर चालवली आणि तिच्या समस्या बारकाईने समजून घेतल्या. त्यांनी रॉयल एन्फिल्डकच्या इमेजबद्दल जाणून घेतले तसेच सध्याच्या पिढीला नेमकं काय पाहिजे आहे आणि त्यासाठी काय करता येईल याचा विचार केला.

रॉयल एन्फिल्डमध्ये ‘ग्राहकांच्या अपेक्षांनुसार बदल’

Siddhartha Lal स्वतः रायडर असल्यामुळे ते रॉयल एनफिल्डला एका वापरकर्त्याच्या दृष्टिकोनातून समजू शकत होते. रॉयल एनफिल्डच्या मजबूत आणि कमकुवत बाबी जाणून घेतल्यावर त्यांनी कमकुवत बाबींवर काम करण्यास सुरवात केली. सिद्दार्थ लाल यांनी गाडीमध्ये टेक्निकल बदल केले, जसे की उजव्या बाजूला असणारी गियर प्लेट इतर मोटारसायकालींप्रमाणे डाव्या बाजूला आणली, इंजिनमध्ये अनेक सुधारणा केल्या आणि Royal Enfield ची ओळख असणारा विंटेज लूक तसाच कायम ठेवला.

रॉयल एनफिल्डमधील ‘बदल ग्राहकांच्या पसंतीस’

सिद्धार्थ लाल यांनी क्रेनफिल्ड विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा केला होता. ज्याचा फायदा त्यांना रॉयल एनफिल्डमध्ये डेव्हलपमेंट करताना झाला. मोटारसायकलमध्ये ग्राहकांच्या अपेक्षांनुसार बदल करत असताना रायडरला मिळणार फिल आणि रॉयल एन्फिल्डच्या लुक्सची सुद्धा त्यांनी पूर्ण काळजी घेतली आणि मग हळूहळू थंडरबर्ड, ईलेक्ट्रा यांसारखे मॉडेल लाँच केले.

२००२ ते २००४ पर्यंत सिद्दार्थ लाल यांनी चेन्नईहूनच रॉयल एनफिल्ड मॅनेज केली, जिथे त्यांचा मॅन्युफॅक्चअरिंग प्लांट होता. बदल केल्यानंतर खुद्द सिद्धार्थ यांनीच मोटारसायकलच्या चाचण्या केल्या होत्या. मोटारसायकलच्या दर्जासोबतच त्यांनी ग्राहकांच्या अनुभवावरती सुद्धा लक्ष दिले आणि कंपनीच्या आउटलेटमध्ये सुधारणा घडवून आणल्या आणि हे बदल लोकांना पसंतीस पडू लागले.

‘शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक’ म्हणून रॉयल एनफिल्डचे ब्रॅंडिंग

हे सर्व करत असताना सिद्धार्थ लाल यांनी रॉयल एनफिल्डच्या ब्रँड बिल्डिंग आणि इमेजवर देखील विशेष लक्ष दिले. रॉयल एन्फिल्डचे ब्रॅंडिंग अशाप्रकारे करण्यात आले की त्याकडे पावरफुल आणि ऍडव्हेंचर बाईक म्हणून पाहिले जाऊ लागले. रॉयल एनफिल्डची टीव्हीवर कधी भरमसाठ जाहिरात करण्यात आली नाही आणि ना ही त्यांना कधी त्याची गरज भासली. रॉयल एन्फिल्डची इमेजच अशी बनवण्यात आली की ‘रॉयल एनफिल्ड’ हे नावंच सर्व काही बोलून जातं. म्हणूनच कंपनीला जाहिरात करण्यासाठी कधी कोणत्या हिरो किंवा क्रिकेटरची गरजंच पडली नाही.

रॉयल एनफिल्डची अशी काही क्रेझ निर्माण करण्यात आली की ज्यांना रॉयल एनफिल्डबद्दल जराही टेक्निकल माहिती नाही आणि ज्यांनी ती कधी चालवलेलीही नाही अशांनाही ती खरेदी करावीशी वाटते. भारतीय सैन्यदल १९५५ पासून पेट्रोलिंगसाठी रॉयल एनफिल्डचा वापर करत आलेले आहे. त्यामुळे रॉयल एनफिल्डकडे ‘सामर्थ्याचे प्रतीक’ म्हणूनही पाहिले जाते. बऱ्याचदा चित्रपटातही नायकाची भूमिका साकारणारा मुख्यतः रॉयल एन्फिल्डच चालवताना दाखवला जातो.

रॉयल एनफिल्ड ‘एक आघाडीची कंपनी म्हणून नावारूपास’

सिद्धार्थ लाल यांनी २५० सीसी ते ७५० सीसी या मिड सेगमेंट वरती विशेष लक्ष दिले आणि रॉयल एनफिल्डला या सेगमेंटमधली एक लिडिंग कंपनी बनवले. भारतात यश मिळवल्यावर आता रॉयल एनफिल्ड एक इंटरनॅशनल ब्रँड म्हणून उदयाला येऊ पाहत आहे. ज्यावेळी सिद्धार्थ लाल यांनी काम सुरु केले होते त्यावेळी कंपनीची मोटसायकल बनवण्याची क्षमता ६ हजार होती आणि दर महिन्याला २ हजारपेक्षा कमी मोटारसायकल विकल्या जायच्या. पण आज कंपनीची मोटारसायकल बनवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढूनही रॉयल एनफिल्डची मोटारसायकल बुक केल्यानंतर हातात मिळायला ४-६ महिने वाट पाहावी लागते.

royal enfield history, royal enfield owner, royal enfield ceo, royal enfield success story in marathi, Siddhartha Lal, रॉयल एन्फिल्डच्या यशाचं रहस्य, सिद्धार्थ लाल

एकेकाळी कोणी घेत नाही ज्या म्हणून जी रॉयल एनफिल्ड विकायला काढली होती. आज त्याच रॉयल एनफिल्डची मोटारसायकल घ्यायला महिनोंमहिने वाट पाहावी लागते. मिळालेल्या संधीचं सोनं करत रॉयल एनफिल्डला नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या सिद्धार्थ लाल यांनी काळाचा आणि कष्टाचा महिमा काय असतो हे सर्वांनाच दाखवून दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.